हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कालपासून विरोधकांच्यावतीने विदर्भ-मराठवाड्यातील अनुशेषाच्या अनुषंगाने नियम २९३ खाली प्रस्ताव विधानसभेत मांडण्यात आला होता. या प्रस्तावावर बोलताना सत्ताधारी आणि विरोधी बाकावरील अनेक आमदारांनी मराठवाडा आणि विदर्भातील अनुशेष दूर करण्यासाठी काही सूचना केल्या तर काही जणांनी राज्य सरकारच्या धोरणावर टीका केली. या संपूर्ण झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ …
Read More »नाना पटोलेंची मागणी, राज्यात जातनिहाय जनगणना करा काँग्रेसशासित राज्यात जुनी पेन्शन योजना लागू मग महाराष्ट्रातही का नाही ?
ओबीसींचे प्रश्न सोडवण्यासाठी जातनिहाय जनगणना होणे गरजेचे आहे पण केंद्र सरकार मात्र तशी जनगणना करत नाही. काही राज्य सरकारांनी जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारनेही इतर राज्य सरकारप्रमाणे आपल्या राज्यातही जातनिहाय जनगणना करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज विधानसभेत केली. प्रसार माध्यमांना माहिती देताना नाना …
Read More »संजय राऊत यांचा टोला, काही दिवसांनी मुख्यमंत्री खाकी पँट आणि काळी टोपी… मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या रेशीमबाग भेटीवरून केली टीका
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक अर्थात आरएसएसचे सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन त्यांना वंदन केलं. तसेच, आरएसएसचे दुसरे संघचालक माधवराव गोळवरकर यांच्या स्मृतींनाही मुख्यमंत्री शिंदेंनी अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार प्रसाद लाड उपस्थित होते. यानंतर एकनाथ शिंदे यांनी …
Read More »शेतकरी हैराण, सत्तार खातो गायरान महाराष्ट्राला धोका, मंत्र्यांना खोका...आजही महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक...
महाराष्ट्राला धोका, मंत्र्यांना खोका… खाऊन खाऊन ५० खोके, माजलेत बोके माजलेत बोके… शेतकरी हैराण, सत्तार खातो गायरान… कुणी उद्योग घ्या, कुणी सबसिडी घ्या तुम्ही खोके घ्या… अशा घोषणा देत आजही महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर उतरत ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आज हिवाळी अधिवेशनाचा नववा दिवस असून गायरान जमीन …
Read More »अजित पवार यांचा आरोप, गायरान जमीनप्रकरणात सत्तारांनी एजंटामार्फत पैसे घेतले चौकशी होईपर्यंत मंत्री पदाचा राजीनामा घ्या
तत्कालीन महसूल राज्यमंत्री आणि विद्यमान कृषीमंत्री यांनी गायरान जमीन नियमबाह्य पद्धतीने वाटप केली असून यामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाला असल्याने विद्यमान मंत्र्यांची सखोल चौकशी करा आणि चौकशी होईपर्यंत मंत्री पदाचा राजीनामा घ्या अशी जोरदार मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज स्थगन प्रस्तावाद्वारे केली. तसेच मंत्री सत्तार यांनी गायरान जमिन …
Read More »गिरिष महाजन म्हणाले, खरं तर बोगस डॉक्टरांना आपणच अलाऊन्स देतोय फक्त त्यांना दररोज पाचशेचा दंड ठोठावतो, कायदा बदल्याची आवश्यकता
मागील काही वर्षांमध्ये राज्यात बोगस डॉक्टरांचे प्रमाण वाढत आहे. यासंदर्भातील प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय बन्सोड यांनी उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना राज्याचे वैद्यकिय शिक्षण मंत्री गिरिष महाजन म्हणाले, खरे तर आपण बोगस डॉक्टरांना आपणच अलॉऊन्स देतोय असे सांगत या गोष्टी सर्वोच्च न्यायालयाच्या त्या एका निर्णयामुळे असल्याचे स्पष्टीकरण दिले. विधानसभेचे …
Read More »अखेर अनिल देशमुख तुरुंगाबाहेर पण मुंबईबाहेर जाण्यास बंदी न्यायालयाच्या अटीनुसार अधिवेशन आणि घरी जाण्यास मनाई
जवळपास मागील वर्षभरापासून मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या १०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी तुरुंगात असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या जामीनामुळे अखेर तब्बल १ वर्ष, १ महिना आणि २७ दिवसांनी तुरुंगातून सुटका झाली. परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपामुळे याप्रकरणी ईडी आणि सीबीआयने …
Read More »फडणवीसांनी सत्तारांना क्लिन चीट देत केली टीईटी घोटाळ्याची चौकशी जाहिर विधानसभेत भाजपा आमदार संजय कुटे यांच्या मागणीवर फडणवीसांचा निर्णय
विधानसभेत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी दिलेला टीईटी घोटाळ्यावर चर्चा करण्याची मागणी स्थगन प्रस्तावाद्वारे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली होती. मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ती नाकारल्यावर विरोधी बाकावरील सदस्यांनी सभात्याग केला. मात्र याच मुद्यावरून भाजपाचे आमदार संजय कुटे यांनी प्रश्न उपस्थित केला. विशेष म्हणजे संजय कुटे यांना अध्यक्ष राहुल …
Read More »देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, अंमली पदार्थाची तस्करी रोखण्यासाठी टास्क फोर्स विधानसभेत केली आमदारांच्या मागणीवर जाहिर केला निर्णय
अंमली पदार्थाची तस्करी रोखणे आणि युवा पिढीला यापासून दूर ठेवण्यासाठी राज्य शासनाने टास्क फोर्स तयार केला आहे. त्याबरोबरच अंमली पदार्थ विरोधी विभागाचं विकेंद्रीकरण करून त्याचे बळकटीकरण करण्याचा विचार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य सुनील प्रभू यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर …
Read More »भाजपा म्हणते, आमचा करेक्ट कार्यक्रम करण्याची हिंमत अजितदादांमध्ये नाही अजित पवार यांच्या आव्हानाला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रत्युत्तर
बारामतीच्या आपल्या एकाच दौऱ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांना इतकी भिती वाटली की, ते माझा करेक्ट कार्यक्रम करायला निघाले आहेत. पण आपला करेक्ट कार्यक्रम करण्याची हिंमत अजितदादांमध्ये नाही. त्यांनी नागपुरात येऊन अशी भाषा करू नये. आपण त्यांचे कोणतेही आव्हान स्वीकारण्यास तयार आहोत, अशा शब्दात भारतीय जनता …
Read More »
Marathi e-Batmya