महेश कोठारे बनला आजोबा आदिनाथ-उर्मिलाला कन्यारत्नाचा लाभ

मुंबई : प्रतिनिधी

ज्येष्ठ अभिनेते महेश कोठारे यांच्या घरी गोड बातमी येणार असल्याचं सर्वांनाच ठाऊक होतं. आज अखेर ती बातमी आलीच. कोठारेंचा चिरंजीव अमिनेता आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री उर्मिला कोठारे यांना कन्यारत्नाचा लाभ झाला आहे. उर्मिला बाळंत असल्याचं समजल्यापासून मिडियापासून आदिनाथ-उर्मिलाच्या चाहत्यांपर्यंत सर्वांचंच या बातमीकडे लक्ष लागलं होतं. आपल्याला कन्या झाल्याची वार्ता आदिनाथने ट्विटरच्या माध्यमातून सर्वांशी शेअर केली. आजच्या जमान्यातील अभिनेत्रींप्रमाणे उर्मिलाचं बाळंतपणही चर्चेत राहिलं होतं. डोहाळे जेवणापासून बेबीमूनपर्यंत सर्व प्रकारच्या बातम्यांमुळे आदिनाथ, उर्मिला आणि त्यांचं बाळ नेहमी चर्चेत राहिलं. लहानग्या छकुलीच्या आगमनामुळे आदिनाथचे आजी-आजोबा ज्येष्ठ अभिनेते अंबर कोठारे व जेनमा कोठारे पणजोबा आणि पणजी झाले आहेत. एकूणच कोठारे कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण आहे.

 

About Editor

Check Also

अखेर सुनिता आहुजा यांनी घटस्फोटाची याचिका घेतली मागे, अभिनेता गोविंदास घटस्फोट दिलाच नाही वांद्रे येथील फॅमिली कोर्टातून याचिका घेतली मागे

त्यांच्या लग्नाबद्दल अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या अटकळांनंतर, गोविंदाचे व्यवस्थापक, शशी सिन्हा यांनी इंडिया टुडेला दुजोरा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *