अनुष्का शिकतेय विणकाम विवाहबंधनात अडकूनही नव्याच्या प्रयत्नात

मुंबईः प्रतिनिधी

एखाद्या भूमिकेला अचूक न्याय देण्यासाठी काही कलाकार जीवाचं रान करतात. कधी कोणी ओरिजनल गेटअपमध्ये येण्यासाठी दाढीमिशा वाढवतं, तर कोणी मुंडन करतंकधी कोणी वाजवीपेक्षा जास्त वजन वाढवतं, तर कोणी आश्चर्यकारकरीत्या वजन घटवतंकोणी नृत्याचे धडे गिरवतं, तर कोणी मार्शल आर्ट्सचं प्रशिक्षण घेतंपण नुकतीच विवाहबंधनात अडकलेली अनुष्का शर्मा याहीपेक्षा काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नात आहे. अनुष्का सध्या विणकाम शिकतेय.

तसं पाहिलं तर बऱ्याच तरुणींचा लग्नानंतर शिवणकाम तसंच विणकामाकडे ओढा वाढतो. त्यामुळे कदाचित विराट कोहलीसोबतच लग्नाच्या बेडीत अडकल्यानंतर अनुष्काही असंच काहीतरी करण्याचा प्रयत्न करतेय की काय? असा प्रश्न पडणं साहाजिक आहे, पण तसं काहीही नाही. अनुष्का शर्मासारखे काही हाडाचे कलाकार नेहमीच काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यापैकी बऱ्याच गोष्टी रुपेरी पडद्यावर सत्य वाटाव्यात यासाठी असतात. अनुष्काचं विणकाम शिकणं हा देखील आगामी चित्रपटातील भूमिकेचाच एक भाग आहे. अनुष्का विणकाम करीत असल्याचा फोटो यश राज फिल्म्सने ट्विटरवर शेअर केला आहे. या फोटोसोबत ‘सुई धागा’ या आगामी चित्रपटासाठी अनुष्का विणकाम शिकत असल्याचं म्हटलं आहे. हाच योटो इन्स्टाग्रामवर शेअर करीत अनुष्काने म्हटलं आहे की, धाग्याने विणलेली कथा रफू करून ऐकवायची आहे सुई धागा. या फोटोमध्ये अनुष्का एका फुलाचं चित्र विणत असल्याचं दिसतं.

सुई धागा’च्या निमित्ताने अनुष्का पुन्हा एकदा यशराज बॅनरसोबत काम करीत आहे. या चित्रपटात तिची जोडी वरुण धवनसोबत जमली आहे. या चित्रपटाचं लेखनदिग्दर्शन शरत कटारिया करीत असून, गोविंद पांडेसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.

About Editor

Check Also

आशिष शेलार यांची माहिती, चित्रपट उद्योगासाठी प्रोत्साहन धोरणाचा अभ्यास करण्यासाठी समिती राज्यात नवीन फिल्म सिटी, सिंगल विंडो क्लिअरन्स आणि आधुनिक चित्रीकरण सुविधांवर भर

राज्यातील चित्रपट उद्योगाला चालना देण्यासाठी तसेच निर्माते आणि निर्मिती संस्थांच्या विविध अडचणी व प्रश्न सोडविण्यासाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *