जयंत पाटील यांची माहिती, काल मध्यरात्री वर्षा बंगल्यावर काय घडले मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीला गेल्यावर काय घडलं याची सांद्यत माहिती जयंत पाटील यांनी दिली

काल मंगळवारी मध्यरात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री आमदार जयंत पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल अचानक वर्षा बंगल्यावर पोहोचले. यावरून महाविकास आघाडीत फूट पडल्याचे वृत्त पसरताच जयंत पाटील यांनी आपल्या मतदारसंघातील ईश्वरपुर नगराध्यक्ष अपात्रतेच्या मुद्द्यावर भेट घेतल्याचे स्पष्ट करत तेथे तटकरे पटेल आले होते का हे माहित नसल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस यांची जयंत पाटील यांनी भेट घेतली. त्यानंतर शरद पवार यांचा राष्ट्रवादी एनडीएसोबत जाणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगताना दिसल्या. अशावेळी महाविकास आघाडीत फुट पडणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र मुख्यमंत्र्यांच्या भेटीबद्दल जयंत पाटील यांनी सांगितले की, मी सीएमची वेळ घेतली होती त्यामध्ये थोडेफार मागे पुढे झाले. त्यांच्या केबिनमध्ये जाऊन चहा घेतला. सीएम आले त्यांनी विचारलं काय झालं. त्यावर माझ्या मतदार संघातील नगराध्यक्षाला अपात्र ठरवण्यात आल्याचा मुद्दा त्यांना सांगितले. यावर मुख्यमंत्री म्हणाले मी माहिती घेतो. त्या आधी मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीचा प्रयत्न केला ते दिल्लीत होते. त्यांचा फोन बंद होता. त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांना पाच दहा मिनिटे भेटलो.

जयंत पाटील म्हणाले,  प्रथमता मी हॉलमध्ये बसलेलो. ते बऱ्याच वेळाने आले. तेव्हा त्यांची भेट झाली. त्यावेळी सीएम म्हणाले गडबड सुरू आहे. मिटिंग सुरू आहे. काय आहे. तेव्हा मी माहिती दिली. तेव्हा ते म्हणाले, मी दोन दिवसात माहिती घेऊन सांगतो. आम्ही अपील करणार असल्याचं सांगितलं.अशी माहिती पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

जयंत पाटील पुढे म्हणाले, नगरविकास मंत्र्यांकडे अपील करावं लागतं. पण नगरविकास मंत्री नव्हते. मी हॉलमध्ये एकटाच होतो. तिथे सुनिल तटकरे आले हे मला माहीत नाही.  मी घरी आल्यावर फुटबॉलची मॅच पाहत होतो. त्यावेळी अशा बातम्या सुरु असल्याचे मेसेज आले. म्हटलं सकाळी बोलू अशी माहिती दिली.

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, विलिनीकरणाच्या चर्चेशी काही संबंध नाही. मी फक्त नगराध्यक्ष अपात्र ठरल्याचं कारण होतं. मी त्यांना भेटलो. प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे वर्षा बंगल्यावर होते, याबाबत आपल्याला काहिही माहिती नसल्याचे स्पष्ट केले.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, तिसऱ्या मुंबईच्या विकासाला आंतरराष्ट्रीय भागीदारीमुळे गती मिळणार रायगड-पेण ग्रोथ सेंटरमध्ये १०० एकरांचा जागतिक दर्जाचा मिश्र-वापर विकास प्रकल्प, मॅपलट्रीकडून १.१ अब्ज डॉलरपेक्षा अधिक FDI अपेक्षित; सुरबाना ज्युराँगची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती

मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) आणि त्यापलीकडील परिसर हा देशाच्या आर्थिक विकासाचे प्रमुख केंद्र बनण्याची क्षमता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *