Breaking News

देशातील १३ विमानतळांचे पीपीपी पध्दतीने खाजगीकरण ३१ मार्चपर्यंत पीपीपी मॉडेलवर लागणार बोली

मुंबईः प्रतिनिधी केंद्र सरकार आपल्या मालकीच्या अनेक कंपन्यांचे खाजगीकरण करत आहे. आता विमानतळांचेही खाजगीकरण करण्यात येणार आहे. सरकारला आपल्या मालकीची एअरपोर्ट अॅथॉरिटी ऑफ इंडिया (AAI) द्वारे संचालित १३ विमानतळे मार्च २०२१ पर्यंत खाजगी हातात सोपवायची आहेत. याबाबत एएआयचे अध्यक्ष संजीव कुमार म्हणाले की, आम्ही सार्वजनिक खाजगी भागीदारी (पीपीपी) मॉडेलवर बोली …

Read More »

आता सरकारी आणि आवश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही दोन लसमात्रा बंधनकारक अन्यथा प्रवासाला मज्जाव- राज्य सरकारकडून नवे अध्यादेश

मुंबईः प्रतिनिधी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या विविध विभागात कार्यरत कर्मचारी व अत्यावश्यक सेवेत काम करणारे कर्मचारी यांना आता दोन लसींची मात्रा घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. जर या कर्मचाऱ्यांनी दोन लस मात्रा आणि १४ दिवासांचा कालावधी पूर्ण केला नसेल तर आता अशा कर्मचाऱ्यांना रेल्वे लोकल प्रवासासह अन्य …

Read More »

माझी मुलगी गुन्हेगार आहे का? वानखेडेने मर्यादीत अधिकारात रहावे नवाब मलिकांचा समीर वानखेडेवर आणखी एक गंभीर आरोप

मुंबईः प्रतिनिधी समीर वानखेडे यांनी मुंबई पोलिसांकडे माझी कन्या निलोफर मलिक हिचे कॉल डिटेल्स मागितले होते असा खबबळजनक आरोप करत अशी खाजगी माहिती काढण्याचा अधिकार त्याला नाही त्याने मर्यादित अधिकाराने राहिले पाहिजे असा इशारा नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांना देत माझी मुलगी गुन्हेगार आहे का? असा सवाल करत कॉल …

Read More »

समीर वानखेडे किंवा त्यांच्या वडीलांनी त्याच्या जातीचा दाखला पुढे आणावा ख्रिश्चन आणि मुस्लिम आपली जात बदलत असतील तर त्यांची जात समाप्त होते :कायद्यात तरतूद

मुंबई: प्रतिनिधी ‘स्पेशल -२६’ असे ट्वीट करुन लगेच राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन एनसीबी अधिकार्‍यांच्या फर्जी कारवाईचा पर्दाफाश केला. आज ट्वीटरच्या माध्यमातून नवाब मलिक यांनी एनसीबीच्या अधिकार्‍याने नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर दिलेले एक पत्र शेअर करुन पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली. …

Read More »

शाळा आणि महाविद्यालयांना दिवाळीची २० दिवस सुट्टी शिक्षण विभागाकडून आदेश जारी

मुंबईः प्रतिनिधी मागील जवळपास वर्ष-दिडवर्षापासून बंद असलेल्या शाळा, महाविद्यालये आता कुठे सुरु होत असताना नेमका दिवाळीचा सण आल्याने दिवाळीची सुट्टी किती दिवस द्यायची यावरून शिक्षण विभाग संभ्रमात होते. मात्र आज अखेर मुंबईतील शिक्षण विभागाने एक पत्रक काढत राज्यातील शाळा आणि १२ वी पर्यंतच्या महाविद्यालयांना २० दिवसांची सुट्टी जाहीर केली. १ …

Read More »

आता एसटीचा प्रवास दिवसा महागः तर रात्री स्वस्त मध्यरात्रीपासून १७.१७ टक्के भाडेवाढ लागू

मुंबई : प्रतिनिधी इंधनाच्या दरात झालेली भरमसाठ दरवाढ, टायरच्या तसेच गाड्यांच्या सुट्या भागांच्या वाढलेल्या किमतींमुळे एसटी महामंडळाच्या तिजोरीवर पडलेला भार कमी करण्यासाठी एसटी महामंडळाने अखेर भाडेवाढ लागू केली. एसटी महामंडळाने गेल्या तीन वर्षांनंतर प्रथमच १७.१७ टक्के भाडेवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला असून ही भाडेवाढ महामंडळाच्या सर्व प्रकारच्या प्रवासी वाहतूक सेवांना …

Read More »

एनसीबीला केवळ आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रकार सुरु विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि एनसीबीवर जाणीवपूर्वक दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय. मुख्यमंत्र्यांपासून ते गृहमंत्री तसेच महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री त्याचप्रमाणे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या सर्व विधानांमधून फक्त एनसीबीला टार्गेट करुन एनसीबीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रकार सुरु असल्याची जोरदार टिका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण …

Read More »

वानखेडेंना न्यायालयाने सांगितले, काय सांगायचंय ते उच्च न्यायालयात सांगा याचिका फेटाळलीः अडचणीत वाढ

मुंबईः प्रतिनिधी आर्यन खान प्रकरणी प्रभाकर सैल यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या समीर वानखेडे यांनी सैल याचे आरोप ग्राह्य धरू नये याकरीता सत्र न्यायालयात धाव घेतली. मात्र न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावल्याने एनसीबी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून याप्रकरणी मुबंई पोलिसांच्या कारवाई …

Read More »

एनसीबी आणि समीर वानखेडे हे एकंदरीत प्रकरण गंभीर ; योग्य ती पावले टाकणार राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे संकेत

ठाणेः प्रतिनिधी प्रभाकर सैल याने समीर वानखेडे यांच्या विरोधात खळबळजनक आरोप केल्यानंतर आज पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पुराव्यासहीत एनसीबी आणि समीर वानखेडे यांचे प्रकरण समोर आणले असून एकंदरीत हे प्रकरण गंभीर असून या प्रकरणी योग्य ती पावले टाकली जातील असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत …

Read More »

‘पहचान कौन’ प्रश्न विचारत ‘यहाँसे शुरु हुआ फर्जीवाडा’ असे सांगत नवाब मलिकांचा गौप्यस्फोट समीर वानखेडेंच्या पहिल्या निकाहाचे आणि जन्म दाखला जाहिर

मुंबईः प्रतिनिधी आर्यन खान ड्रग्जप्रकरणातील एक पंच असलेल्या प्रभाकर सैल याने एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या कार्यपध्दतीबाबात प्रश्नचिन्ह उपस्थित करत शाहरूख खान याच्याकडे २५ कोटींची खंडणी मागितल्याचा गौप्यस्फोट केला. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचा जन्म दाखला आणि त्यांच्या पहिल्या लग्नाचे अर्थात …

Read More »