भाऊचं स्ट्रगलर्स कँटींग जगावेगळी अत्यंयात्रा चित्रपटात चालविणार कँटींग

मुंबई : प्रतिनिधी

विनोदी भूमिकांसोबतच धीरगंभीर भूमिकांनाही न्याय देण्यात यशस्वी ठरलेला अभिनेता भाऊ कदम सर्वांचाच आवडता बनला आहे. भाऊ सध्या विविधांगी विनोदी भूमिका साकारण्याला प्राधान्य देताना दिसतोय. ‘जगा वेगळी अंत्ययात्रा’ या चित्रपटातही प्रेक्षकांना एका भाऊ दिसणार आहे. या चित्रपटात भाऊने स्ट्रगलर्स कँटींगच सुरू केलं आहे.

कितीही शिक्षण घेतलं तरी स्ट्रगल कुणाला चुकत नाही. प्रत्येकाला काम मिळवण्यासाठी काही काळ धडपड करावीच लागते. अशाच काही स्ट्रगलर्ससाठी भाऊने स्टगलर्स कँटींग सुरू केलं आहे. या कँटीगंमध्ये तो स्टगलर्सना मार्गदर्शन करतो. अर्थात, हे काही खरंखुरं कँटिन नाही, तर ‘जगा वेगळी अंतयात्रा’ या चित्रपटातील आहे. ‘जगा वेगळी अंतयात्रा’ या चित्रपटात भाऊने साकारलेली भूमिका अतिशय धमाल आहे. भाऊकडे आलेल्या चार सुशिक्षित बेकार तरूणांना तो अंतयात्रा काढण्याचा सल्ला देतो. ते तरूण काम मिळवण्यासाठी तो सल्ला मानून अंतयात्रा काढतात आणि काय धमाल होते ते या चित्रपटात पहायला मिळणार आहे.

अमोल लहांडे यांनी चित्रपटाचं लेखन दिग्दर्शन केलं आहे. भाऊसोबत सुप्रीत कदम, ओंकार पुरोहित, विनम्र भाबल, डॉ. विशाल गोरे आदि कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत. डॉ. नितीन तोष्णीवाल यांच्या अल्टिमेट फिल्म मेकर्स प्रा. लि. या निर्मिती संस्थेने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

About Editor

Check Also

अभिनेता ममूटी, कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री यामी गौतमीला राष्ट्रीय पुरस्कार यामी गौतम यांना आर्टीकल ३७० साठी, तर ममूटी यांना ब्रम्हयुगम तर कार्तिक आर्यनला चंदू चॅम्पियन चित्रपटासाठी पुरस्कार

७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात, ‘ब्रह्मयुगम’ आणि ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटांसाठी अभिनेते ममूटी आणि कार्तिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *