विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन यांच्या नाट्यमय अटकेवरून डीएमके आणि सत्ताधारी टीव्हीके यांच्यात तणाव वाढत असताना, एम. के. स्टॅलिन यांनी मंगळवारी विजय यांच्यावर सर्वात धारदार हल्ला चढवत त्यांना ‘अकार्यक्षम’ आणि ‘डमी मुख्यमंत्री’ म्हटले. एका सडेतोड निवेदनात, स्टॅलिन यांनी अहंकारामुळे विनाश होतो असा इशारा दिला आणि कावेरी पाणी प्रश्नावर राज्याच्या हिताचे रक्षण …
Read More »डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाकडून एच-1बी व्हिसा कठोर करणारः भारतीयांची होणार अडचण अतिरिक्त शुल्क लागू करून एच-1बी आणि एल-1 व्हिसावरील अतिरिक्त शुल्क वाढवणार
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रशासन विद्यमान एच-1बी H-1B व्हिसाच्या मुदतवाढीसाठी अतिरिक्त शुल्क लागू करून एच-1बी H-1B व्हिसा प्रणाली अधिक कठोर करत आहे. आतापर्यंत, हे शुल्क केवळ नवीन H-1B आणि L-1 व्हिसासाठीच भरावे लागत असे. या निर्णयामुळे एच-1बी H-1B सारख्या व्हिसावर अमेरिकेत कार्यरत असलेल्या परदेशी कर्मचाऱ्यांना कायम ठेवू इच्छिणाऱ्या कंपन्यांचा …
Read More »डी वाय पाटील शैक्षणिक संस्थेचे संस्थापक माजी राज्यपाल डी वाय पाटील यांचे निधन वयाच्या ९० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
भारतातील सुप्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि बिहार, त्रिपुरा व पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल डॉ. ज्ञानदेव यशवंतराव अर्थात डी वाय पाटील यांचे मंगळवारी महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. जवळपास पाच दशकांच्या काळात, त्यांनी शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे आणि रुग्णालयांचे जाळे उभारून देशभरातील लाखो विद्यार्थ्यांना शिक्षण दिले आणि ते …
Read More »सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, डिजीटल अटक प्रकरणी संस्थानी एकत्र काम करण्याचे निर्देश देशभरात ठिकठिकाणी घोटाळे गमावलेले पैसे परत मिळविण्यासाठी एकत्रित काम करा
सर्वोच्च न्यायालयाने ‘डिजिटल अटक’ घोटाळ्यांना देशभरात समन्वित प्रतिसाद देण्याचे आदेश दिले आहेत. फसवणूक रोखण्यासाठी आणि सायबर गुन्हेगारांमुळे गमावलेले पैसे परत मिळवण्यासाठी पीडितांना मदत करण्याकरिता बँका, वित्तीय मध्यस्थ आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांना एकत्र काम करण्याचे निर्देश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने एका आंतर-विभागीय समितीला फसवणुकीच्या वाढत्या पद्धतीला तोंड देण्यासाठीच्या उपाययोजनांवर बँका …
Read More »वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी उदयनिधी स्टॅलिन यांची अटक व सुटका मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर दिला स्टेशन जामीन
कावेरी पाणी वादावरून तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांच्यावर टीका करताना केलेल्या एका वादग्रस्त विधानामुळे अटक करण्यात आलेल्या, विधानसभेतील विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन यांची त्याच दिवशी ‘स्टेशन जामिनावर’ (पोलीस ठाण्यातील जामिनावर) सुटका करण्याचे आदेश मद्रास उच्च न्यायालयाने मंगळवारी दिले. एका भाषणादरम्यान केलेल्या वादग्रस्त विधानामुळे त्यांना अटक करण्यात आली होती; या विधानाचा …
Read More »एकनाथ शिंदे यांचे आश्वासन, ठाणे अंतर्गत मेट्रो प्रकल्पाबाबत सर्वांना विश्वासात घेणार लोकप्रतिनिधी आणि स्थानिक नागरिकांच्या मनातील प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी व्यापक जनजागृती करणार
ठाणे अंतर्गत मेट्रो प्रकल्प हा लाखो ठाणेकरांच्या हितासाठीच हाती घेण्यात आला असून, त्याबद्दल असलेले सर्व गैरसमज दूर करण्यासाठी व्यापक जनजागृती करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. तसेच या प्रकल्पाबाबत असलेले आक्षेप जाणून घेऊन ते तातडीने दूर करण्यासाठी जागोजागी चर्चासत्रे आयोजित करण्याचे निर्देश त्यांनी शिंदे यांनी या प्रकल्पाची अंमलबजावणी …
Read More »दत्तात्रय भरणे यांचा इशारा, अनुदानित खतांसोबत इतर कृषी निविष्ठांचे लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई आमदार रोहित पवार यांच्या आरोपानंतर दिला इशारा
शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार केवळ आवश्यक असलेली कृषी निविष्ठा खरेदी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. अनुदानित खतांसोबत इतर उत्पादने सक्तीने विकणे हा अन्यायकारक प्रकार असून, अशा लिंकिंगला राज्य शासनाने आधीच बंदी घातली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)चे …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन, एअर इंडिया इमारतीच्या नुतनीकरणात लोकाभिमुख प्रशासकीय रचनेला प्राधान्य द्या मुख्य सचिवांना निर्देश संबंधितांची एक बैठक घेऊन सुयोग्य नियोजन करा
राज्य शासनाच्या विविध शासकीय विभागांच्या अधिक गतिमान आणि सुलभ कार्यपद्धतीच्या दृष्टीने एअर इंडिया इमारतीचे नुतनीकरण करण्यात येणार आहे. नूतनीकरण करताना लोकाभिमुख प्रशासकीय रचनेला प्राधान्य देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिले. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एअर इंडिया इमारतीसंदर्भातील सादरीकरण करण्यात आले, त्यावेळी त्यांनी संबंधितांना निर्दशित …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, ‘ई-२०’ हे मोदी-गडकरी-फडणवीसांचा मोठा स्कॅम, गडकरींचा राजीनामा घ्या पेट्रोलच्या किमतीत पाणी विकून वाहनधारकांची घोर फसवणूक केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची माफी मागावी
पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळून कोट्यवधी रुपयांचा लाभ सरकारमध्ये बसलेल्या काही लाभार्थ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना झाला पण त्यामुळे देशातील लाखो वाहनधारकांना नाहक त्रास होत आहे. वाहनात अनेक बिघाड झाले, हे एक मोठे स्कॅम असून त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत. इथेनॉल घोटाळ्याप्रश्नी केंद्रीय मंत्री …
Read More »मुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील १९ जणांनी घेतली मंत्रीपदाची शपथ २० जणांच्या मंत्रिमंडळातील सहकारी एका महिला आमदाराने घेतली नाही मंत्री पदाची शपथ
सोमवारी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील कर्नाटक सरकारमध्ये काँग्रेसच्या एकोणीस आमदारांनी मंत्री म्हणून शपथ घेतली, तर एकमेव महिला उमेदवार गायत्री शांतेगौडा या शपथविधी सोहळ्याला अनुपस्थित होत्या. दोन महिन्यांपूर्वी डी के शिवकुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर झालेल्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या निमित्ताने, बंगळूरू येथील लोक भवनात आयोजित एका सोहळ्यात राज्यपाल …
Read More »
Marathi e-Batmya