Breaking News

संजय राऊत म्हणाले, त्यांच्याकडून निष्ठेच्या चार गोष्टी शिका लीलाधर डाके, मनोहर जोशी यांच्या भेटीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला टोला

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात बंडाचे निशाण फडकावित सेनेच्या ४० आमदारांना सोबत घेवून भाजपाच्या पाठिंब्यावर राज्यात सरकार स्थापन केले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लीलाधर डाके आणि माजी लोकसभाध्यक्ष मनोहर जोशी यांची भेट घेतली. या सदिच्छा भेटी असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. एकनाथ शिंदेंच्या …

Read More »

अजित पवार यांचा टोला, उटांवरून शेळ्या हाकणाऱ्यांना काय कळणार… वर्धा जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर अजित पवार यांनी लगावला टोला

राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे सध्या अतिवृष्टीग्रस्त भागातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. या पाहणीत शेतकऱ्यांच्या बांधावर जावून अजित पवार नुकसानीची पाहणी करत आहेत, त्यांच्याशी चर्चा करत आहेत. त्यामुळे चिडलेल्या भाजपाच्या काही नेत्यांकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठविण्यास सुरुवात केली. त्यावर विरोधी पक्षनेते अजित …

Read More »

सुषमा अंधारे यांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत हाती शिवसेनेचे शिवबंधन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत केला प्रवेश

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे समर्थक असे उघड दोन गट पडले आहेत. बंड केल्यानंतर खरी शिवसेना आम्हीच असल्याचा दावा एकनाथ शिंदे गटाने केला. शिंदे गटाच्या या दाव्यानंतर निवडणूक आयोगाला दोन्ही गटाने शिवसेना पक्ष संघटेवरील आपले वर्चस्व सिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. एकीकडे कायदेशीर लढाई सुरु …

Read More »

भावना गवळी शिंदे गटात तर त्यांचे घटस्फोटीत पती उध्दव ठाकरे गटात आज अधिकृत रित्या केला प्रवेश

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पक्षनेतृत्वाच्या विरोधात पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी करत वेगळी चूल मांडली. त्यानंतर शिवसेना पक्षाला गळती लागली. अनेक खासदार, नगरसेवक आणि पदाधिकारीदेखील शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यातच शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यादेखील शिंदे गटात सामील झाल्या. मात्र भावना गवळी यांचे घटस्फोटीत …

Read More »

ठाणे विभागासाठी कळवा येथे बसपोर्ट विकसित करा मुख्यमंत्र्यांचे निर्देश

कळवा येथे राज्य परिवहन (एस. टी.) महामंडळाचे विभागीय कार्यशाळा व विभागीय भांडार आस्थापना कार्यरत आहे. एस. टी. महामंडळाच्या बस गाड्यांचे मोठ्या प्रमाणात दुरुस्ती केली जाते. तसेच विभागीय भांडारामार्फत ठाणे विभागातील सर्व आगारांना दैनंदिन लागणाऱ्या साहित्यांचा पुरवठा केला जातो. येथे कर्मचाऱ्यांसाठी, प्रवाशांसाठी सार्वजनिक वाहतूक सुविधा अपुऱ्या पडत आहे. त्यासाठी एस. टी. …

Read More »

मुंबई महानगरातील ‘या’ रस्ते प्रकल्पांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा रस्ते प्रकल्प तातडीने पूर्ण करा - मुख्यमंत्री

मुंबई महानगर प्रदेशातील रस्त्यांच्या विविध प्रकल्पांना गती देण्यासाठी या कामांची वर्गवारी करुन कमी, मध्यम मुदतीचे रस्ते प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. जनतेला तात्काळ दिलासा देण्यासाठी रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर हाती घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी आज मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला दिल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या …

Read More »

देवेंद्र फडणवीस म्हणाले, हा निर्णय का दिला याचे आर्श्चय, पण पुनर्विचार याचिका दाखल करणार सर्वोच्च न्यायालयाच्या ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूकाच्या आदेशावर दिली प्रतिक्रिया

राज्यातील ३६७ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने आज राज्य निवडणूक आयोगाला दिला. त्यामुळे ओबीसी आरक्षणासह निवडणूका घेण्याचे महाविकास आघाडी सरकारनंतर राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारचे स्वप्न भंगले. त्यामुळे आता राज्य निवडणूक आयोगाने सुरु केलेली प्रक्रिया आता पुन्हा नव्याने सुरु करणार की …

Read More »

दिपक केसरकर यांचे प्रत्युत्तर, तुमच्यासाठी काहीतरी केले, तेही सांगा; अन्यथा मी जाहीर करेन शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांचा उद्धव ठाकरे याना इशारा

तुम्ही माझ्या नातवाच्या अॅडमिशनसाठी प्रयत्न केलेत, पण त्याही पेक्षा जास्त मी तुमच्याकरीता काही तरी केलेले आहे. माझ्याही हातून मोठ मोठी कामे झाली आहेत. ते ही लोकांना सांगा. अन्यथा येत्या दोन दिवसात मी प्रसार माध्यमांसमोर मी जे जे काही तुमच्यासाठी केले ते सगळे जाहीर करेन असा सज्जड इशारा शिंदे गटाचे प्रवक्ते …

Read More »

नाना पटोले म्हणाले, ओबीसी आरक्षणप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय धक्कादायक ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुकीच्या निर्णयाचा फेरविचार व्हावा

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा पेच सुटला असे दिसत असतानाच सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील ३६७ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याचा दिलेला निकाल हा अत्यंत धक्कादायक आहे. राज्य सरकारने याची तातडीने दखल घेऊन या निर्णयाचा फेरविचार व्हावा, यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. …

Read More »

न्यायालयाचे निवडणूक आयोगाला आदेश, ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूका घ्या राज्य सरकारबरोबर राज्य निवडणूक आयोगासमोर अडचण

मागील काही दिवसांपूर्वी ओबीसी आरक्षणासंदर्भातील बाठिंया आयोगाचा अहवाल राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आला. तो अहवाल सर्वोच्च न्यायालयाने स्विकारल्याने महाराष्ट्रातील ३६७ स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूका ओबीसी आरक्षणासह घेण्याच्या हालचाली सुरु केल्या. मात्र आज सर्वोच्च न्यायालयाच्या ए.एम. खानविलकर आणि ए.एस. ओक, जे.बी. परडीवाला यांच्या खंडपीठाने नव्याने आदेश देत सध्याच्या निवडणूका …

Read More »