किसिंग सीनविषयी सुरु असलेल्या चर्चांवर धर्मेंद्र यांनी सोडले मौन शबाना आझमी यांच्याबरोबरच्या किसींगसीनवर पहिल्यांदा दिली प्रतिक्रिया

करण जोहर याचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट चांगलाच हिट झाला. या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांची रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळाली. पण चित्रपटात आलिया – रणवीर पेक्षा यांच्या केमिस्ट्रीपेक्षा धर्मेंद्र आणि शबाना आझमींच्या किसिंग सीनची जास्त चर्चा झाली. ८७ वर्षीय धर्मेंद्रने वयाची साठी ओलांडलेल्या शबाना यांना पडद्यावर थेट लीप टू लीप किस केलं. यावर बॉलीवूड सह छाट्यांमध्ये जोरदार चर्चा रंगली. आता धर्मेंद्र यांनी पुन्हा यावर प्रतिक्रिया दिली आहे.

बॉलीवूड गायक कुमार सानू यांनी दुर्गा पूजा आयोजित केली होती, ज्यामध्ये बॉलिवूडचे अनेक बडे स्टार्स सहभागी झाले होते. धर्मेंद्रही तिथे पोहोचले होते. माता राणीचे दर्शन घेतल्यानंतर धर्मेंद्र यांनी मीडियासमोर अनेक पोज दिल्या सोबत त्यांच्याशी संवाद देखील साधला. या खास प्रसंगी कुमार सानू यांनी धर्मेंद्रसाठी एक गाणेही गायले. याचवेळी धर्मेंद्र यांनी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात दिलेल्या किसिंग सिनवर दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.

याविषयी प्रतिक्रिया देताना हिंदी चित्रपटसृष्टीतील हे-मॅन म्हणाले की, ‘माझ्या नातवाने पडद्यावर अनेक वेळा किसिंग सीन्स दिले आहेत आणि माझ्या एका सीनमुळे एवढी खळबळ माजली.’ अशी प्रतिक्रिया धर्मेंद्र यांनी दिली आहे. धर्मेंद्र यांनी त्यांचा नातू राजवीर देओलच्या डेब्यू चित्रपटांबद्दलही सांगितले. चांगले चित्रपट बनले तर ते लोकांच्या मनाला नक्कीच भिडतील, असे ते म्हणाले.

About Marathi E Batmya

Check Also

ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला दिलासा पुण्यातील धनकवडी येथील टीडीआर प्रकरणाला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली तात्पुरती स्थगिती

मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील जमिनीच्या टीडीआरच्या विषयाबाबत उपमुख्यमंत्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *