Breaking News

ED चे आदेश प्रताप सरनाईक हाजीर हो.. क्वारंटाईन कालावधी संपल्यावर हजर राहा

मुंबईः प्रतिनिधी एमएमआरडीतील आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ईडीने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर मंगळवारी कारवाई करत त्यांच्या मुलाला ताब्यात घेतले. त्यानंतर आता प्रताप सरनाईक यांनाही ईडीकडून समन्स बजावण्यात आले असून क्वारंटाईन कालावधी संपल्यावर हजर राहण्याचे आदेश बजाविण्यात आले. मुंबई बाहेरुन आल्यामुळे सरनाईक यांनी स्वःताला क्वारंटाईन करून घेतले. दरम्यान, आपण …

Read More »

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप यशस्वी बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा दावा

मुंबईः प्रतिनिधी कोरोना महामारीची ढाल पुढे करुन केंद्र व राज्य शासनाने अनेक कामगार-कर्मचारी विरोधी धोरणे राबविण्यास सुरुवात केल्याच्या निषेधार्थ देशभरातील २५ कोटी कामगार-कर्मचारी श्रमिक-शेतमजुर यांनी संप केला. राज्यात मंत्रालयासह सर्व जिल्हयातील सरकारी कार्यालये आणि शाळा बंद होत्या. शासकीय मुद्रणालये, मोटार परिवहन विभाग , वस्तु व सेवा कर विभाग, जिल्हाधिकारी कार्यालये, …

Read More »

अजित दादांचे विठ्ठलाला साकडे, लस लवकर येऊ दे, अवघे जग कोरोनामुक्त होऊ दे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते श्री विठ्ठलाची पूजा संपन्न

पंढरपूर : प्रतिनिधी कोरोना विषाणूवरील लस लवकर येऊ दे आणि अवघे जग कोरोनामुक्त होऊ दे, असे साकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सौ. सुनेत्रा पवार यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा करण्यात आली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे …

Read More »

मोदींची नवी घोषणा,” वन नेशन, वन इलेक्शन”…व्हिडिओ पाह्यला विसरू नका संविधान दिनाचे औचित्य साधत पंतप्रधानांची घोषणा

मुंबईः प्रतिनिधी देशात सतत कोणत्या ना कोणत्या भागात निवडणूका सुरु असतात. त्यामुळे सुरु असलेल्या विकास कामांमध्ये अडथळा निर्माण होतो. तसेच नागरिक म्हणून त्याचा त्रास ही होतो. त्यामुळे वन नेशन-वन इलेक्शन अर्थात एक देश एक निवडणूकी संकल्पना राबविण्याचा विचार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जाहीर केले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २६ …

Read More »

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले पोलिसांना हे वचन २६/११ ही काळजावरची जखम असल्याने पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी सदैव कटिबद्ध

मुंबई : प्रतिनिधी सण, उत्सव असो वा सभा असो जमलेल्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आमचे पोलीस चोवीस तास कर्तव्य बजावत असतात. स्वत:च्या कुटुंबातील, घरातील सुख दु:ख बाजूला ठेवून जनतेच्या सुख दु:खात सामिल होणाऱ्या आमच्या पोलिसांचा मला अभिमान आहे. पोलीस विभागाच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासन सदैव कटिबद्ध असून त्यांच्यासाठी जे जे करणे शक्य …

Read More »

संजय राऊतांना देवेंद्र फडणवीसांचे प्रति आव्हान ईडीला भाजपा नेत्यांची नावे द्याच

मुंबईः प्रतिनिधी शिवसेना प्रवक्ते प्रताप सरनाईक यांच्यावरील ईडीच्या कारवाईमुळे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाच्या १२० नेत्यांच्या नावाची यादी आपण देणार असल्याचे जाहीर करत भाजपाला आव्हान दिले. मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या आव्हानाची तात्काळ दखल घेत राऊतांनी जाहीर केल्याप्रमाणे नावे द्यावीच असे प्रतिआव्हान देत शिवसेनेवर पलटवार केला. ते …

Read More »

युपीएससीसाठी एससीच्या विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य देण्याच्या योजनेतील ‘त्या’ अटी रद्द बार्टी ने घातलेल्या जाचक अटींमुळे विद्यार्थ्यांनी व्यक्त केली होती नाराजी

मुंबई : प्रतिनिधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा पूर्व परीक्षा (युपीएससी प्रिलीम) उत्तीर्ण झालेल्या मुख्यपरीक्षा २०२० साठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या एक रकमी अर्थसहाय्य योजने साठी बार्टीने घातलेल्या जाचक अटी रद्द करून मागील वर्षीच्या …

Read More »

केंद्राचे राज्यांना आदेश, निर्बंध पुन्हा लावण्याची वेळ.. घरोघरी जावून टेस्ट करा केंद्र सरकारकडून नवी मार्गदर्शक तत्वे जाहीर

मुंबईः विशेष प्रतिनिधी देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी देशात पुन्हा एकदा देशात रात्रीची संचार बंदी, नागरीकांच्या एकत्र येणाच्या संख्येवर पुन्हा मर्यादा यासह अन्य कडक निर्बंध लागू करण्याची गरज असल्याचे मत केंद्र सरकारने व्यक्त करत घरोघरी जावून कोरोनाच्या तपासण्या करण्याचे आदेश सर्व राज्य सरकारांना आज …

Read More »

सरकारने दिले धर्मादाय रूग्णालयांना हे आदेश नियमाप्रमाणे १० टक्के गरिब रूग्णांना उपचार द्या मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री तटकरे

मुंबई : प्रतिनिधी मुंबई शहर व राज्यातील धर्मादाय रूग्णालयांमध्ये १० टक्के गरिब रूग्णांना मोफत उपचारावरील नियमांचे पालन करून उपचार द्यावेत असे निर्देश ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. कोरोना महामारीच्या कार्यकाळात ग्रामीण भागातील रूग्ण शहरात उपचारासाठी आले नाहीत. मात्र, आता रूग्ण उपचारासाठी येण्याचा ओघ वाढू शकतो यासाठी धर्मादाय रूग्णालयांनी सहकार्य …

Read More »

या तारखेपासून रखडलेली अकरावी प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरु शिक्षण विभागाकडून वेळापत्रक जाहीर

मुंबईः प्रतिनिधी ११वी ची रखडलेली प्रवेश प्रक्रिया आता सुरु करण्यात येत असून त्याविषयीचे वेळापत्रक लवकरच शिक्षण विभागाकडून नुकतेच जारी करण्यात आली. मात्र ही प्रवेश प्रक्रिया पार पाडताना मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी आरक्षित जागा देवून प्रवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे न्यायालयात जरी याचिका प्रलंबित असली तरी मराठा समाजातील मुलांना आरक्षणाचा लाभ मिळणार …

Read More »