मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, मनोज जरांगे यांच्या १४ पैकी १२ मागण्या मान्य यापूर्वीही आंदोलन केलेय आताही ते आंदोलन करू शकतात

मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वीही आंदोलन केलेली आहेत. यापुढेही ते करू शकतात. त्यांनी दिलेला अर्ज पोलिसांनी फेटाळून लावला आहे. त्यांचा दुसऱ्यांदा अर्ज आल्यानंतर पोलिसच त्यावर निर्णय घेतील असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगत मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या १४ पैकी १२ मागण्या सरकारने मान्य केली असल्याचे स्पष्ट केले. तसेच पुणे आणि मुंबई येथे गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो. या उत्सवात कुठलेही विघ्न येऊ नये अशी अपेक्षा व्यक्त करत मनोज जरांगे यांनी केलेल्या काही मागण्या न्याय प्रविष्ठ आहेत. त्यांना समजावूनही सांगण्यात आलं आहे. सणासुदीच्या काळात लोकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने निर्णय घेणे अपेक्षित असल्याचे मत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

मनोज जरांगे पाटील यांनी आज मुंबईच्या दिशेने कूच केली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा १८ वा दिवस आहे. यावेळी आंतरावली सराटीतील महिलांनी मनोज जरांगे पाटील यांचे औक्षण केले. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले की, मराठा समाजाला सगळ्यांनी मिळून फसवलं असा आरोप करत मराठा समाजाने एकजुटीने रहावे, शांतता राखावी, असे आवाहन केले. तसेच सरकारला मी शरण जाणार नाही असा इशारा दिला. त्याचबरोबर समाजाच्या लेकरांच्या कल्याणासाठी आपला लढा सुरु असल्याचा दावा केला.

आंतरावली सराटीहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांचा पहिला मुक्काम पाटोदा येथे होणार आहे.

यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला मुंबई पोलिसांनी परवनगी दिली पाहिजे अशी मागणी त्यांच्या समर्थकांनी केली आहे. उत्सवाच्या नावाखाली परवानगी नाकारू नये असे आवाहन करत परवानगी नसली तरी आम्ही मुंबईला जाऊ असा इशाराही आंदोलकांनी दिला. जरांगे पाटील उपोषण करतील आम्ही गणपती दर्शन करू असे सांगत मराठा समाज मुंबईला जाण्यावर ठाम असल्याचे दिसले.

About Editor

Check Also

सतेज पाटील यांची माहिती, गोकुळमध्ये सत्तांतर रोखण्यासाठी अध्यादेश आणल्यास तो बेकायदेशीर माजी सरन्यायाधीशांनी दिला होता कायदेशीर सल्ला

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) मधील नवनिर्वाचित बहुमताला सत्तास्थापनेपासून रोखण्यासाठी राज्य सरकारने अध्यादेश …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *