Breaking News

शिवसैनिकांवरील हल्ल्यावरून उध्दव ठाकरे म्हणाले, तर आम्ही शांत बसणार नाही… पोलिसांनी राजकारणात पडू नये

मागील काही दिवसांपासून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापैकी खरी शिवसेना कोणाची? यावरून रस्सीखेच सुरु असतानाच भायखळ्यातील शाखा क्रमांक २०८ चे शिवसैनिक बबन गावकर आणि विजय कामतेकर यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. मात्र पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नसल्याने या घटनेची गंभीर दखल घेत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे …

Read More »

सुप्रिया सुळे यांचा बंडखोर आमदारांना सवाल, आता कुठे गेला तुमचा स्वाभिमान? एक आमदार असणाऱ्याकडे १०५ आमदार असलेला नेता गेला

काल शिंदे-फडणवीस सरकारची पहिलीच राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी एक चिठ्ठी लिहून मुख्यमंत्री शिंदे यांना दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी खोचक शब्दात टीका करत बंडखोर आमदारांना …

Read More »

“त्या” निर्णयावर संजय राऊत यांचा सवाल, औरंगजेब अचानक नातेवाईक कसा झाला? तर हे हिंदूत्व आणि महाराष्ट्र द्रोही सरकार

राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारने पहिल्यांदाच राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेत महाविकास आघाडी सरकारने औरंगाबाद, उस्मानाबाद शहरांचे नामांतर आणि नवी मुंबईतील दि.बा. पाटील यांचे नाव देण्याच्या निर्णयासह पाच निर्णयांना स्थगिती दिल्यावरून शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

Read More »

अजित पवार यांचे केसरकरांना प्रत्युत्तर; प्रवक्ता म्हणून उचलली जीभ लावली टाळ्याला… जरा माहिती घेवून बोलावं असा माझा प्रेमाचा सल्ला

शिवसेनेतील छगन भुजबळ, नारायण राणे आणि राज ठाकरे यांच्या बंडामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे होते असा खळबळजनक आरोप बंडखोर शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकरांनी केला. केसरकरांच्या या आरोपावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी खोचक प्रत्युत्तर देत म्हणाले, दिपक केसरकर १९९२ मध्ये फार ज्युनियर होते. …

Read More »

५ वी आणि ८ वीची ‘ही’ परिक्षा पुढे ढकलली; अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी अर्ज करा शिक्षण विभागाची माहिती; अण्णाभाऊ साठे महामंडळाचे आवाहन

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. आठवी) २० जुलै २०२२ ऐवजी आता रविवार ३१ जुलै २०२२ रोजी घेण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत जाहीर करण्यात आले आहे. सद्यस्थितीत राज्यातील अनेक जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेली पूरसदृश्य स्थिती व काही ठिकाणी भुस्खलनामुळे वाहतूक बंद असल्याने विद्यार्थ्यांना दळणवळणास येणाऱ्या अडचणी तसेच …

Read More »

बाळ‌ासाहेब थोरात यांचा सवाल, ते निर्णय घेण्याचे फलित काय ? भाजपाच्या द्रौपदी मुर्मूंना शिवसेनेने दिलेला पाठिंबा जनतेला आवडला नाही..

शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून महाविकास आघाडीने घेतलेले निर्णय बदलण्याचे काम केल्याचे दिसून येते. जनतेतून सरपंच आणि नगराध्यक्ष निवडण्याचा निर्णय विद्यमान सरकारने घेतला पण तो घेण्याआधी त्याचे फलित काय? हे तपासणे आवश्यक होते. हा निर्णय जेव्हा पूर्वी झाला, तेव्हा नगरपालिका किंवा ग्रामपंचायत व्यवस्थित चालते आहे का? हे जर त्यांनी तपासले असते तर …

Read More »

मुंबईत आगमन झाल्यानंतर द्रौपदी मुर्मु म्हणाल्या; महाराष्ट्राने अनेक गोष्टी… द्रौपदी मुर्मू यांना महाराष्ट्रातून विक्रमी मते मिळतील एनडीएच्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना महाराष्ट्रातून एनडीएच्या मतांपेक्षाही अधिक मते मिळतील व विक्रमी मताधिक्य मिळेल, असा विश्वास गुरुवारी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदार असलेल्या खासदार व आमदारांशी संवाद साधण्यासाठी मुर्मू आल्या होत्या. …

Read More »

जयंत पाटील म्हणाले; कुणाला किती खाती, कुणाचे किती मंत्री यातच सरकारचा वेळ संकटात सापडलेल्या जनतेसाठी तात्काळ मदतकार्य सुरू करा

महाराष्ट्रातील जनतेसमोर निसर्गाने संकट उभे करुन मोठे प्रश्न निर्माण केले आहेत मात्र अजूनही सरकार जाग्यावर आलेले नाही त्यामुळे लवकरात लवकर सरकार स्थापन करुन लोकांना तात्काळ मदतकार्य सुरू करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे नांदेड दौऱ्यावर …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेले “हे” अन्य तीन निर्णय झेडपी अध्यक्ष, उपाध्यक्षांचा कालावधी, मोफत बुस्टर डोस योजना राबविण्याचा निर्णय

राज्यात नव्याने सत्तेवर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नसला तरी राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेत निर्णय घेण्याचा धडका लावण्यास सुरुवात केलेली आहे. आज झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाच्या पेट्रोल-डिझेलवरील करात कपात करण्याचा निर्णय घेतला. त्याशिवाय सरपंच, नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडूण देण्याचा निर्णय, …

Read More »

काँग्रेसचा टोला, पावसाने १०० वर मृत्यू, लाखो हेक्टर शेती पाण्याखाली अन् ‘सरकार’ बेपत्ता.. शिंदे-फडणवीसांच्या सत्तापिपासू वृत्तीमुळे महाराष्ट्र अनाथ

राज्यात शिंदे-फडणवीस सरकारला १५ दिवस झाले तरी अजून मंत्रिमंडळच अस्तित्वात आलेले नाही, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची दुचाकीच काम पहात आहे. राज्यात मुसळधार पावसाने थैमान घातले असून १०० वर लोकांचे मृत्यू झालेत तर लाखो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. शिंदे-फडणविसांच्या सत्तापिपासूवृत्तीमुळे सरकार स्थापन झाले असले तरी प्रत्यक्षात शासन व प्रशासन राज्यात …

Read More »