मंत्री चव्हाणांचा सूचक प्रश्न, विनायक मेटे कोणत्या पक्षाचे आहेत? मराठा आरक्षणप्रकरणी झालेल्या बैठकीनंतर चव्हाणांचे वक्तव्य

मुंबईः प्रतिनिधी
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सध्या न्यायालयीन लढाई सुरु आहे. त्याचबरोबर मराठा समाजाच्या नेत्यांची बैठक घेत काल चर्चाही झाली. त्यावेळी मराठा समाजाचे नेते विनायक मेटे हे उपस्थित होते. मात्र ते कोणत्या पक्षाचे आहेत? असे सूचक उत्तर देत त्यांचे धोरण कोणत्या पक्षाच्या कार्यलयात ठरविले जाते जगजाहीरच असल्याचा टोला भाजपाचे नाव न घेता त्यांनी लगावला.
आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा समाजात असंतोष वाढत चालेला आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी मराठा समाजाच्या नेत्यासोबत काल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बैठक घेतली. त्या बैठकीतील चर्चेची माहिती देण्यासाठी मंत्री अशोक चव्हाण यांनी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेनंतर ते बोलत होते.
यावेळी काही प्रसारमाध्यमांनी त्यांना भाजपाच्या नेत्यांना का नाही बोलावत असा सवाल केला. त्यावर उत्तर देताना चव्हाण म्हणाले की, विनायक मेटे कोणत्या पक्षाचे आहेत? त्यांची भूमिका कशी ठरते हे माहित आहेच ना असे सूचक उत्तर त्यांनी दिले.
या बैठकीनंतर जे आत बोलता तेच बाहेर बोला असा मित्रत्वाचा सल्लाही मेटे यांना दिल्याचे त्यांनी सांगितले.

About Editor

Check Also

बंधपत्राचे उल्लंघन केले म्हणून कॉकरोच जनता पार्टीचे सौरव दास आणि आशुतोष रांका यांची तिहार तुरुंगात रवानगी विशेष न्यायदंडाधिकारी महेश कुमार मीना यांचे आदेश

‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) चे नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांना बुधवारी पाच दिवसांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *