Breaking News

पुराच्या पार्श्वभूमीवर भारत आणि चीनकडून नेपाळला मदत दोन्ही देशांनमधील भागांना पुराचा फटका

नेपाळमधील अचानक आलेल्या पुरामुळे बाधित झालेले भारतीय नागरिक भारतीय दूतावासाने जारी केलेल्या आपत्कालीन संपर्क क्रमांकांवरून मदत आणि माहिती मिळवू शकतात. ज्यांना सुरू असलेल्या बचाव आणि मदत कार्याशी संबंधित मदत किंवा माहिती हवी आहे, ते +977 985 131 6807 किंवा +977 970 910 7500 या क्रमांकांवर संपर्क साधू शकतात. विनाशकारी पुरामुळे …

Read More »

नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात भीषण पुर, नऊ जणांचा मृत्यू तर १०५ भारतीय बेपत्ता घरे, वाहने, पूल आणि पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची ठिकाणे वाहून गेली

नेपाळच्या तिबेट सीमेला लागून असलेल्या उत्तर रसुवा जिल्ह्यात बुधवारी आलेल्या भीषण पुरामुळे नऊ जणांचा मृत्यू झाला असून १०५ भारतीय बेपत्ता आहेत. या पुरामुळे घरे, वाहने, पूल आणि पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची ठिकाणे वाहून गेली आहेत. पुराचे पाणी प्रवाहाच्या दिशेने पुढे सरकत असल्याने, नेपाळला लागून असलेल्या बिहार राज्यामध्येही सतर्कतेचा इशारा देण्यात आला …

Read More »

दत्तात्रय भरणे यांची माहिती, पीएमएफएमई योजनेला मिळालेला पुरस्कार महाराष्ट्र आणि कृषी विभागाच्या मेहनतीची पावती पीएमएफएमई योजनेत महाराष्ट्राचा राष्ट्रीय गौरव; अतीउत्कृष्ट कामासाठी प्रथम पुरस्काराने सन्मान

पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (पीएमएफएमई) अंतर्गत उत्कृष्ट कामासाठी  महाराष्ट्राला राष्ट्रीय स्तरावर आज प्रदान करण्यात आलेला पुरस्कार हा राज्यातील शेतकरी, महिला, युवा, स्वयं सहायता समूह, शेतकरी उत्पादक संस्था, सूक्ष्म उद्योजकां आणि कृषी विभागाच्या अथक मेहनतीची पावती आहे. या सन्मानामुळे कृषीमालाचे अधिकाधिक मूल्यवर्धन करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला आणि ग्रामीण रोजगाराला बळ देण्याची …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा आरोप, महिला आरक्षण विधेयकावरून भाजपा व मुख्यमंत्री फडणवीसांकडून दिशाभूल भाजपाची मानसिकताच महिलाविरोधी, पुण्यातील ‘छात्रों की गुंज’मधून मुलींनी त्यांच्या हक्कासाठी आवाज उठवला तर भाजपाला पोटदुखी का झाली?

वर्षा गायकवाड

महिला आरक्षण विधेयकाला राहुल गांधी व काँग्रेस पक्षाचा विरोध आहे असा खोटा आरोप राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. काँग्रेस पक्षानेच महिला आरक्षणचा निर्णय देशात सर्वात आधी घेऊन तो लागूही केला पण भाजपाची महिला विरोधी मानसिता असल्यानेच २०२३ मध्ये संसदेत एकमताने महिला आरक्षण विधेयक मंजूर होऊनही भाजपाचे काही बोलघेवडे नेते …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, आदिवासी विद्यार्थ्यांचे १३ दिवसापासून उपोषण, सरकार झोपले आहे का? मंत्र्यांची हकालपट्टी करा आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे भाजपा महायुती सरकारचे दुर्लक्ष, तातडीने प्रश्न सोडवा

राज्यात पुणे, नाशिक, वर्धा, पालघर सह अनेक ठिकाणी आदिवासी विद्यार्थ्यांचे उपोषण मागील १३ दिवसापासून सुरु आहे. राज्यातील भाजपा महायुती सरकार विकासाच्या मोठ्या गप्पा मारते पण आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यास त्यांना वेळ नाही, काल मंत्रिमंडळाची बैठक झाली पण त्यातही आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर चर्चा झाली नाही. भाजपा महायुती सरकार हे आदिवासी विरोधी आहे. या आदिवासी …

Read More »

राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांचे आदेश, एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्राचा सर्वंकष आराखडा तयार करावा वर्धा संदर्भात आढावा बैठक मंत्रालयात घेण्यात आल्यानंतर दिले निर्देश

राज्य राखीव पोलीस बलाचे (एसआरपीएफ) अत्याधुनिक व जागतिक दर्जाचे प्रशिक्षण केंद्र वर्धा येथे उभारण्यासाठी सर्वंकष आराखडा तयार करण्यात यावा, अशा सूचना  गृह (ग्रामीण) राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिल्या. राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र, वर्धा संदर्भात आढावा बैठक मंत्रालयात घेण्यात आली. यावेळी राज्य राखीव पोलीस बलाचे अपर महासंचालक राजकुमार व्हटकर, पोलीस गृहनिर्माण मंडळाचे …

Read More »

जयकुमार गोरे यांचे निर्देश, जिल्हा परिषदेच्या शाळा महिन्याभरात सुविधांयुक्त कराव्यात सध्या उपलब्ध पायाभूत सुविधांच्या आधारे शाळांचे वर्गीकरण करावे

आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सध्या उपलब्ध असलेल्या सुविधांच्या आधारे ‘ए, बी, सी, डी’ असे वर्गीकरण करण्यात यावे. तसेच, शाळांमधील पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, वीज आणि वर्ग खोल्यांची स्थिती यांचा प्रत्यक्ष आढावा घेऊन आठ दिवसांत अहवाल सादर करावा, असे निर्देश ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेबाबतच्या मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत …

Read More »

अरविंद केजरीवाल यांचे भाजपाला खुले आव्हान, गुजरात आणि पंजाबमधील शाळांची तुलना करा पंजाब सरकारच्या शाळांना बदनाम करण्यासाठी बनावट एआय व्हिडिओ

आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी भाजपला पंजाब आणि गुजरातमधील १,००० शाळांची तुलना करण्याचे ‘खुले आव्हान’ दिले. त्यांनी असाही आरोप केला की, भाजप पंजाब सरकारच्या शाळांना बदनाम करण्यासाठी ‘बनावट, एआय व्हिडिओ’ वापरत आहे. एका व्हिडिओ संदेशात, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, ही तुलना संयुक्तपणे केली …

Read More »

धोतरा- बियांच्या ऑनलाईन विक्री प्रकऱणी कर्नाटककडून ॲमेझॉन, स्विगी, इन्स्टामार्ट आणि बिगबास्केटचे परवाने रद्द पुढील आदेशापर्यंत निलंबनाची कारवाई

कर्नाटकच्या अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासनाने (FDA) विषारी धोतरा (धतुरा) फळे आणि बियांच्या ऑनलाइन विक्रीप्रकरणी ॲमेझॉन, स्विगी, इन्स्टामार्ट आणि बिगबास्केट यांना जारी केलेले अन्न परवाने पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. या प्लॅटफॉर्मवर धोतरा फळे आणि बिया अन्न आणि मानवी सेवनासाठी उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे विभागीय चौकशीत आढळून …

Read More »

तृणमूल काँग्रेसच्या २० फुटीर खासदारांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस अभिषेक बॅनर्जी यांनी दाखल केलेल्या रिट याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाची कारवाई

सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस आणि लोकसभा नेते अभिषेक बॅनर्जी यांनी दाखल केलेल्या रिट याचिकेवर २० बंडखोर तृणमूल काँग्रेस खासदारांना नोटीस बजावली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे प्रलंबित असलेल्या अपात्रता याचिकांवर तातडीने निर्णय घेण्यासाठी त्यांनी न्यायालयाकडे निर्देश मागितले होते. मात्र, याचिकेत प्रथम प्रतिवादी म्हणून नाव असूनही, बिर्ला यांना कोणतीही …

Read More »