Breaking News

आता घरबसल्या घ्या सिध्दीविनायकाच दर्शन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सिद्धी विनायक मंदिराच्या ॲपचे उद्घाटन

मुंबई: प्रतिनिधी सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासाच्या ‘सिद्धीविनायक टेंपल’ या मोबाईल ॲपचे ऑनलाईन उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या ॲपद्वारे भाविकांना घरबसल्या बाप्पाचे दर्शन घेता येणार आहे. या कार्यक्रमाला सिद्धीविनायक गणपती न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर, कोषाध्यक्ष सुमंत घैसास, विश्वस्त भरत पारीख, महेश मुदलीयार, आनंद राव, गोपाळ दळवी, संजय सावंत, विशाखा राऊत, ॲङ पंकज गोरे, सुबोध आचार्य, वैभवी चव्हाण, न्यासाच्या कार्यकारी अधिकारी …

Read More »

आधी विद्यार्थ्यांची सुरक्षा नंतर परीक्षा काँग्रेसच्या राज्यव्यापी तसेच ऑनलाईन आंदोलनालाही प्रचंड प्रतिसाद : प्रदेशाध्यक्ष थोरात

मुंबई : प्रतिनिधी देशभरात कोरोनाने थैमान घातले असतानाही मोदी सरकार त्याचा कसलाही विचार न करता जेईई नीट परीक्षा घेण्यावर अडून बसले आहे. या परिक्षेसाठी देशभरातून तब्बल २४ लाख ५० हजार विद्यार्थी बसले आहेत. एवढ्या मोठ्या विद्यार्थांचा जीव धोक्यात घालून परीक्षा कसल्या घेता? विद्यार्थ्यांची सुरक्षा सर्वात महत्वाची आहे. त्यामुळे या परीक्षा काही …

Read More »

सुशांत सिंगप्रकरणी प्रेस कौन्सिलने प्रसार माध्यमांना करून दिली पत्रकारीतेची आठवण कव्हरेजचा अतिरेक होतोय

मुंबई: प्रतिनिधी बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येचा तपास सुरु असताना प्रसारमाध्यमांकडून विशेषत: टीव्ही चॅनेल्सकडून अतिरेक होत असल्याने कव्हरेजबद्दल पहिल्यांदाज प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत पत्रकारीता धर्माची आठवण करून दिली. यासंदर्भात प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाकडून ट्विट करत यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. सुशांत सिंग राजपूतने …

Read More »

सफाई कामगारांसाठी स्वतंत्र कार्यासनाच्या निर्मितीसह हे प्रश्न सोडविणार सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

मुबई: प्रतिनिधी सफाई कामगारांचे विविध प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी सामाजिक न्याय विभागात स्वतंत्र कार्यासनाची निर्मिती विचाराधीन असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी केले. सफाई कामगारांच्या विविध मागण्यांसंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत मुंडे बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव श्याम तागडे, समाजकल्याण आयुक्त प्रवीण दराडे, सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे, सफाई …

Read More »

मुख्यमंत्री, उद्योजक, कारखानदार असणा-या समाजाला मागासवर्गाचे आरक्षण कसे? मराठा समाजाच्या मतांच्या फायदासाठीच आरक्षण: अॅड सदावर्ते

मुंबई: प्रतिनिधी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात पी. एस पटवालिया, अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडली. याआधी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने राज्य सरकारची बाजू ऐकून घेतली होती. त्यानंतर आज विरोधकांची बाजू ऐकून घेतली. यावेळी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षण लागू करणे कसे अयोग्य आहे? …

Read More »

सरकारने काय साध्य केले? शेवटी परिक्षेचा निर्णय झालाच ना भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार

मुंबई : प्रतिनिधी पदवी अंतिम वर्षे विद्यार्थ्यांच्या मनस्थितीशी खेळ करणाऱ्या राज्य सरकारची आता माफी मागण्याची वेळ आली आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी दिली आहे सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षे परिक्षांबाबत दिलेल्या निर्णयानंतर भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, एका “बबड्याच्या” हट्टापायी …

Read More »

शिक्षण मंत्री सामंत म्हणाले, परिक्षा घेण्याबाबत कुलगुरूंशी चर्चा करणार सरकारचा निर्णय परिक्षा रद्दचा नव्हताच ऐच्छिक परिक्षा आहेच

मुंबई : प्रतिनिधी ३० सप्टेंबर पूर्वी अंतिम वर्षाच्या परिक्षा घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेतल्यानंतर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांनी न्यायालयाच्या निकालाचा आपण आदर करत असून परिक्षा घेण्याबाबत विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत निर्णय घेवून निर्णय घेणार असल्याचे सांगितले. न्यायालयाच्या निकालानंतर तातडीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. “हा निकाल देतानाच न्यायालयानं सांगितलं …

Read More »

परिक्षेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय : ३० सप्टेंबर पूर्वी परिक्षा घ्याच अंतिम वर्षाच्या परिक्षा घेणे सर्व राज्य सरकारांना बजावले

नवी दिल्ली: प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी अंतिम वर्षाच्या परिक्षा ऐच्छिक घेण्याबाबतचा निर्णय घेत अनेक विद्यार्थ्यांना प्रमोट करण्याचा निर्णय घेतला. त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज निकाल देताना परिक्षेची तारीख फारतर पुढे ढकलता येवू शकते. मात्र परिक्षा घ्यावीच लागणार असल्याचे स्पष्ट करत परिक्षेशिवाय विद्यार्थ्यांना प्रमोट किंवा बढती …

Read More »

सुप्रिया सुळेंच्या सूचनेची धंनजय मुंडे यांच्याकडून अंमलबजावणी दर आठवड्याला दिव्यांगांच्या प्रश्नाबाबत बैठक आयोजित करणार- धनंजय मुंडे

मुंबई : प्रतिनिधी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक धोरण, यासह दिव्यांग व्यक्तींचे विविध प्रश्न प्राधान्याने सोडविणार असून दर आठवड्याला याबाबत बैठक आयोजित करणार असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली . दिव्यांग बांधवांच्या विकासाला प्रथम प्राधान्य देण्याची आपली भूमिका आहे. या विषयाची व्याप्ती लक्षात घेऊन आपण स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभागासाठी प्रयत्नशील असून मार्चपासून …

Read More »

कोरोना : मुंबई आणि महानगरात संख्या स्थिर तर पुण्याची वाटचाल ५० हजाराकडे १४ हजार ७१८ नवे बाधित, ९१३६ जण घरी, ३५५ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत दररोज वाढ होताना दिसत असली तर दुसऱ्याबाजूला बरे होणाऱ्या रूग्णांची संख्याही चांगल्यापैकी वाढताना दिसत आहे. मुंबई शहर आणि महानगरातील ८ महानगरपालिका आणि ७ नगरपालिकांमधील अॅक्टीव्ह रूग्ण स्थिर आहे. मागील २० दिवसांहून अधिक काळ या दोन्ही ठिकाणी १९ हजार ते २० हजार या दरम्यानच संख्या …

Read More »