मुंबई: प्रतिनिधी आज केंद्राने सर्व जबाबदारी स्वीकारली आहे. मात्र ‘देर आये दुरुस्त आये’ असा टोला लगावत उशिरा का होईना केंद्राला निर्णय घ्यावा लागलाय. आता राज्यांना व लोकांना लस पुरवठा मागणीनुसार होईल अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केली. नेहमीप्रमाणे रात्री ८ वाजता पंतप्रधान …
Read More »मोफत लसीकरण: सर्वोच्च न्यायालयाच्या फटकाऱ्यानंतर मोदींकडून दोन मोठ्या घोषणा २१ जून २०२१ पासून १८ वर्षावरील व्यक्तींना मोफत लस
नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर देशात निर्माण झालेल्या धक्कादायक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्वच उच्च न्यायालयांनी आणि सर्वोच्च न्यायालयांनी राज्य सरकारबरोबरच केंद्र सरकारला धारेवर धरले. इतके नव्हे तर सर्वोच्च न्यायालयाने कोरोना लसीकरणाबाबत केंद्र सरकारने काय धोरण आखले आहे याची कार्यालयीन टिपणे आणि कागदपत्रेच सादर करण्याचे आदेश देत लस खरेदीतील केंद्रासाठी …
Read More »शाळांकडून होत असलेल्या फी लुटमारीला बसणार चाप शालेय शिक्षण विभागाच्या विभागीय शुल्क नियामक समित्यांची स्थापना
मुंबई : प्रतिनिधी गेल्या वर्षभरामध्ये कोरोनामुळे शाळा बंद असतानासुद्धा अनेक शाळांनी फी वाढ केल्याबाबतच्या अनेक तक्रारी शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांच्याकडे येत होत्या. अशा फी वाढीबाबत न्याय मागण्याची तरतूद ’महाराष्ट्र शैक्षणिक शुल्क विनियमन अधिनियम, 2011 (2014 चा महा.7) च्या पोटकलम ७ च्या पोटकलम (1)’ याद्वारे कायद्याने प्रदान करण्यात आली आहे. परंतु अशा समित्या अस्तित्वात नसल्याने पालकांना दाद …
Read More »शैक्षणिक संस्था, खाजगी शिकवणी, धार्मिकस्थळांसह याबाबत जिल्हापातळीवर निर्णय ‘ब्रेकिंग द चेनसाठी बंधनांचे विविध स्तर’ संदर्भात स्पष्टीकरण
मुंबई : प्रतिनिधी ‘ब्रेकिंग द चेन’साठी शासनाने ४ जून, २०२१ रोजी प्रसृत केलेल्या आदेशांबाबत आणखी स्पष्टीकरण करणारे एक परिपत्रक आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागातर्फे जारी करण्यात आले आहे. लोकल रेल्वेने प्रवास करण्यावर बंधने घालण्यासंदर्भात आणखी स्पष्टीकरण या परिपत्रकात देण्यात आले आहे. या बंधनांसंदर्भात प्रशासन आणि सामान्यांच्या मनातील शंकांचे प्रश्नोत्तराच्या स्वरूपात नऊ मुद्दयांचे स्पष्टीकरण …
Read More »कुठेही गर्दी, आरोग्याचे नियम तोडलेले चालणार नाही अन्यथा मोठे आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जिल्हाधिकारी, आयुक्तांना स्पष्ट सूचना
मुंबई : प्रतिनिधी कोरोनाचे आव्हान संपलेले नाही. ब्रेक दि चेनमध्ये आपण जे निकष आणि पाच पातळ्या (लेव्हल्स) ठरविल्या आहेत. त्यावर स्थानिक प्रशासनाने विचार करून निर्बंधांच्याबाबतीत निर्णय घ्यायचा आहे. कुठेही सरसकट निर्बंध शिथील करण्यात आलेले नाहीत. तसेच कोणत्याही लेव्हलमध्ये कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक कार्यक्रम, समारोह यासाठी गर्दी होणार नाही याची काटेकोर काळजी …
