Breaking News

परत एकदा पुणे, सोलापूरहून जाणाऱ्या रेल्वेचा ट्रॅफिक ब्लॉक मध्य रेल्वेकडून वेळापत्रक जाहिर

साधारणतः दोन महिन्यापूर्वी पुणे, दौंड मार्गे सोलापूरला जाणाऱ्या रेल्वे गाड्यांसाठी ट्रॅफिक ब्लॉक मध्य रेल्वेने जाहिर केला होता. त्यानंतर मध्य रेल्वेने पुन्हा एकदा सोलापूर विभागाच्या दौंड ते कुर्डूवाडी विभागाच्या दरम्यान २५ जुलैपासून तांत्रिक कामांनिमित्त ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येत असल्याचे जाहिर केले. त्यामुळे या कामासाठी मुंबईसह सोलापूर, तसेच अन्य काही विभागांतील मेल, …

Read More »

रामदास कदम यांचा आरोप, मला आणि माझ्या मुलाला संपविण्याचा कट उध्दव ठाकरे यांच्यावर पुन्हा साधला निशाणा

शिवसेनेतील पक्ष नेते पदाचा राजीनामा दिल्यानंतर रामदास कदम यांनी आपण लवकरच उध्दव ठाकरे यांच्याबाबत बोलणार असल्याचे जाहिर केले. त्यानुसार आज एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना रामदास कदम यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधत म्हणाले, मला आणि माझ्या मुलाला संपविण्याचा कट उध्दव ठाकरे यांनी आखल्याचा आरोप करत शिवसेनेतील मराठा नेत्यांना संपविण्याचा …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश; सचिवांनो, कामासाठी मंत्रालयात येणाऱ्या नागरिकांना भेटा विभागांच्या सचिवांच्या पहिल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना

लोकांचे प्रश्न सोडवतांना सकारात्मकता ठेवा, राज्यभरातून मंत्रालयात कामासाठी येणाऱ्या लोकांना सचिवांनी भेटले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र पुरस्कृत तसेच राज्याच्या योजना गतीने मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करा असे निर्देश दिले.  मुख्यमंत्री आज मंत्रालयात सर्व विभागांच्या सचिवांच्या पहिल्या बैठकीत मार्गदर्शन करताना बोलत होते. प्रशासन संवेदनशील, सचोटीचे, प्रामाणिक हवे …

Read More »

केंद्र सरकारच्या ‘या’ निर्णयाची अमंलबजावणी करण्याचे मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश प्लॅस्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर बंदी, प्लॅस्टिक बंदी नियमामध्ये सुधारणा

प्लॅस्टिक लेपीत आणि प्लॅस्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर बंदी घालण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. राज्यातील प्लॅस्टिकच्या वापरामुळे निर्माण होणाऱ्या गंभीर समस्या लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्लॅस्टिक बंदी नियमामध्ये सुधारणा करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र शासनाने १ जुलै २०२२ पासून सिंगल युज …

Read More »

जयंत पाटील यांचा खोचक टोला, जास्त आवडणारे मिळाले म्हणून उद्धव ठाकरे… राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून शिंदे गटावर खरमरीत टीका

गुवाहाटीतील वस्तीचे दिवस आणि आतापर्यंतचे दिवस पाहिले तर दोन महिने झाले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीतील वाटाघाटीत व्यस्त आहेत. दुसरीकडे राज्याला अपंग करुन सोडलंय अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली. जयंत पाटील यांनी प्रदेश कार्यालयात प्रसारमाध्यमांशी बोलताना शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. मंत्रिमंडळाचा विस्तार न …

Read More »

नाना पटोले म्हणाले, चौकशीच्या नावाखाली छळ केला पण आवाज… जुलमी मोदी सरकारविरोधात काँग्रेसचा राज्यभर शांततेत सत्याग्रह

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने विरोधकांना संपवण्याचे राजकारण सुरु केले असून केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून दडपशाही केली जात आहे. काँग्रेस पक्ष, सोनिया गांधी, राहुल गांधी हे सातत्याने केंद्र सरकारला धारेवर धरत असल्याने त्यांना खोट्या प्रकरणात अडवण्याचे षडयंत्र आहे. गांधी कुटुंबाने या देशासाठी त्याग केला आहे व बलिदान दिले आहे, त्या गांधी कुटुंबाचा …

Read More »

उध्दव ठाकरेंच्या पालापाचोळ्यावरून शेलार यांचा पलटवार म्हणाले, ट्रेलर दणक्यात… मुख्यमंत्र्यांना कोणी पालापाचोळा म्हणत असेल तर हे महाराष्ट्राला बदनाम

शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर जवळपास महिन्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची आज सामना या मुखपत्राचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेली मुलाखत आज प्रसारीत करण्यात आली. या मुलाखती दरम्यान उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह एकाही बंडखोराचे आमदाराचे नाव न घेता म्हणाले जे गळाले ते पालापाचोळा अशी खोचक टीका केली. …

Read More »

उध्दव ठाकरे यांचा बंडखोरांना टोला, हा जो पालापाचोळा आहे ते म्हणजे… ठाणेकर जनता सुज्ञ आहे ते निवडणूकीत दाखवून देतील

ठाणेकर हे सुज्ञ असून शिवसेनेला पहिल्यांदा सत्ता मिळाली त्या ठाण्यातच काय तर महाराष्ट्रभरातील लोक निवडणुकीचा वाटत पाहत असून निवडणुकीच्या निकालानंतर बंडखोरांचा हा पालापाचोळा उडून जाईल असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी लगावला आहे. इतकचं नाही तर त्यांनी राजकीय पक्षांनी युती करताना करार करुन तो जनतेसमोर ठेवायला हवा असा कायदा बनवण्याची मागणीही …

Read More »

आणि उध्दव ठाकरे यांनी सांगितली शस्त्रक्रियेनंतरची स्वत:च्या तब्येतीची अवस्था… संपूर्ण शरीराची हालचाल थांबली होती

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनना पक्षात बंडखोरी झाल्यानंतर याआधीही शिवसेनेतील बंडाबाबतही चर्चा होतेय. तसेच शिवसेनेच्या स्थापनेनंतर अनेकदा शिवसेनेत बंडखोरी का होते असाही प्रश्न विचारला जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलंय. ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. तसेच यावेळी शस्त्रक्रियेनंतर स्वत:ची काय परिस्थिती …

Read More »

उध्दव ठाकरे यांचा आरोप, त्यांना शिवसेना आणि ठाकरे वेगळे करायचेत… ते दुसऱ्यांचे आदर्श पळवत स्वत:चे म्हणून दाखवायचेत

शिवसेनेचे पक्षप्रमुख असतानाही राज्याच्या मुख्यमंत्री पदावरून अनपेक्षितरित्या उतरावे लागल्यानंतर पहिल्यांदाच उध्दव ठाकरे यांनी मुलाखतीद्वारे व्यक्त झाले. त्याचबरोबर शिवसेनेत झालेल्या बंडाळीबरोबरच भाजपावरही त्यांनी टीका केली. शिवसेनेतील बंडखोर गट मुद्दाम बाळासाहेब ठाकरेंच्या नावाबद्दल संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केला. बंडखोरांचं खरोखर काही कर्तृत्व असेल तर त्यांनी त्यांच्या आई-वडिलांचे फोटो …

Read More »