विकास दर ७ ते ७.५ टक्के राहण्याचा अंदाज आर्थिक सर्व्हेक्षण अहवालातील भाकिताने शेअर बाजार उसळला

नवी दिल्लीः प्रतिनिधी

आर्थिक सुधारणांसाठी उचललेल्या पावलांमुळे देशाचा विकास वेगाने होणार असून देशाचा विकासाचा दर ७ ते ७.५ टक्के राहणार असल्याचे भाकित अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सोमवारी लोकसभेत सादर केलेल्या आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल २०१८–१९ मध्ये केला. तर कृषी विकास दर २.१ टक्के, औद्योगिक विकास दर ४.४ टक्के आणि सेवा क्षेत्रात ८.३ टक्के वाढ होण्याचे अनुमान सर्व्हेक्षणात वर्तवण्यात आला आहे.

दरम्यान, आर्थिक सर्व्हेत जीडीपी वाढण्याच्या अंदाजाने देशातील शेअर बाजारांनी उसळी घेतली. सेन्सेक्स २३३ अंकाने वधारून ३६ हजार ४४३ वर तर निफ्टी ६१ अंकाने वाढून ११ हजार १३० वर बंद झाला.
आर्थिक सर्व्हेत अर्थव्यवस्थेचे आशादायी चित्र दिसत असले तरी सर्व्हेत कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतीबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे. सर्व्हेनुसार, २०१८–१९ मध्ये कच्च्या तेलाच्या किंमतीत १२ टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे. याशिवाय वातावरण बदलामुळे मध्यावतीतील शेती उत्पन्न २० ते २५ टक्के घटू शकते अशा इशाराही सर्व्हेत देण्यात आला आहे.
वित्तीय तूट ३ टक्के राहण्याचा अंदाज
आर्थिक वर्ष २०१९ मध्ये वित्तीय तूटीचे लक्ष्य थोडे वाढण्याची शक्यता आहे. या वर्षात वित्तीय तूट ३ टक्के राहील असा अंदाज आर्थिक सर्व्हेत वर्तवण्यात आला आहे. जीसीएसटी महसूला वाढ होण्याचीही आशा आहे. पुढील आर्थिक वर्षात चांगली निर्यात झाल्यामुळे अर्थव्यवस्थेत वाढ झाल्याची पहायला मिळेल. चालू आर्थिक वर्षात प्रत्यक्ष कर महसूलाचे लक्ष्य गाठता येण्याची आशा आहे. 
आर्थिक सर्व्हेनुसार, महागाई नियंत्रणात आहे. चालू आर्थिक वर्षात ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर ३.३ टक्के राहिला आहे. मागील सहा वर्षातील हा नीचांकी स्तर आहे.

About Editor

Check Also

Bank Employees Strike : तीन दिवसीय बँक कर्मचारी संप स्थगित; IBA- UFBUमध्ये करार

नवी दिल्ली : २८ सप्टेंबरपासून सुरू होणारा तीन दिवसीय देशव्यापी बँक कर्मचारी संप Bank Employees …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *