जातनिहाय जनगणना ही सर्व जातींच्या हितासाठी आहे. जातींचा डेटा स्पष्ट झाला तरच प्रत्येक वर्गाला न्याय देता येईल, त्यासाठीच काँग्रेस पक्षाने जातनिहाय जनगणनेची आग्रही मागणी केली होती. उशिरा का असेना पण मोदी सरकारने जातनिहाय जनगणनेची घोषणा केली आहे, पण यात काही त्रुटी आहेत. जनगणनेच्या अर्जात एससी-एसटी SC/ST साठी स्वतंत्र उल्लेख आहे परंतु ओबीसी OBC प्रवर्गासाठी वेगळ्या रकान्याची तरतूद …
Read More »मोजतबा खामेनीच्या मालकीचे लंडनमध्ये दोन अपार्टमेंट, इराणी दूतावास म्हणते, दावा निराधार मालकीची कोठेच मालमत्ता नाही
इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांच्या मालकीचे लंडनमधील इस्रायली दूतावासासमोर दोन अपार्टमेंट आहेत, असा दावा ब्रिटिश राष्ट्रीय वृत्तपत्र ‘द संडे टाइम्स’सह अनेक माध्यमांनी केला होता. हे दावे “पूर्णपणे निराधार” असल्याचे सांगत, भारतातील इराणी दूतावासाने हे दावे फेटाळून लावले आहेत. त्यांच्या मालकीची कुठेही कोणतीही मालमत्ता नाही, असेही दूतावासाने म्हटले आहे. “अयातुल्ला …
Read More »सत्य निकेतन इमारत दुर्घटनेनंतर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने विद्यापीठ विस्ताराची केली योजना विद्यार्थ्यांना परवडतील अशी निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी आवाहन
दिल्लीच्या सत्य निकेतन येथील पेइंग गेस्ट निवासस्थान कोसळून सात जणांचा मृत्यू झाल्याच्या काही दिवसांनंतर, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) दिल्ली विद्यापीठातील वसतिगृह सुविधांच्या कमतरतेची गंभीर दखल घेतली आहे आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित व परवडणारी निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. या मानवाधिकार संस्थेने दिल्लीचे मुख्य सचिव आणि विद्यापीठ …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विरोधकांना उद्देशून नाराज फुफा जी चा टोमणा गुजरातच्या वडोदरा येथे नमो फॉ विक्सित भारत कार्यक्रमात बोलताना केली टीका
विरोधी पक्षांवरील आपला हल्ला अधिक तीव्र करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी आपल्या सरकारच्या विकासकामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘नाराज फुफा जी’ म्हणजेच ‘नाराज मामा’ या विशेषणाचा पुनरुच्चार केला. पंतप्रधान मोदी यांनी गुजरातच्या वडोदरा येथे ‘नमो फॉर विक्सित भारत’ कार्यक्रमात ही टिप्पणी केली, जिथे त्यांनी ३५,००० कोटी रुपयांच्या विकास …
Read More »पंतप्रधान कार्यालयाचा बनावट बॉडीगार्ड जिओ वर्ल्ड प्लाझा मध्ये दोघांना अटक पंतप्रधान मोदी यांच्या कार्यक्रमाच्या आधी पिस्तुलधारी आढळला
मुंबईच्या जिओ वर्ल्ड प्लाझा येथे दोन जणांना अटक करण्यात आली. त्यापैकी एकाने सुरक्षा कर्मचाऱ्यांना पंतप्रधान कार्यालयाने जारी केल्याचे भासवणारे एक संशयास्पद ओळखपत्र दाखवले, तर दुसऱ्याकडे परवानाधारक अग्निशस्त्र आढळून आले. ही घटना सोमवारी संध्याकाळी घडली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथील कार्यक्रमाच्या काही तास आधी. …
Read More »सरकारच्या तिजोरीतील खडखडः सांस्कृतिक विभाग वरळीच्या डोममधून प्रभादेवीच्या रविंद्र नाट्य मंदिरात मराठी चित्रपट सोहळ्याचा कार्यक्रम यंदा रविंद्र नाट्य मंदिरात
राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत बॉलीवूड असल्याने आणि इथल्या तारे-तारकांच्या झगमटात मुंबईच्या चंदेरी दुनियेला एक वेगळीच झळाळी येते. आतापर्यंत या झळाळीला शोभल अशाच कार्यक्रमाचे आयोजन राज्याच्या सांस्कृतिक विभागाकडून आतापर्यंत करण्यात आले. मात्र यंदाच्या वर्षी सांस्कृतिक विभागाने ६२ व्या मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे आयोजन दरवर्षी वरळी येथील डोम या स्टेडियम सदृष्य …
Read More »एमपीएससी अध्यक्ष-सचिवांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात हजारो विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा माजी मंत्री आ. विश्वजीत कदम यांच्यासह काँग्रेस नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मोर्चात सहभाग
एमपीएससी MPSC च्या परीक्षा प्रक्रियेतील कथित गैरप्रकार, अनियमितता, संशयास्पद मूल्यमापन, निकालातील गोंधळ आणि विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांविरोधात एमपीएससी MPSC अध्यक्ष व सचिवांचा राजीनामा घेण्याच्या प्रमुख मागणीसाठी आज पुण्यात हजारो विद्यार्थ्यांनी आक्रोश मोर्चा काढला. विद्यार्थी व विविध विद्यार्थी संघटनांनी आयोजित केलेल्या या मोर्चात ओंकारेश्वर मंदिर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचे मत, फॅसिस्ट विचारापासून देशाला वाचण्याची गरज भाजपा व आरएसएसकडून संविधान संपविण्याचा प्रयत्न, संविधान वाचले तर देश वाचेल, संविधान वाचवण्याच्या लढ्यात सहभागी व्हा
देशात दोन विचारप्रवाह आहेत, एक विचार सर्व जाती धर्मांना समान हक्क व अधिकार देणारा आहे. स्त्री-पुरुष समानता देणारा विचार आहे, हा विचार संविधानाचा असून तोच विचार काँग्रेस पक्षाचा आहे तर दुसरीकडे मनुस्मृतीला मानणारा, राजसत्ता व धर्मसत्ता मुठभर लोकांच्या हाती असावी हा भारतीय जनता पक्ष आरएसएसचा विचार आहे. भाजपा, संघाचा हा फॅसिस्ट विचार देशासाठी व …
Read More »दत्तात्रय भरणे यांचे आवाहन, भारतीय डाळिंबाला जागतिक बाजारपेठेत नवी ओळख मिळण्यासाठी एकत्र काम करावे पुण्यात आंतरराष्ट्रीय डाळिंब परिषद–२०२६
भारतीय डाळिंबाला जागतिक बाजारपेठेत उच्च दर्जाचे, सुरक्षित आणि विश्वासार्ह उत्पादन म्हणून नवी ओळख मिळवून देण्यासाठी केवळ उत्पादन वाढविणे पुरेसे नाही. गुणवत्ता, उत्पादकता, निर्यात, प्रक्रिया आणि मूल्यवर्धन यावरही भर देत शेतकरी, वैज्ञानिक, उद्योजक आणि शासनाने एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. यशदा, पुणे येथे …
Read More »साखर कारखान्यांच्या मार्जिन मनी कर्जासाठी मंत्री समितीचे अधिकार अधिकाऱ्यांच्या समितीला राज्य सरकारचा निर्णय, शासन निर्णय जारी
राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाकडून (NCDC) मार्जिन मनी कर्जासाठी सहकारी साखर कारखान्यांची शिफारस करण्याची प्रशासकीय प्रक्रिया कमी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एका मंत्रीस्तरीय समितीची आवश्यकता संपुष्टात आणून ही जबाबदारी अधिकाऱ्यांच्या समितीकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी जारी केलेल्या शासकीय ठरावात म्हटले आहे की, “एनसीडीसीकडे शिफारस करण्यात येणाऱ्या सहकारी साखर कारखान्यांचे प्रस्ताव आर्थिकदृष्ट्या …
Read More »
Marathi e-Batmya