औरंगाबाद : प्रतिनिधी देशातील न्यायदानाची प्रक्रिया अधिक गतिमान आणि लोकाभिमुख होणे ही काळाची गरज असून न्यायालयीन व्यवस्थेला पुरेशा मनुष्यबळासह आवश्यक त्या पायाभूत सुविधा देऊन यंत्रणेचे बळकटीकरण होणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा यांनी आज येथे केले. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या विस्तारित इमारतीच्या बी आणि सी विंगचे आज उद्घाटन …
Read More »गुंतवणुकीसह कर बचतही हवीय? पोस्ट ऑफिसच्या ‘ह्या’ योजनांमध्ये करा गुंतवणूक ८० सी खाली करात सवलतही मिळू शकते
मुंबई: प्रतिनिधी पोस्ट ऑफिस गुंतवणूकदारांना अनेक योजनांमध्ये गुंतवणुकीच्या संधी देते. पोस्टल सेवेसह पोस्ट अनेक प्रकारच्या बचत योजना राबवते. या योजना चांगला परतावा देणाऱ्या आहेत. यामधील काही योजना कर वाचवण्यासाठीही फायदेशीर आहेत. या योजनांना शासकीय हमी मिळते. म्हणजे आपले पैसे कधीही बुडणार नाहीत. यापैकी बऱ्याच योजना अशा आहेत की आयकर कायद्यातील कलम 80 सी …
Read More »फडणवीस सरकारच्या काळात मंत्रालयात वसुलीसाठीच संघाचे लोक नेमले होते का? राज्यपाल सत्यपाल मलिक यांना ३०० कोटींची लाच देऊ करणारा रा. स्व. संघाचा ‘तो’ व्यक्ती कोण? अतुल लोंढे
मुंबई: प्रतिनिधी जम्मू काश्मीरचे राज्यपाल म्हणून कार्यरत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत एक व्यक्ती व अंबानी यांच्या फाईलला मंजुरी देण्यासाठी आपल्याला ३०० कोटींची लाच देण्याचा प्रस्ताव होता, असा गौप्यस्फोट मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केला. मलिक यांना कोट्यवधी रुपयांची लाच देऊ करणारा रा. स्व. संघाशी निगडीत तो व्यक्ती कोण आहे? …
Read More »देशातील सर्वात मोठ्या आयपीओसाठी सेबीची मंजुरी पेटीएमची १६,६०० कोटी रुपये उभारण्याची योजना
मुंबई : प्रतिनिधी डिजिटल पेमेंट आणि वित्तीय सेवा कंपनी पेटीएमला आयपीओसाठी शेअर बाजार नियामक सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ची मंजुरी मिळाली आहे. आयपीओद्वारे १६,६०० कोटी रुपये उभारण्याची पेटीएमची योजना आहे. कंपनी नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत लिस्ट होऊ शकते. पेटीएम भारतातील सर्वात मोठा आयपीओ घेऊन येत आहे. जर पेटीएमने १६,६०० कोटी …
Read More »न्यायाधीशांच्या उपस्थितीतच मुख्यमंत्री म्हणाले, आरोप करणाराच गायब तरीही चौकश्या सुरु देशात लोकशाहीचे पालन होते आहे किंवा नाही यावर स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात अमृत मंथन होणे गरजेचे
औरंगाबाद : प्रतिनिधी. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या विस्तारीत इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यासाठी भारताचे सरन्यायाधीश एन.व्ही रमणा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री किरेन रिजिजू, न्या.उदय लळीत, न्या.धनंजय चंद्रचूड, न्या.भूषण गवई, न्या.अभय ओक, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड, मुंबई उच्च न्यायालयाचे न्या.दीपंकर दत्ता, राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्या उपस्थितीत …
Read More »एमपीएससी परिक्षार्थींसाठी खुषखबर ! परिक्षेची ऑनलाईन उत्तर पत्रिका मिळणार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी सरकारी सेवेत येवू इच्छिणाऱ्या अनेक तरूण एमपीएससीची अर्थात महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परिक्षा देत असतात. मात्र आपण सोडविलेल्या उत्तर पत्रिकेतील उत्तरे कितपत बरोबर किंवा चुकीची आहेत त्या आधारे किती गुण दिले याची प्रत्यक्ष माहिती आता या परिक्षार्थी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. परिक्षेतील पारदर्शकता आणण्याचा भाग म्हणून एमपीएससी २०२० …
Read More »सहा महिन्यात सर्व वाहनांसाठी फ्लेक्स फ्युयल इंजिन बंधनकारक केंद्रीय रस्ते महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा
नागपूर : प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून केंद्रीय रस्ते महामार्ग व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी पेट्रोलला पर्याय असलेल्या इथेनॉल आणि इलेक्ट्रीक गाड्या निर्मितीसाठी वाहन निर्मिती करणाऱ्या वाहन कंपन्यांना सांगत होते. तसेच नागरीकांनीही आता आता पेट्रोल इंधनाला पर्याय निवडावा लागणार असल्याचेही सांगितले. त्यानुसार पुढील सहा महिन्यात प्रत्येक वाहनाला प्लेक्स फ्युअल इंजिन …
Read More »आठवडी बाजार सुरु आणि दिवाळी पहाटसाठी उद्याने खुली करा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
पुणे: प्रतिनिधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेतला. जिल्ह्यातील कोविड परिस्थिती नियंत्रणात असल्याने कोरोना मार्गदशक सूचनांचे पालन करून आठवडे बाजार सुरू करण्याचे आणि दिवाळी पहाट कार्यक्रमासाठी उद्याने उपलब्ध करून देण्याचे निर्देश अजित पवार यांनी दिले. बैठकीला विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे, खासदार …
Read More »पुढील आठवड्यात आणखी २ आयपीओ येणार गुंतवणुकदारांना गुंतवणूकीची संधी
मुंबई: प्रतिनिधी पुढील आठवड्यात दोन कंपन्या आयपीओ आणणार आहेत. नायका (Nykaa) ५,४०० कोटी रुपये आणि फिनो पेमेंट्स बँक ३०० कोटी रुपये आयपीओद्वारे उभारणार आहेत. या महिन्यात येणारा हा पहिला आयपीओ आहे. मात्र, या महिन्यात दोन आयपीओ सूचीबद्ध करण्यात आले. यामध्ये एक बिर्ला म्युच्युअल फंड आणि दुसरा पारस डिफेन्सचा आयपीओ होता. फिनो पेमेंट्सचा …
Read More »शाळांच्या पायाभूत सुविधांबरोबरच शैक्षणिक गुणवत्ता वाढीच्या उद्दिष्टावर भर शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड
मुंबई : प्रतिनिधी जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक आणि भौतिक विकास करून आदर्श शाळा योजना राबविणे आणि निजामकालीन शाळांचा विकास करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिका-यांनी पुढाकार घ्यावा. शाळांच्या पायाभूत सुविधांबरोबरच शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे शासनाचे उद्दिष्ट असल्याचे शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी सांगितले. निजामकालीन शाळांचा विकास आणि आदर्श शाळा योजनेबाबत सुरू असलेल्या …
Read More »
Marathi e-Batmya