सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात खाशाबा जाधव क्रिडा संकुलाचं उद्घाटन आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, आम्हीही काही ताम्रपट घेऊन आलो नाही. उद्या आणखी कुणी येईल, परवा कुणी येईल, पण आम्ही आहोत तोपर्यंत कामं …
Read More »करण जोहरची पार्टी आणि “या” बॉलीवूड सिताऱ्यांना कोरोनाची लागण शाहरूख खान, कैतरीना कैफ, कार्तिक आर्यन यांना कोरोना
काही दिवसांपूर्वी नुकतेच वयाची ५० गाठली म्हणून प्रसिध्द निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने वाढदिवस साजरा करण्यासाठी जंगी पार्टी दिली. ही पार्टी यशराज फिल्मसच्या स्टुडिओत दिली. आता करण जोहरची पार्टी म्हटलं की बॉलीवूडचे तारे-तारका येणारच. या पार्टीला हजर राहिलेला बॉलीवूड बादशहा शाहरूख खान, कैतरिना कैफ यांच्यासह अनेकांनी हजेरी लावली. या पार्टीतील जवळपास ५५ …
Read More »शाळा सुरु होणार का? शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले “हे” महत्वाचे वक्तव्य १५ जूनला शाळा सुरु होणार पण तत्पूर्वी एसओपी जाहिर करणार
मुंबईसह राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढण्यास सुरुवात झाली आहे. आता तर राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने हजाराची संख्याही पार केली. त्यातच राज्यातील शाळा १५ जूनपासून सुरु होणार असल्याची घोषणा यापूर्वी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. त्याअनुषंगाने एकाबाजूला शाळा सुरु होण्याची तारीख जवळ येत असतानाच दुसऱ्याबाजूला कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या …
Read More »भाजपा म्हणते, शिवसेनेच्या संजय चा पराभव अटळ ब्लूप्रिंट तयार असल्याचा आमदार अॅड आशिष शेलार यांचा सूचक इशारा
महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठविण्यात येणाऱ्या ६ जागांसाठी निवडणूक जाहिर झाली आहे. या निवडणूकीत काहीही करून महाविकास आघाडीने आपला चवथा तर भाजपाने तिसरा उमेदवाराची जागा जिंकायचीच असा निश्चय केल्याचे दिसून येत आहे. यापार्श्वभूमीर भाजपाचे केंद्रीय निवडणूक निरिक्षक अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली आज भाजपाच्या नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर बोलताना भाजपाचे आमदार अॅड आशिष …
Read More »देवेंद्र फडणवीस आजारी असल्याचे कळताच संजय राऊत यांनी केले “हे” ट्विट फडणवीसांना कोरोनाची लागण
भाजपाच्या हाता तोंडाशी असलेल्या सत्तेचा घास काढून घेत शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. त्यानंतर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत आणि भाजपाच्या नेत्यांमध्ये नेहमीच आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडायला सुरुवात झाली. त्यातच संजय राऊत यांच्या टीकेमुळे तर दस्तुरखुद्द भाजपाचे नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष …
Read More »मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, निसर्ग जपला तरच शाश्वत विकास शक्य माझी वसुंधरा अभियान 2.0 अंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था आणि अधिकाऱ्यांचा सन्मान
वातावरणात होत असलेल्या बदलांमुळे विविध आपत्तींना तोंड द्यावे लागत आहे. निसर्गाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे वसुंधरेची जपणूक करून शाश्वत विकासाकडे वाटचाल करावी लागणार आहे. यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपण सर्वजण मिळून ही जबाबदारी पार पाडूया, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. वातावरणीय बदलाचे दुष्परिणाम रोखण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने …
Read More »घराणेशाहीवरून काँग्रेसने दाखविला पंतप्रधान मोदी यांना आरसा मोदींना त्यांच्याच वक्तव्याची आठवण करून देत दाखविला आरसा
२०१४ सालापासून काँग्रेसवर घराणेशाहीवरून गांधी घराण्यावर तेव्हाचे मुख्यमंत्री आणि आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सातत्याने टीकेची झोड उठविली जात आहे. मात्र यावेळी काँग्रेसने एका वृत्ताचा हवाला देत भाजपामधील २५ टक्के उमेदवार हे कसे घराणेशाहीतून आल्याचा आरसा दाखवित त्या घराणेशाहीबाबतचे उत्तर द्या अशी मागणीही काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एका ट्विटद्वारे …
Read More »केंद्राकडून नुकसान भरपाई बंद होणार, मविआला चिंता तुटीची रक्कम आणायची कोठून? १ जुलैपासून केंद्राकडून मिळणारी नुकसान भरपाई बंद होणार
एक देश एक कर या घोषणेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ जुलै २०१७ रोजीपासून देशात जीएसटी करप्रणाली लागू केली. त्यावेळी केंद्र सरकारने जारी केलेल्या घोषणेनुसार येत्या १ जुलै २०२२ रोजी पासून या जीएसटी कराच्या बदल्यात राज्यांना मिळणारी नुकसान भरपाईची रक्कम केंद्र सरकारकडून बंद करण्यात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्राला मिळणारी महिन्याकाठची …
Read More »आरोग्य विभागाचे सर्व आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना पत्र; काय आहे पत्रात? वाचा आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढवा; कोविड लसीकरणाला पुन्हा गती द्या
कोविड बाधित रुग्णांची गेले काही दिवसांत वाढत असलेली संख्या पाहता आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या आणि लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिल्या आहेत. डॉ. व्यास यांनी याबाबत राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, …
Read More »उत्तर भारतासह विदर्भात उष्णतेची लाट आणखी दोन दिवस आणखी राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज
नैर्ऋत्य मोसमी पावसाचा प्रवास सुरू असतानाच देशात सध्या पाऊस आणि तापमानवाढीचे परस्परविरोधी वातावरण आहे. जम्मू ते विदर्भापर्यंत उष्णतेची लाट आली असताना पूर्वोत्तर भागातील राज्ये आणि दक्षिणेकडील भागात सध्या मोसमी पाऊस पावसाने जोर धरला आहे. उत्तर भारतासह विदर्भातील उष्णतेच्या लाटेची स्थिती आणखी दोन दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त …
Read More »
Marathi e-Batmya