Breaking News

मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश, ई-बसेससाठी चार्जिंग स्टेशनचे जाळे उभारा ‘विकसित महाराष्ट्र’ अंतर्गत एसटीचा १०० टक्के ताफा ई-बसेसमध्ये रूपांतरित करण्याचे उद्दिष्ट

‘विकसित महाराष्ट्र अंतर्गत’ पर्यंत एसटी महामंडळामध्ये सन २०२९ पर्यंत ५० टक्के, २०३५ पर्यंत ८० टक्के; तर २०४७ पर्यंत एसटीचा १०० टक्के ताफा ई-बसेसमध्ये रूपांतरीत करायचा आहे. या अनुषंगाने बसेससाठी आवश्यक असलेले चार्जिग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली  वर्षा येथील निवासस्थानी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या …

Read More »

राहुल गांधी त्या विद्यार्थ्यांना म्हणाले, तुम्ही प्रश्न विचारला म्हणून देशद्रोही ठरलात सीबीएसई बोर्डाकडे उत्तर पत्रिकेची प्रत मागणाऱ्या विद्यार्थ्यांशी राहुल गांधी यांनी केली चर्चा

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी, आपल्या परीक्षेतील गुणांबद्दल चिंता व्यक्त करणाऱ्या सीबीएसईच्या इयत्ता १२वीच्या विद्यार्थ्यांच्या गटासोबतच्या त्यांच्या संवादाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ‘एक्स’वर पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये, राहुल गांधी यांनी बोर्डाच्या मूल्यांकन प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि पुनर्मूल्यांकनादरम्यान त्यांना कथितरित्या आढळलेल्या विसंगतींवर चर्चा केली. “माझ्या सहकारी …

Read More »

अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ म्हणाले की, पाकिस्तानशी खरी मैत्री विकसित होतेय पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असिम मुनीर यांच्या कामाचेही केले कौतुक

अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी शनिवारी वॉशिंग्टन आणि इस्लामाबाद यांच्यातील सुधारत असलेल्या संबंधांवर प्रकाश टाकला. त्यांनी पाकिस्तानच्या नागरी आणि लष्करी नेतृत्वाची प्रशंसा केली आणि अमेरिकेसोबत विकसित होत असलेल्या संबंधांना प्रादेशिक शांततेसाठी एक महत्त्वपूर्ण घडामोड म्हटले. सिंगापूरमधील शांग्री-ला डायलॉगमध्ये बोलताना हेगसेथ म्हणाले की, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानच्या नेतृत्वाशी …

Read More »

कर्नाटकचे भावी मुख्यमंत्री डी के शिवकुमार यांचा शपथविधी सोहळा होणार साधेपणाने यापूर्वी गर्दीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी डी के शिवकुमार यांना दिला इशारा

कर्नाटकभरातून काँग्रेस कार्यकर्ते आणि समर्थकांच्या अपेक्षित गर्दीमुळे बंगळूरमधील वाहतुकीत व्यत्यय येण्याच्या चिंतेमुळे, भावी मुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी रविवारी जाहीर केले की, ३ जून रोजी होणारा त्यांचा शपथविधी सोहळा साधेपणाने पार पडेल. बुधवारी दुपारी ४.०५ वाजता लोक भवन येथे कर्नाटकचे पुढील मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असलेल्या डी के शिवकुमार यांनी …

Read More »

इराण-अमेरिका युद्धाबाबत डोनाल्ड ट्रम्प निर्णय न घेता व्हाईट हाऊसमधून बाहेर आज अमेरिका-इराण युद्धाबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार होता

इराणसोबतच्या संभाव्य करारावर निर्णय घेण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षतेखाली व्हाईट हाऊसमध्ये झालेली बैठक या आठवड्याच्या सुरुवातीला कोणत्याही निष्कर्षाशिवाय संपली. असोसिएटेड प्रेसने ट्रम्प प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसार, अध्यक्ष दोन तासांच्या बैठकीतून कोणताही निर्णय न घेता बाहेर पडले. शुक्रवारी झालेल्या या बैठकीपूर्वी, डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल …

Read More »

सीबीएसईचा अखेर यु-टर्न, पोर्टलच्या सुरक्षेत त्रुटी राहिल्याने संकेतस्थळ दोनवेळा हॅक हॅक झाल्यानेच ऑन स्क्रिन मार्किंग प्रणालीत वाद निर्माण झाल्याचा सीबीएसईचा दावा

ऑन-स्क्रीन मार्किंग (OSM) प्रणालीवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने अर्थात सीबीएसई (CBSE) रविवारी इयत्ता १२वीच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या डिजिटल प्लॅटफॉर्ममधील त्रुटी मान्य केल्या आहेत. यापूर्वी मंडळाने म्हटले होते की, निदर्शनास आलेल्या समस्या चुकीच्या URL आणि टेस्टिंग पोर्टलशी संबंधित होत्या, सुरक्षेतील त्रुटींशी नाही. या दाव्याच्या तुलनेत हे …

Read More »

अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या कार्यक्रमातच कर्जमाफीबाबत कृषी मंत्री भरणे यांचे वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मात्र मौन

मागील अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या दरम्यान, राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफी योजनेची घोषणा केली. त्यानंतर कर्जमाफी घोषणेची अंमलबजावणीस अद्यापही सुरुवात केली नाही. त्यातच यंदाचा पावसाळा आता तोंडावर आलेला असताना कर्जमाफीची अंमलबजावणी करणे आवश्यक बनले आहे. मात्र राज्य सरकारच्या तिजोरीत पैशांचा तुटवडा असल्याने आणि विविध प्रकल्पांवर सध्या खर्च सुरु असल्याने कर्जमाफीसाठी पैसा कोठून …

Read More »

१० जूनपर्यंत राज्यातील बहुतांश भागात मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही १ जून पासून वादळी पावसाचा अंदाज, मात्र शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

सध्या राज्यातील हवामानात बदल होण्यास सुरुवात झाली आहे, आणि १ जून पासून सुरु होणाऱ्या आठवड्यात हवामानात अजून बदल होईल. प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खान्देशात दुपार नंतरचे ढग आणि काही प्रमाणात वादळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. कोकणात देखील काही प्रमाणात पावसाचा अंदाज आहे. याच बरोबर मे महिन्याच्या तुलनेत …

Read More »

सुनेत्रा अजित पवार यांची माहिती, अहिल्यादेवीचा जीवनपट माझ्यासाठी आदर्श दीपस्तंभासारखा पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी सुनेत्रा अजित पवार नतमस्तक...

स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले इत्यादींच्या पुरोगामी विचारांच्या वारशामुळेच हे शक्य झाले असे सांगतानाच आदरणीय अजितदादांच्या पश्चात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनपट माझ्यासाठी आदर्श दीपस्तंभासारखा कार्य करत आहे, अशा भावना राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज चौंडी येथे व्यक्त केल्या. अखंड …

Read More »

एकनाथ शिंदे यांचे मत, अहिल्यादेवींच्या विचारांचा वारसा समाजाने अंगीकारण्याची गरज श्रीक्षेत्र चौंडीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा ३०१ वा जयंती महोत्सव

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या मूल्यांचा प्रसार अहिल्यादेवींनी आपल्या कार्यातून देशभर केला. त्यांनी अंधश्रद्धेला कधीही थारा दिला नाही आणि समाजाला योग्य दिशा दाखविण्याचे कार्य केले. त्यांच्या विचारांचा वारसा अंगीकारण्याची समाजाला गरज आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंती महोत्सवात …

Read More »