Breaking News

लसीकरण केंद्रे बंद असताना कसला ‘लस महोत्सव’ साजरा करता? बंद लसीकरण केंद्राबाहेर घंटानाद, थाळीनाद करून केंद्र सरकारचा निषेध करणार-नाना पटोले

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या गंभीर संकटात लसीकरण मोहीम महत्वाची असताना केंद्र सरकारकडून पुरेशा प्रमाणात लसींचा पुरवठा केला जात नाही. लसीअभावी अनेक लसीकरण केंद्रे बंद पडली असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ ते १४ एप्रिल दरम्यान ‘लस महोत्सव’ साजरा करण्याचे आवाहन केले आहे. राज्यातील बहुतांश लसीकरण केंद्रे लस पुरवठ्याअभावी बंद असताना …

Read More »

सर्वपक्षिय बैठकीत काँग्रेसने कोणते मुद्दे मांडले? जाणून घ्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी केल्या सूचना

मुंबई: प्रतिनिधी कोरोना रोखण्यासाठी निर्बंध लावताना समतोल असावा. निर्बंध लागू करताना गरजू घटकांचाही विचार व्हावा. सरकारची भूमिका आणि निर्णयाबाबतचा अपप्रचार व गैरसमज टाळण्यासाठी आणि वस्तुस्थिती अधिकृतपणे लोकांपर्यंत पोहोचावी, यासाठी निवडक मंत्री नियुक्त करून त्यांनी नियमित ब्रिफिंग करावी अशी सूचना काँग्रेस नेते तथा सार्वजनिक मंत्री अशोक चव्हाण यांनी केली. मुख्यमंत्री उध्दव …

Read More »

सर्वपक्षिय नेत्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरेंनी दिले हे संकेत कडक निर्बंधाशिवाय दुसरा पर्याय राहीला नाही

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाचे अनर्थचक्र थांबवायचे असेल तर काही काळासाठी का होईना पण कडक निर्बंध लावावेच लागतील. आपल्याला प्रथम जीव वाचविण्याला प्राधान्य द्यावे लागेल. ही जर आरोग्याची आणीबाणी असेल तर प्राधान्य हे नागरिकांच्या आरोग्याला आणि जीवाला असले पाहिजे. विरोधी पक्ष नेत्यांनी दिलेल्या सूचनांवर निश्चितपणे गांभीर्याने विचार केला जाईल, त्यांनी चांगल्या …

Read More »

भाजपाचा लॉकडाऊनला विरोध नाही पण आधी विविध घटकांना मदत द्या प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील वाढत्या कोरोनाच्या प्रसाराला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून आठवडाभराचा, १४ दिवसांच्या लॉकडाऊनचा प्रस्ताव आहे. मात्र आमचा लॉकडाऊनला विरोध नाही. तो लावायलाच पाहिजे परंतु व्यापारी, घर कामगार, रोजंदारी करणारे यां सर्वांना त्यांचे होणारे संभावित नुकसान ग्रहीत धरून काही तरी मदत जाहिर करा असे मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बोलाविलेल्या सर्वपक्षिय …

Read More »

लसच नाही तर मेडिकल इक्वीपमेंट देण्यातही मोदी सरकारचा महाराष्ट्रावर अन्याय काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा गौप्यस्फोट

मुंबई: प्रतिनिधी केंद्रातील मोदी सरकारकडून महाराष्ट्राला कमी लस पुरवठ्याचे प्रकरण ताजे असतानाच आता कोरोनाच्या लढाईसाठी लागणाऱ्या मेडिकल इक्वीपमेंट देण्यातही केंद्राकडून अन्यात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला दिलेल्या इक्वीपमेंटची माहिती केंद्र सरकारनेच संसदेत दिल्याचा गौप्यस्फोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज एका प्रसिध्दी …

Read More »

सर्वपक्षिय बैठकीत होणार आठवडाभऱाच्या लॉकडाऊनवर शिक्कमोर्तब? शनिवारी संध्याकाळी सर्वपक्षिय नेत्यांची मुख्यमंत्र्यांनी बोलाविली बैठक

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यातील वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी लॉकडाऊन शिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे उद्या शनिवारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यातील सर्वपक्षिय नेत्यांची बैठक बोलाविली असून या बैठकीत एक आठवड्याचा लॉकडाऊन लागू करण्याबाबत चर्चा करून शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती मंत्रालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. एप्रिल महिना सुरु झाल्यापासून राज्यात …

Read More »

“ब्रेक द चेन” अंतर्गत या नव्या नियमाचा समावेश राज्य सरकारकडून आदेश जारी

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील वाढत्या कोरोना प्रसाराला रोखण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले असून आता आणखी एका नव्या निर्बंधाची भर घालण्यात आली आहे. यापुढे दर १५ दिवसांनी आरटीपीसीआरची चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले असून या चाचणीची व्हॅलीडिटी १५ दिवस राहणार आहे. हा नवा नियम कोरोना लस न घेतलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना, प्रवास …

Read More »

१० वी आणि १२ वीच्या परिक्षाही पुढे ढकलणार ? शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीच्या परिक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर आता नियोजित १० वी आणि १२ वीच्या परिक्षा पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता असून याबाबत लवकरच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड …

Read More »

मंत्री टोपे आणि वडेट्टीवारांच्या संकेताने जनतेत संभ्रमावस्था आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि मदत व पुर्नवसन मंत्री वडेट्टीवारांचे संकेत

मुंबई : विशेष प्रतिनिधी मागील वर्षभरापूर्वी कोरोना विषाणूला रोखण्याच्या नावाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे आधीच अडचणीत सर्वसामान्य नागरीक सापडला आहे. त्यात आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आता पुन्हा कडक निर्बंध लागू केलेले असल्याने अप्रत्यक्ष रोजंदारी आणि हातावर पोट असणारे हवालदिल झाले असतानाच आता पुन्हा राज्यात तीन आठवड्यांचा …

Read More »

परिक्षार्थींच्या मागणीनुसार रविवारची एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली राज ठाकरे, जितेंद्र आव्हाड यांची विनंती आणि एमपीएससीची परिक्षा रद्द

मुंबई : प्रतिनिधी पुणे येथे झालेल्या भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीची परिक्षा ११ एप्रिल २०२१ रोजी घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने आता परिक्षार्थींनीच परिक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली. त्यानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची येत्या रविवारी म्हणजे …

Read More »