Breaking News

मुंबईतील “हे” वार्ड झाले महिला आणि अनुसूचित जाती-जमातीसाठी आरक्षित २३६ पैकी ११८ आरक्षित जागांसाठीचे ‘आरक्षण निर्धारण’ व सोडत संपन्न

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार ‘बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक – २०२२’ करिता २३६ प्रभागांपैकी ११८ प्रभाग आरक्षित असून, यासाठीचे ‘आरक्षण निर्धारण’ व सोडत आज काढण्यात आली. वांद्रे (पश्चिम) परिसरात असणा-या रंगशारदा नाट्यगृह येथील विद्याधर गोखले सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला महानगरपालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम …

Read More »

३८९४ गिरणी कामगारांना १५ जूनपर्यंत घरे वाटप करा - उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची म्हाडाला सूचना

म्हाडाच्या लॉटरीतील लाभार्थी गिरणी कामगारांच्या ३८९४ तयार घरांचे देकारपत्रे १५ जूनपर्यंत देण्यात यावीत. तसेच प्राप्त अर्जांची छाननी तात्काळ सुरू करावी अशा सूचना विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज म्हाडाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. गिरणी कामगारांच्या घर वाटप व त्यांच्या पुनर्वसन संदर्भातील अडचणीं जाणून घेण्यासाठी विधानभवनात आयोजित बैठकीत डॉ. गोऱ्हे बोलत …

Read More »

परिचारीकांच्या आंदोलनाबाबत मंत्री अमित देशमुख यांचे मोठे विधान आंदोलन मागे घेऊन कामावर रुजू होण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे आवाहन

वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत काम करणाऱ्या राज्यातील विविध परिचारिकांनी आपल्या मागण्या पूर्ण होण्यासाठी आंदोलन सुरु केले आहे. त्यांच्या मागण्यांसंदर्भात शासन सकारात्मक विचार करणार असून परिचारिकांनी आपले आंदोलन मागे घेऊन कामावर रुजू होण्याचे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी केले. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज महाराष्ट्र …

Read More »

पडळकरांची पवारांवर खोचक टीका, त्यांना लेकीची अन् नातवाची काळजी… अहिल्यादेवींच्या जयंतीदिवशीच चौंडीत पवार विरूध्द पडळकर-खोत संघर्ष

त्यांचा बुरखा फाडण्यात आम्ही गेल्या दोन वर्षात यशस्वी झालो आहोत. त्यांना आता आपल्या लेकीची, नातवाची काळजी लागली आहे. पुढे त्यांना लोक जोडायचे आहेत. आम्ही या महापुरुषासाठी काहीतरी करत आहोत असं दाखवण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. मी हिंदू आहे हे म्हातारपणी सांगण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. मी हनुमान मंदिरात जाऊन माझ्या …

Read More »

या कलावंताना जाहिर झाला लता मंगेशकर, भीमसेन जोशी, पणशीकर, नारायणगांवकरसह हे पुरस्कार विविध सांस्कृतिक पुरस्कारांची सांस्कृतिक कार्य मंत्र्यांकडून घोषणा

सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत देण्यात येणाऱ्या विविध सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आज मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. या पत्रकार परिषदेदरम्यान विविध पुरस्कार घोषित करीत असतानाच चित्रपट, नाटक आणि संगीत यांचे समीक्षण करणाऱ्यांचाही सन्मान करण्याचा शासनाचा विचार असल्याचेही यावेळी मंत्री देशमुख यांनी सांगितले. महाराष्ट्रातील गायन आणि संगीत …

Read More »

शरद पवार म्हणाले, रोहितच्या कामात मला… जिजामाता, सावित्रीबाई फुले आणि अहिल्याबाई यांची तुलना करणार नाही पण...

आजचा हा ऐतिहासिक सोहळा आहे. अहिल्याबाईंची जयंती आणि यानिमित्ताने त्यांनी उभ्या आयुष्यात जे कर्तृत्व दाखवलं ते नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम या कार्यक्रमाच्या निमित्ताने होत आहे. या देशात अनेक मान्यवर महिला होऊन गेल्या. पण साधारणत: तीन महिलांची आठवण ही देशात ठिकठिकाणी काढली जाते. राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले आणि अहिल्यादेवी होळकर असे …

Read More »

उच्च न्यायालय म्हणाले, उमर खालीदचे “ते” वक्तव्य दहशतवादी कृत्य ठरत नाही ते वक्तव्य जरी आवडले नसले किंवा वाईट वाटणारे असले तरी

मागील वर्षी फेब्रुवारी २०२० मध्ये जेएनयुचा विद्यार्थी तथा कार्यकर्ता उमर खालीद यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी दहशतवादी कृत्यात मोडणारे असल्याचा आरोप ठेवून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला. मात्र उमर खालीद याचे वक्तव्य जरी न आवडणारे, वाईट वाटणारे अशा पध्दतीत मोडत असले तरी त्या वक्तव्याने खालीद हा दहशतवादी असल्याचे ठरत नाही …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, प्रयत्न पक्षभेद विसरून आणि राजकारणविरहित… पक्षभेद, राजकारण विसरून लोकांपर्यंत लाभ पोहचविणे महत्वाचे

योजना केंद्राच्या असोत किंवा राज्यांच्या असोत, त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचण्यासाठी राज्याच्या यंत्रणेचे मोठे योगदान असते. हे प्रयत्न पक्षभेद विसरून आणि राजकारणविरहित झाले पाहिजेत. मला आनंद व समाधान आहे की, या योजना राज्य, जिल्हा, तालुका पातळीवर प्रशासकीय यंत्रणेने नियोजनपूर्वक लाभार्थींपर्यंत यशस्वीरित्या पोहचविल्या असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. विविध केंद्रीय योजनांचा लाभ …

Read More »

गृहमंत्री वळसे-पाटील म्हणाले, हनुमानाच्या जन्मवादापेक्षा… केंद्राच्या नोटबंदी धोरणात मोठी चूक - दिलीप वळसे पाटील

नुकतेच रिझर्व्ह बँकेने आपला अहवाल जाहिर केला आहे. या अहवालानुसार देशातंर्गत चलनात असलेल्या २ हजार रूपयांच्या खऱ्या नोटा गायब होवून बनावट नोटा चलनात आल्याची बाब नमूद करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणि केंद्र सरकारला यावरून निशाणा साधत नोटबंदीने काय साधले असा सवाल केला. वाचा …

Read More »

आपच्या दुसऱ्या मंत्र्याला ईडीकडून अटक पंजाबनंतर दिल्लीतील आरोग्य मंत्री जैन अटक केली

काही दिवसांपूर्वी पंजाबमध्ये पहिल्यादाच सत्तेत आलेल्या एका मंत्र्याला लाच घेताना अटक केल्याचे उदाहरण ताजे असतानाच आज ई़डीने केलेल्या कारवाईत आम आदमी पार्टीच्या दिल्ली सरकारमधील आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना अटक केली. दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने अटक केली आहे. कोलकाता येथील एका कंपनीसोबत हवाला व्यवहार केल्याचा …

Read More »