Read More »लॉकडाऊन असा हवा की विषाणूमुळे नॉकडाऊन व्हायची वेळ येऊ नये मुख्यमंत्र्यांनी घेतली कोविड संदर्भात प्रमुख उद्योजक आणि चित्रपट-दूरचित्रवाणी निर्मात्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक
मुंबई : प्रतिनिधी राज्यात कोविडची दुसरी लाट आल्यानंतर राज्यातील सर्व प्रकारच्या चित्रीकरणाला बंदी करण्यात आली होती. मात्र आता कोविड रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याने राज्यात अनलॉक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. निर्मात्यांनी राज्य शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असून चित्रीकरणासाठी सावधानता आणि खबरदारी पाळायची आहे. तसेच ब्रेक दि चेन मधील नव्या वर्गवारी प्रमाणे …
Read More »सेसच्या नावाखाली दरोडेखोरी करणाऱ्या मोदी सरकारच्या विरोधात आंदोलन राज्यात एकाचवेळी एक हजार ठिकाणी आंदोलन करणार-नाना पटोले
मुंबई : प्रतिनिधी युपीए सरकार असताना पेट्रोलवर एक्साईज ड्युटी ९.४८ रुपये होती ती आज ३२.९० रुपये म्हणजे २५८ टक्के आहे. तर डिझेलवर ३.५६ रुपये होती ती आज ३१.८० रुपये म्हणजे ८२० टक्के वाढ. या एक्साईज ड्युटीतून मोदी सरकारने गेल्या ७ वर्षात तब्बल २० ते २५ लाख कोटी रुपयांची लुटमारी केली. …
Read More »कोरोना दिलासादायक बातमी: राज्याचा रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांवर तीन महिन्यानंतर आज प्रथमच सर्वात कमी कोरोना रुग्णांचे निदान
मुंबई : प्रतिनिधी राज्याचे कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) गेल्या तीन महिन्यात आज प्रथमच ९५ टक्क्यांवर गेले आहे. आज दिवसभरात कोरोनाचे २१ हजार ७७६ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले. आतापर्यंत एकूण ५५ लाख २८ हजार ८३४ जण कोरोना मुक्त झाले आहेत. दरम्यान, तीन महिन्यात आज प्रथमच सर्वात …
Read More »जाणून घ्या ब्रेक दि चेनअंतर्गत कोणते जिल्हे कोणत्या गटात सरसकट शिथिलता नाही, स्थानिक प्रशासन निकषानुसार निर्णय घेणार
मुंबई: प्रतिनिधी ब्रेक दि चेनचे आज काढण्यात आलेले आदेश हे निर्बंध हटविण्यासाठी नसून निर्बंधांबाबत विविध पाच पातळ्या (लेव्हल्स) निश्चित करण्यासाठी आहेत. या पातळ्यांच्या आधारे सबंधित स्थानिक प्रशासन आपापल्या भागासाठी निर्बंधांबाबत योग्य तो निर्णय घेईल.या सुचना प्रशासनासाठी आहेत, स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण त्या प्रमाणे निर्णय घेईल. कुणीही गोंधळू नये व इतरांना …
Read More »चंद्रकांत पाटील म्हणाले अजित पवारांना माहिताय झोपेत सरकार कशी करतात ते अजित पवारांना दिले प्रतित्तुर
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावलेल्या टोल्याला प्रतित्तुर देत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, अजित पवारांना झोपेत सरकार कशी करतात ते माहिती आहे. पण टिकवता येत नाही. ५४ आमदारांच्या सह्यांच पत्र ड्रावरमधून कोणी काढलं? राज्यपालांना कुणी सांगितलं की ५४ आमदारांचा पाठिंबा आहे, अशाप्रकारे …
Read More »
Marathi e-Batmya