Breaking News

सरकारी विमान वापरावरून सरकार विरूध्द राज्यपाल-भाजपा राजभवन सचिवालय, मुख्यमंत्री कार्यालयाकडून परस्पर विरोधी दावे

मुंबई : विशेष प्रतिनिधी सरकारी कामासाठी डेहराडूनला जाण्यासाठी सरकारी विमान वापरण्यास परवानगी द्यावी अशी विनंती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्य सरकारला केली. मात्र त्यास परवानगी दिल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात येत आहे, तर त्याबाबत कोणतीच माहिती राज्य सरकारकडून कळविण्यात आली नसल्याचा प्रतित्तुर राजभवनाकडून कळविण्यात आल्याने सरकारी विमान वापरावरून राज्य सरकार विरूध्द …

Read More »

यंदाचा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार रंगनाथ पठारेंना मराठी भाषा विभाग मंत्री सुभाष देसाई यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी मराठी भाषा विभागाचे विंदा करंदीकर जीवनगौरव, श्री. पू. भागवत, मराठी भाषा अभ्यासक व कविवर्य मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक हे चार पुरस्कार अनुक्रमे रंगनाथ पठारे, शब्दालय प्रकाशन, डॉ.सुधीर रसाळ व संजय जनार्दन भगत आणि मराठी साहित्य परिषद, आंध्रप्रदेश यांना देण्यात येत असल्याची घोषणा मराठी भाषा विभाग व उद्योगमंत्री …

Read More »

मुख्यमंत्र्यांचे सल्लागार मेहता आता रेराचे प्रमुख; तर मुख्य सचिव पदी कुंटेची शक्यता गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली अजोय मेहतांना शपथ

मुंबईः प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे शासकिय सल्लागार अजोय मेहता यांची आता महारेरा अर्थात महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणच्या अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. या पदावरील निवृत्त सनदी अधिकारी गौतम चटर्जी यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांच्या ठिकाणी मेहता यांची आज नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे राज्याच्या मुख्य सचिव पदी सीताराम …

Read More »

या पध्दतीने भरतीत मराठा युवकांना संधी देण्यास मुख्यमंत्री सकारात्मक भरती प्रक्रियेतील एसईबीसी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा- अशोक चव्हाण यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी मराठा समाजाच्या युवकांना सरकारी नोकरीत संधी मिळावी यासाठी राज्य सरकार सकारात्मक असून आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत मुद्दा उपस्थित करण्यात आला, यावेळी ऊर्जा विभागाने मराठा उमेदवारांसाठी ते प्रमाण पत्र सादर केल्यास भरतीत संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार इतर विभागाच्या नोकर भरतीतही अशा प्रकारे मराठा समाजाच्या …

Read More »

नव्या आणि २०१९ च्या एमएसईबीच्या भरतीत मराठा उमेदवारांना मिळणार अशी संधी ईडब्ल्यूएसचा लाभ घेण्याचा पर्याय उपलब्ध- ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांचे महावितरणला निर्देश

मुंबई : प्रतिनिधी महावितरण कंपनीद्वारे २०१९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या जाहिरातींच्या अनुषंगाने विद्युत सहाय्यक, उपकेंद्र सहाय्यक व पदवीधर शिकाऊ अभियंता- स्थापत्य, पदविकाधारक शिकाऊ अभियंता- वितरण/स्थापत्य या पदांच्या भरतीसाठी सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे (ईडब्ल्यूएस) लाभ घेण्याचा पर्याय ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या पुढाकारामुळे शासनाद्वारे उपलब्ध करून देण्यात आला …

Read More »

ग्लोबल टिचर रणजितसिंह डिसले घेणार राज्यातील शिक्षकांचा “तास” प्रत्येक जिल्ह्यात ‘शिक्षक प्रेरणा कार्यशाळा’-ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीतून विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या आणि ग्लोबल टिचर पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले यांच्या माध्यमातून राज्यात आता सर्व जिल्ह्यांमध्ये ‘शिक्षक प्रेरणा कार्यशाळा’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. डिसले यांच्या कार्यातून सर्व शिक्षकांना प्रेरणा मिळावी तसेच शिक्षणातील आधुनिक तंत्रज्ञानाचा सर्वांना परिचय व्हावा यासाठी राज्यातील सर्व …

Read More »

खुशखबरः शासकिय आणि खाजगी सेवेतील परिचारिकांना मिळणार समान वेतन कार्यवाही सुरु करावी-वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी कोविडकाळात देशासह राज्यामध्ये वैद्यकीय डॉक्टर यांच्याबरोबरच नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, आरोग्य कर्मचारी यांनी दिलेले योगदान महत्वाचे होते. त्यावरून त्यांचे महत्व दिसून आले आहे. येणाऱ्या काळात शासकीय आणि खाजगी रुग्णालयात सेवा देणाऱ्या परिचारिकांना किमान समान वेतन मिळण्याबाबतची कार्यवाही सुरु करावी असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज …

Read More »

आघाडी सरकारच्या नियोजनशून्य ‘सहकाराचा’ आणखी एक अंक भाजपा आ. अतुल भातखळकर यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार २५० पेक्षा कमी सभासद असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुकांची नियमावली करताना जनतेकडून सूचना-हरकती घेऊनच अंतिम नियमावली जाहीर करावी असे स्पष्ट निर्देश होते. तरी सुद्धा कोणतीही स्पष्ट नियमावली जाहीर न करता थेट निवडणुका घेण्याचा निर्णय राज्याच्या सहकार विभागाकडून घेण्यात आला. परंतु या विरोधात विधी व न्याय …

Read More »

राज्यात ५ लाखाहून अधिक व्यक्तींना लस: ३ ऱ्या टप्प्यात ५० वर्षावरील व्यक्तींना ३ऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी १ मार्चपासून नोंदणीची शक्यता- आरोग्यमंत्री टोपे

मुंबई : प्रतिनिधी राज्यात प्राधान्यक्रम ठरलेल्या व्यक्तींना कोरोना लसीकरण सुरु असून ६५२ केंद्रांच्या माध्यमातून ही प्रक्रिया केली जात आहे. आतापर्यंत एकूण ५ लाखाहून अधिक आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्स यांना लस देण्यात आली आहे. तिसऱ्या टप्प्यात ५० वर्षावरील व्यक्तींना लसीकरण केले जाणार असून त्याची नोंदणी साधारणपणे १ मार्चपासून होऊ शकते, असे …

Read More »

राज्य सरकारही आता कोविडवरील लस आणणार : हाफकिन करणार संशोधन आधुनिकीकरण करण्यास शासन संपूर्ण मदत करणार-मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

मुंबई : प्रतिनिधी भारताला पोलिओ मुक्त करण्यात मोठा वाटा देणाऱ्या हाफकिन इन्स्टिट्यूटने गेल्या सहा महिन्यात जवळपास २८ कोटीहून अधिक लसीची निर्मिती केली आहे, ही बाब अभिनंदनीय नक्कीच आहे. मात्र राज्याची सध्याची परिस्थिती पाहता कोविडवरील लसीसाठी हाफकिन इन्स्टिट्यूटने संशोधन लवकर करणे आवश्यक असून लस तयार करण्यात हाफकिन इन्स्टिट्यूट यशस्वी ठरल्यास ही …

Read More »