महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) विविध स्पर्धा परीक्षांच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचूनही अंतिम निवड यादीत स्थान मिळवू न शकलेल्या गुणवंत उमेदवारांसाठी आयोगाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. अशा उमेदवारांना खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी उद्योग विभागामार्फत ‘मैत्री 2.0’ पोर्टल अंतर्गत ‘निपुण सेतू’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) ‘प्रतिभा सेतू’ या उपक्रमाच्या धर्तीवर …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, शहराला केंद्रस्थानी ठेवून बेस्टचा आराखडा सादर करावा मुंबईच्या वेशीवर ऑक्ट्रोयची नाके विकसित करा
बेस्टच्या सर्वांगीण पुनरुज्जीवनासाठी डेपो विकास, कर्मचारी निवासस्थानांची उभारणी, सार्वजनिक सुविधांची निर्मिती आणि दीर्घकालीन आर्थिक स्वावलंबन यांचा समावेश असलेला महत्त्वाकांक्षी आराखडा तयार करण्यात येत आहे. या प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता राखून सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, मुंबई शहराच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांमध्ये नागरिकांचे हित, कर्मचाऱ्यांचे हित आणि शहराचा दीर्घकालीन विकास या तीन प्रमुख बाबींना केंद्रस्थानी …
Read More »सचिन सावंत यांचा सवाल, दारू दुर्घटनासंदर्भातील मालवणी समितीच्या शिफारसींचे काय झाले? मालवणी समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करणारे गृहविभागाचे निर्देश दुर्लक्षित, राज्य सरकार सर्व विभागात अपयशी
पुण्यात मागील आठवड्यात विषारी दारुमुळे २२ जणांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर खडबडून जागे झालेल्या सरकारने कारवाईचे नाटक करत २६ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई केली,पण ही कारवाई समाधानकारक नाही. २०१५ साली मालवणीमध्ये विषारी दारुमुळे १०६ जणांचा मृत्यू झाला, त्यानंतर राज्य सरकारने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती, या समितीच्या शिफारशींवर सरकार व प्रशासनातील …
Read More »प्रताप सरनाईक यांची माहिती, एसटी स्थानके व बसेसची दर चार तासांनी स्वच्छता पर्यावरण दिनानिमित्त राज्यभर अत्याधुनिक स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने राज्यव्यापी अत्याधुनिक स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ आज मुंबईतील परळ बसस्थानक येथे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आला. या उपक्रमामुळे राज्यातील बसस्थानके, एसटी बसेस, चालक-वाहक विश्रांतीगृहे आणि प्रसाधनगृहे अधिक स्वच्छ, सुंदर व प्रवासी-अनुकूल बनविण्याचा महामंडळाचा संकल्प असल्याचे परिवहन …
Read More »आशिष शेलार यांची ग्वाही, आरे परिसरात भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणादायी जंगल निर्माण करणार आरे परिसरात ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यभर राबविण्यात येणाऱ्या ‘हरित महाराष्ट्र – ३०० कोटी वृक्षारोपण’ मोहिमेअंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यात मोठ्याप्रमाणावर वृक्षारोपणाचा संकल्प करण्यात आला असून याअंतर्गत आरे परिसरातील तब्बल ८० एकर रिक्त जागेत ५ लाख झाडांचे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. आरेला कागदावर जंगल म्हणून ओळख मिळाली होती; आता ती केवळ नोंदीपुरती न ठेवता प्रत्यक्षात हिरवाईने बहरलेले, समृद्ध आणि भविष्यातील पिढ्यांसाठी …
Read More »दत्तात्रय भरणे यांचे आवाहन, महाडीबीटी पोर्टलवर बियाण्यांचे वितरण; शेतकऱ्यांनी अर्ज करावा महाडीबीटी पोर्टलवरून बियाणे वितरणाचा अभिनव उपक्रम
राज्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाने यंदा महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून खरीप हंगामासाठी आवश्यक असलेली प्रमाणित बियाणे आता महाडीबीटी पोर्टलवर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर जाऊन तात्काळ अर्ज करावेत, असे आवाहन राज्याचे कृषी …
Read More »कॉकरोच जनता पार्टीचा आरोप, शिक्षण व्यवस्था क्षम लोक चालवत आहेत जेईई २०२६ परिक्षेचा डेटा उघड झाल्याने गोंधळ
निकाल पोर्टलवरील क्लाउड स्टोरेज कॉन्फिगरेशनच्या समस्येमुळे जेईई (ॲडव्हान्स्ड) २०२६ च्या उमेदवारांचा डेटा उघड झाल्याच्या वृत्तावरून देशाची शिक्षण व्यवस्था आणि डिजिटल पायाभूत सुविधा किती ‘अक्षम’ लोक चालवत आहेत हे दिसून येते अशी टीका कॉकरोच जनता पार्टी अर्थात सीजेपी ने केला. सोशल मीडियावर सुरू झालेल्या आणि नंतर स्वतःचेच स्वरूप धारण केलेल्या या …
Read More »जयराम रमेश यांची टीका, तो एक फालतू युक्तीवाद निकोबार जंगलतोडची भरपाई हरियाणामध्ये भरून काढणार
निकोबारमधील जंगलतोड करून हरियाणामध्ये काही प्रमाणात भरपाई म्हणून वृक्षारोपण करून त्याच्या पर्यावरणीय परिणामाचे व्यवस्थापन करता येईल, हा एक फालतू युक्तिवाद आहे, अशी टीका काँग्रेस नेते आणि राज्यसभा सदस्य जयराम रमेश यांनी शुक्रवारी (५ जून, २०२६) बंगळूरु येथे ‘द हिंदू हडल’चा म्हणून आयोजित ‘अरवली पर्वतरांगांपासून निकोबारपर्यंत: पर्यावरणाच्या उंबरठ्यावर’ या सत्रात बोलताना …
Read More »टीव्हीजेला काँग्रेसने पाठिंबा दिल्याप्रकरणी द्रमुक इंडिया आघाडीपासून लांब ८ जूनच्या बैठकीपासून लांब राहण्याचा निर्णय
एम. के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील द्रमुक पक्षाने ८ जून रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या प्रस्तावित इंडिया ब्लॉक बैठकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे, कारण विधानसभा निवडणुकीनंतर तामिळनाडूमध्ये झालेल्या नाट्यमय राजकीय फेरबदलामुळे काँग्रेससोबतच्या संबंधांमध्ये निर्माण झालेला दुरावा आता अधिकच वाढला आहे. द्रमुकचा दीर्घकाळचा मित्रपक्ष असूनही, तामिळनाडूमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी अभिनेता विजयच्या टीव्हीकेला …
Read More »कॉकरोच जनता पार्टीचा निर्धार, काहीही झाले तरी आंदोलन थांबणार नाही सोनम वांगचूक यांचा पाठिंबा मिळाला आहे, परवानगी नाकारली तरी आंदोलन करणार
ऑनलाइन व्यंग्यात्मक मोहीम म्हणून सुरू झालेली कॉकरोच जनता पार्टी (CJP), आता भारताच्या शिक्षण व्यवस्थेशी संबंधित अलीकडील वादांच्या निषेधार्थ शनिवारी नवी दिल्लीतील जंतर मंतर येथे आपल्या पहिल्या ऑफलाइन आणि प्रत्यक्ष आंदोलनासाठी सज्ज झाली आहे. CJP च्या अधिकृत प्रवक्त्यांनी सांगितले की, ते आंदोलनाच्या दिवशीच (६ जून) जंतर मंतरवर आंदोलनासाठी परवानगी मागतील आणि …
Read More »
Marathi e-Batmya