कोरोना रुग्णांमध्ये संथपणे वाढ दिसत असून राज्यातील जनतेने मास्क वापरावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या माध्यमातून जनतेला केले. राज्याची साप्ताहिक पॉझिटीव्हीटी १.५९ टक्के असून मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्ये राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त पॉझिटीव्हीटी आढळते. मुंबईत रुग्णसंख्येत ५२.७९ टक्के वाढ झाली असून ठाण्यामध्ये २७.९२ टक्के तर …
Read More »अनिल परब म्हणाले, जे रिसॉर्ट माझे नाही त्यावरून ईडीच्या धाडी, न्यायालयात जाणार ईडीचे अधिकारी गेल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली माहिती
दापोली येथील कथित रिसॉर्टप्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी आज राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या शासकिय निवासस्थानासह त्यांच्याशी संबधित सात ठिकाणांवर छापे मारी केली. जवळपास १२ तासाहून अधिक काळ ईडीच्या अधिकाऱ्यांनी अनिल परब यांच्याकडील सर्व कागदपत्रांची आणि चौकशी केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अनिल परब म्हणाले, दापोलीतील जे रिसॉर्ट आहे. त्या रिसॉर्टची मालकी …
Read More »नाना पटोलेंची टीका, नरेंद्र मोदी सरकारचा पायाच खोटेपणावर उभारलेला मोदी सरकारच्या ८ वर्षांच्या कारभारामुळे देश ५० वर्षे मागे गेला : नाना पटोले
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारची मागील ८ वर्षांतील कामगिरी सर्वच आघाडीवर शून्य राहिली आहे. महागाई प्रचंड वाढलेली आहे, जनतेसमोर जीवनमरणाचा प्रश्न उभा ठाकला आहे, बेरोजगारी ४५ वर्षांतील सर्वात जास्त आहे. रुपयाची ऐतिहासिक घसरण झाली, अर्थव्यवस्था गटांगळ्या खात आहे. तर मागील ८ वर्ष ही खाजगीकरणातून मोदींचे उद्योगपती मित्र मात्र मालामाल आणि जनतेचे …
Read More »चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर अजित पवारांचा इशारा, आम्ही पण खूप काही बोलू शकतो… महाराष्ट्राची संस्कृती ती नाही
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अतिशय चुकीचे वक्तव्य केले असून महाराष्ट्राची ती संस्कृती नाही. आम्ही पण खूप काही बोलू शकतो, पण आपल्या संस्कृतीचा विचार करुन गप्प बसतो असा गर्भित इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आयोजित जनता दरबारानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. चंद्रकांत पाटील यांचे ते वक्तव्य त्यांच्या …
Read More »चंद्रकांत पाटील म्हणाले, सुप्रिया सुळेंना ग्रामीण भाषेत बोलण्याचा आनंद झाला तिसरी जागाही निवडूण आणू शकतो
भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वाने आदेश दिला तर प्रदेश भाजपा राज्यसभेची तिसरी जागा लढवेलही आणि जिंकेलही असा आत्मविश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी मुंबईत प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. भाजपाचे विधानसभेतील संख्याबळ ध्यानात घेता राज्यसभा निवडणुकीत पक्षाचे दोन उमेदवार सहज निवडून येतात. त्याखेरीज अतिरिक्त मतांच्या जोरावर भाजपा तिसरी …
Read More »अजित पवारांनी सांगितली व्हॅट करातून केंद्राला दिलेल्या महसूलाची आकडेवारी राज्याच्या तिजोरीवर परिणाम झाला
व्हॅटचा निर्णय घेत असताना सरकारने रक्कम कमी केली. त्यात २४०० कोटी रुपयांचा महसूल सोडावा लागला. मुल्यवर्धित कपातीमुळे राज्याच्या तिजोरीवर परिणाम झाला आहे असे असताना विरोधक अजून कपात केली पाहिजे असे बोलत आहे. परंतु राज्य सरकारने जेवढं शक्य आहे तेवढं करण्याचा प्रयत्न केल्याची राज्य सरकारची भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज …
Read More »सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; देहविक्रय हा ही “एक व्यवसाय” देहविक्रय करणाऱ्या महिलेवर कारवाईचा अधिकार नाही
वर्षानुवर्षे समाजातील देहविक्रय करणाऱ्या महिलांबाबत सातत्याने तिरस्काराच्या भावनेने बघितले जात आहे. तसेच हा व्यवसाय करणाऱ्यांना बेकायदेशीर व्यवसाय करत असल्याच्या कारणावरून पोलिसांकडूनही कारवाई करण्यात येत होती. मात्र यासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयाने कायद्याची स्पष्ट भाषेत व्याख्या करत देहविक्रय करणाऱ्या महिलांवर कायदेशार कारवाई करण्याचा अधिकार पोलिसांना नसल्याचे मत वक्त केले. तसेच देहविक्रय हा …
Read More »संजय राऊत म्हणाले, धाडी टाकल्याने निवडून येतील असे वाटत असेल तर… राज्यसभेसाठी संजय राऊत आणि संजय पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला
नियोजित कार्यक्रमानुसार राज्यसभेच्या निवडणूकीकरीता शिवसेनेकडून प्रवक्ते संजय राऊत आणि कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार हे दोघेही आज आपले अर्ज भरणार होते. तत्पूर्वीच राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या शासकिय निवासस्थानासह त्यांच्याशी संबधित सात ठिकाणी ईडीने धाडी टाकल्या. यापार्श्वभूमीवर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांना विचारले असता ते म्हणाले की, भाजपाकडून दबावतंत्र सुरू …
Read More »शिवसेना मंत्री अनिल परब यांच्यावर अखेर ईडीची धाड शासकिय निवासस्थानासह सात ठिकाणी टाकले छापे
जवळपास मागील एक वर्षापासून भाजपाचे किरीट सोमय्या हे शिवसेनेचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर ईडीची कारवाई होणार होणार असल्याचे सातत्याने सांगत होते. त्यानुसार आज सकाळीच परिवहन मंत्री अनिल परब यांचे शासकिय निवासस्थान असलेल्या अंजिक्यतारा बंगल्यासह सातवे ठिकाणी ईडीने छापे टाकले. त्याचबरोबर दापोली रिसॉर्टसाठी पुण्यातील साठे नामक व्यक्तीकडून जमिन खरेदी केली …
Read More »हेल्मेट सक्तीप्रकरणी आमदारांनीच केली गृह राज्यामंत्र्यांकडे तक्रार वाहतूक पोलिसांकडून होणाऱ्या दंड वसुलीच्या तक्रारींची गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतली दखल
राज्यात हेल्मेट सक्ती व विविध कारणांकरिता वाहतूक पोलिसांकडून दंड वसुली केल्या जात असल्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधींकडून प्राप्त होत आहेत. या तक्रारींच्या अनुषंगाने राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांसमवेत दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठक घेणार असल्याचे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. आमदार प्रकाश आबिटकर यांनी राज्यात वाहतूक पोलिसांकडून चुकीच्या पद्धतीने दंड वसुली …
Read More »
Marathi e-Batmya