Breaking News

संजय राऊत म्हणाले, दिलेला शब्द पाळला नाही म्हणून शिवसेना देखील… भाजपाने विरोधी म्हणून तयारी करावी

परंतु त्यांची (भाजपा) जी वृत्ती होती, याचा मी एक फार मोठा अभ्यासक आहे. त्यामुळे मला माहीत आहे की हे काय करू शकतात, हे काय करणार हे मी आताही सांगू शकतो. दिलेला शब्द पाळला नाही म्हणून शिवसेना देखील या महाराष्ट्रात एक वेगळी भूमिका घेऊ शकते हे दाखवून द्यायचे होते. तसेच हे …

Read More »

शिवराज्याभिषेक दिनी शिवस्वराज्य दिन “अशा” पध्दतीने साजरा होणार राज्यात ६ जून "शिवस्वराज्य दिन" म्हणून साजरा

राज्यात सोमवार ६ जून रोजी “शिवस्वराज्य दिन” साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी राज्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये सकाळी सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन त्यास अभिवादन करून राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताचे गायन करण्यात येईल. सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. छत्रपती …

Read More »

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मास्क सक्तीवरून केला “हा” खुलासा मस्ट म्हणजे बंधनकारक नव्हे तर ते आवाहन म्हणूनच घ्या

राज्यातील वाढत्या कोरोना बाधितांच्या संख्येतील वाढीवरून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी टास्क फोर्ससोबत काही दिवसांपूर्वी आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर लगेच राज्याच्या आरोग्य विभागाने एक परिपत्रक काढत बंदिस्त असलेल्या ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक असल्याचे त्यात नमूद केले. यावरून संभ्रमावस्था निर्माण झालेली असताना यावर आता आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी खुलासा केला …

Read More »

प्रदूषण रोखूया.. चला ‘ईव्ही’ वापरूया वातावरणीय बदल आणि पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर खास लेख

वातावरणीय बदलांचे दुष्परिणाम रोखण्यासाठी शासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. यामधील ए‍क म्हणजे राज्याचे इलेक्ट्रीक वाहन (ईव्ही) धोरण. राज्य शासनाने या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे. चला आपणही ईव्ही वापरून या प्रयत्नांना हातभार लावूया… वातावरणीय बदलांचे गंभीर परिणाम आता जगभरातील नागरिक अनुभवत आहेत. उष्णतेमधील वाढ, वारंवार येणारी चक्रीवादळे, अतिवृष्टी …

Read More »

खरीप हंगामातील शेत पिकांसाठी ही बियाणे उपलब्ध राज्यात खते, बियाणांचा तुटवडा नाही

खरीप हंगाम २०२२ मध्ये कापूस पिकासाठी सर्वसाधारणपणे १.७१ कोटी बियाणांच्या पाकिटांची आवश्यकता असते. राज्यात कापूस पिकाच्या एकूण क्षेत्रापैकी बीटी कापसाचे ९८ टक्के क्षेत्र असून, बीटी कापसाच्या बियाणांची २.०१ कोटी पाकिटे उपलब्ध आहेत. सोयाबीन पिकासाठी एकूण ३४.५ लाख क्विंटल बियाणांची आवश्यकता आहे. सध्या सोयाबीनचे ४८.८२ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. याचाच अर्थ चालू वर्षी कापूस, सोयाबीन बियाणांचा कोणत्याही प्रकारचा तुटवडा भासणार नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनी …

Read More »

शरद पवार म्हणाले, केंद्रात कोणताही प्रश्न आला तर महाराष्ट्रासाठी एकच व्यक्ती म्हणजे… दूरगामी दृष्टी, संकल्प आणि तंत्रज्ञानाधिष्ठीत उपायोजना ही साखर उद्योगासाठी त्रिसूत्री

सद्यस्थितीत महाराष्ट्रात निर्माण होणाऱ्या कोणत्याही प्रश्नावर केंद्र सरकारमध्ये नितीन गडकरी भक्कमपणे महाराष्ट्राच्या मागे उभी असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कौतुक केले. पुण्यात वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने राज्यस्तरीय साखर परिषद २०२२ चं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्या उपस्थितीत …

Read More »

इथेनॉल निर्मिती शेतकऱ्यांना समृद्ध केल्याशिवाय राहणार नाही पुण्यात इथेनॉलचे पंप सुरू करा-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कृषी आणि ग्रामीण क्षेत्रात क्रांतीची गरज आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत कृषी आणि निगडीत क्षेत्राचे प्रमाण केवळ १२ टक्के आहे. शेतकरी संपन्न झाल्याशिवाय देशाच्या प्रगतीत अनेक अडचणी आहेत. आकांक्षित जिल्ह्यातही शेतीला समृद्ध केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. यादृष्टीने साखर उद्योग हा कृषी आणि ग्रामीण क्षेत्राच्यादृष्टीने महत्वाचा …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, अडचणीत असलं की शरद पवार फोन करतात अन्… वसंतदादा साखर इन्स्टिट्यूटमधील साखर परिषद-२०२२ चे उद्घाटन

साखर परिषद-२०२२ च्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मान्यवर आज उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले की, जेव्हाही संकट असते तेव्हा शरद पवार हे फोन करतात अन् विचारतात, काय चालले आहे, काय करताय …

Read More »

अजित पवार म्हणाले, मारुती राया देखील म्हणत असतील माझा जन्म कुठं झाला पिंपरी-चिंचवड येथील राष्ट्रवादीच्या सभेत अजित पवारांची टोलेबाजी

सध्या भावनेला मारक निर्णय होऊ लागले आहेत. त्याला आपण विरोध करायला हवा. सध्याच्या वादानंतर मारुती राया देखील म्हणत असतील माझा जन्म कुठं झाला ते मला माहित आहे, तुम्ही का भांडताय? कोण म्हणतंय कर्नाटक, कोण म्हणतंय नाशिक, कोण म्हणतंय यूपीत…ठीक आहे, झाला असेल.. पण ते मारुती रायाच आहेत. कुठलंतरी वेगळं सांगून …

Read More »

मुंबईसाठी पुढील दोन आठवडे महत्वाचे कोरोना चाचण्या वाढवा, आयुक्त चहल यांचे निर्देश

मुंबईत गेल्या काही दिवसांमध्ये कोविड विषाणू बाधितांची संख्या वाढली आहे. वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेला संभाव्य चौथ्या लाटेचा इशारा लक्षात घेता आणि पावसाळा सुरू होणार असल्याने जलजन्य आजारांची शक्यता पाहता आरोग्य यंत्रणेसह विभाग कार्यालये व सर्व संबंधित खात्यांनी सुसज्ज राहावे. त्याचप्रमाणे कोविड संसर्ग वेळीच रोखण्यासाठी बाधितांचा शोध घेता यावा म्हणून चाचण्यांची संख्या …

Read More »