Breaking News

आपल्याच आमदारांवर अविश्वास का? म्हणणाऱ्या भाजपाकडूनही ‘ताज’वर व्यवस्था महाविकास आघाडीवर टीकास्त्र आशिष शेलार यांनी केले होते

राज्यसभेच्या ६ व्या जागेसाठी शिवसेनेकडून ४ था उमेदवार तर भाजपाकडून ३ रा उमेदवार जाहिर केल्यानंतर या निवडणूकीतील चुरस निर्माण झाली. खबरदारीचा उपाय म्हणून महाविकास आघाडीकडून त्यांच्या समर्थक आमदारांना पंचतारांकीत हॉटेलमध्ये स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतला. त्यावर भाजपाचे आमदार आशिश शेलार यांनी टीका केली. मात्र आता भाजपाकडूनही खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या सर्व …

Read More »

सह्याद्रीवरील ‘नमस्कार, आजच्या ठळक बातम्या’ भारदस्त आवाज लोपला ज्येष्ठ वृत्त निवेदक प्रदिप भिडे यांचे प्रदिर्घ आजाराने निधन

काही वर्षांपूर्वी दुरदर्शनवर मराठी बातम्यांना सुरुवात झाल्यानंतर ‘नमस्कार, आजच्या ठळक बातम्या’ अशी धीर गंभीर आवाजात सुरुवात करत बातम्या पाहणाऱ्या प्रेक्षकाला टिव्हीसमोर खिळवून ठेवणारे ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदिप भिडे यांचे आज मुंबईत वयाच्या ६४ व्या वर्षी आज निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी सुजाता आणि एक मुलगा, एक मुलगी, जावई व नातवंडे असा …

Read More »

१२ वीचा निकाल उद्या, पण पाहणार कोठे? ही आहेत संकेतस्थळे दुपारी एक वाजल्यापासून पाहता येणार ऑनलाईन निकाल

१२ वी परिक्षेचा निकाल कधी जाहिर होणार याबाबतची सर्व विद्यार्थी आणि पालकांमध्ये एकच उत्सुकता लागून राहिली होती. मात्र अखेर आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने १२ वी निकालाची तारीख जाहिर केली असून हा निकाल उद्या ८ जून २०२२ रोजी जाहिर करण्यात येणार आहे. दुपारी एक वाजल्यापासून हा …

Read More »

मेट्रो कारशेड वाद; केंद्राची न्यायालयात स्पष्टोक्ती, कांजूरची जागा आमचीच उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर

मेट्रो कारशेडवरून काहीही करून कांजूर मार्ग येथील जागेत उभारण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे आग्रही आहेत. तर दुसऱ्याबाजूला केंद्राच्या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी बीकेसीतील जागा न देण्याची भूमिका महाविकास आघाडीची आहे. या दोन्ही जागांवरून राज्य आणि केंद्र सरकारमध्ये संघर्षाची परिस्थिती निर्माण झालेली असतानाच आज केंद्र सरकारने कांजूर मार्गची जागा आमचीच असल्याचे …

Read More »

राज्यसभा निवडणूकीवरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे मोठे वक्तव्य आघाडीचा चौथा उमेदवार चांगल्या मतांनी विजयी होईल

महाविकास आघाडी अडचणीत वगैरे काही नाही. महाविकास आघाडीकडे बहुमत आहे. त्यामुळे आघाडीचा चौथा उमेदवार चांगल्या मतांनी विजयी होईल अशी खात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली. आज शरद पवार यांच्याशी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे बैठक झाल्यानंतर जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. अपक्षांशी विविधस्तरावर चर्चा …

Read More »

ओवेसींच्या प्रस्तावावर नाना पटोले यांचे प्रत्युत्तर, तेच लोक निमंत्रण देतील राज्यसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पटोलेंचा खोचक टोला

राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने एमआयएमचे प्रमुख तथा खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी महाविकास आघाडीने मागितली तर मदत देऊ अशी तयारी दाखविली. त्यामुळे आता ओवेसी यांच्या या प्रस्तावावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खोचक टोला लगावत म्हणाले की, एमआयएम पक्षाची ज्यांच्यासोबत युती असेल तो पक्ष तो पक्ष एमआयएमशी बोलेल असे स्पष्ट केले. राज्यसभा …

Read More »

अरब देशांकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यावरून संजय राऊत म्हणाले, ते भाजपाच्या अंगलट… नुपूर शर्मा आणि नविनकुमार यांच्या वक्तव्यामुळे भारताने माफी मागावी अशी मागणी

काही दिवसांपूर्वी एका खाजगी चॅनेटवरील चर्चे दरम्यान प्रेषित मंहमद यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिपण्णीचे पडसाद अरब राष्ट्रांमध्ये उमटले. तसेच त्या वक्तव्याप्रकरणी भारताने माफी मागावी अशी मागणी काही अरब राष्ट्रांनी करत अन्यथा भारतीय उत्पादीत मालांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला. त्यामुळे अखेर भाजपाने नुपूर शर्मा आणि नविनकुमार यांच्यावर निलंबन आणि निष्काषणाची कारवाई करण्यात आली. …

Read More »

ओवेसी म्हणाले, महाविकास आघाडीने मागितली तर मदत करू… भाजपाला हरविण्यासाठी मागितल्यास मदत करण्याची तयारी

राज्यसभा निवडणूकीत सहाव्या जागेवरील आपलाच उमेदवार निवडूण येण्यासाठी महाविकास आघाडी आणि भाजपाकडून अपक्ष आणि छोट्या पक्षांची मते मिळविण्यासाठी युध्द पातळीवर सर्व पध्दतीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र राज्यात छोट्या पक्षांच्या यादीत असलेल्या एमआयएम पक्षाचे दोन आमदार विधानसभेत आहेत. परंतु या पक्षांच्या दोन आमदारांच्या पाठिंबा महाविकास आघाडीला देण्याची तयारी दर्शविली असून मदत …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले शिक्षणापासून ते पाणी पुरवठ्या संदर्भात “हे” निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे याच्या अध्यक्षतेखालील बैठकीत

अपारंपरिक ऊर्जा निर्मिती धोरण २०२० अंतर्गत प्रोत्साहनात्मक सुधारणा महाऊर्जाकडील नोंदणीकृत ४१८ मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पांना कार्यान्वित करण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय ११ मे २०२२ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. या अनुषंगाने आज अपारंपरिक उर्जा निर्मिती धोरण २०२० अंतर्गत प्रोत्साहनात्मक सुधारणा करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी …

Read More »

पंतप्रधान मोदींशी बोला नाहीतर शेवटच्या पाच मिनिटांत मतदान करू राज्यमंत्री बच्चू कडूंचा आघाडी सरकारला इशारा

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनला पाठिंबा दिलेले आणि राज्य मंत्रिमंडळातील राज्यमंत्री बच्चू कडू यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इशारा दिला आहे. धान आणि हरभऱ्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींशी बोलून अनुदानाची व्यवस्था करावी अन्यथा, त्याचे परिणाम राज्यसभेच्या मतदानावर दिसतील, आम्ही राज्यसभेसाठी शेवटच्या पाच …

Read More »