आपल्या अभियानाच्या जोरावर मराठी चित्रपटाबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचे आगळेवेगळे स्थान निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर (Actress Sulochana Latkar) यांचं प्रदीर्घ आजाराने निधन (illness) झालं. त्या ९४ वर्षांच्या होत्या. दादर येथील सुश्रुषा रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारांदरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. सुलोचना दीदी यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. …
Read More »चित्रपटगृहांमध्ये मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यासंदर्भात कार्यप्रणाली तयार करणार सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती
महाराष्ट्रात मराठीसह अन्य विषयांचे अनेक चित्रपट प्रदर्शित होत असतात. पण गेल्या काही वर्षांपासून मराठी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही चित्रपटांना चित्रपटगृह मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी येत असतात. त्यामुळेच येणाऱ्या काळाम चित्रपटगृहांमध्ये मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यासंदर्भातील कार्यप्रणाली तयार करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. मराठी चित्रपटांना चित्रपटगृहांमध्ये प्राईम …
Read More »अखेर बेपत्ता असलेला रॅपर राज मुंगसे आला बाहेर, सांगितलं नेमकं काय घडलं अंबरनाथ मंधील एका महिलेल्या तक्रारीवरून रॅपर मुंगासे झाला होता गायब
राज्यातील सत्तेसाठी फोडाफोडीच्या राजकिय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर मधील रॅपर तरुण राज मुंगसे याने अलीकडेच एक रॅप गाणं तयार केलं. त्याने चोर, ५० खोके, गुवाहाटी…अशा विविध शब्दांचा वापर करत सध्याच्या राजकीय स्थितीवर गाणं तयार केलं होतं. हे गाणं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी आपल्या …
Read More »कान्स चित्रपट महोत्सवाच्या बाजार विभागासाठी या तीन म़राठी चित्रपटांची निवड ‘टेरिटरी’, ‘या गोष्टीला नाव नाही’आणि ‘मदार’ या तीन चित्रपटांचा समावेश
राज्य शासनाकडून कान्स येथे होणाऱ्या चित्रपट महोत्सवातील बाजार विभागासाठी मराठी चित्रपट पाठविले जातात. मराठी चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचावा आणि आंतरराष्ट्रीय दर्शकांनाही मराठी चित्रपटांची भूरळ पडावी हा या मागचा हेतू आहे. २०२३ मधील कान्स चित्रपट महोत्सवाच्या चित्रपट बाजार विभागासाठी संदीप सावंत दिग्दर्शित “या गोष्टीला नाव नाही”, सचिन मुल्लेमवार दिग्दर्शित “टेरिटरी” आणि …
Read More »दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या पत्नीचा आरोप आणि पार्टी आयोजक व्यावसायिकाचा खुलासा कौशिक यांच्या पत्नीने १५ कोटी रूपयांसाठी खून केल्याचा आरोप पार्टी आयोजक व्यावसायिक विजय मालू यांनी व्हिडिओ जारी करत केला खुलासा
सुप्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे ९ मार्च रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. पण सतीश यांच्या निधनापूर्वी नेमकं काय घडलं? याबाबत पोलीस तपास करत आहेत. सतीश यांनी दिल्लीमधील बिजवासन येथील व्यावसायिक विकास मालू यांच्या फार्महाऊसवर होळी पार्टी केली. या पार्टीनंतरच सतीश यांची प्रकृती बिघडली. यादरम्यान विकासच्या पत्नीने त्याच्यावर गंभीर …
Read More »राज कपूर, व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कारासह विशेष योगदान पुरस्काराची रक्कम दुप्पट सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत मनोरंजन क्षेत्रात योगदान देणाऱ्यांना दरवर्षी राज कपूर जीवनगौरव पुरस्कार, व्ही. शांताराम जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. या पुरस्काराची रक्कम दुप्पट करण्यात आल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. यापूर्वी राज कपूर जीवनगौरव आणि व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराचे स्वरुप ५ …
Read More »सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा, ऑनलाईन फिल्म बाजार पोर्टल तयार करणार मराठी चित्रपट, मालिका आणि ओटीटी क्षेत्राच्या विकासासाठी
मराठी चित्रपट, मालिका, ओटीटी याशिवाय विविध कार्यक्रमांचा विकास ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी फिल्मबाजार पोर्टल तयार करण्यात येणार आहे. हे पोर्टल २४X७ आणि ३६५ दिवस सुरु राहिल अशी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. फिल्मबाजार पोर्टल तयार करण्यासाठी समिती गठित फिल्मबाजार पोर्टल तयार करण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे. दादासाहेब …
Read More »महाराष्ट्रातील ११ कलाकारांना ‘उस्ताद बिसमिल्ला ख़ाँ युवा पुरस्कार’ प्रदान केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी.किशन रेड्डी यांच्या हस्ते प्रदान
राज्यातील लोकसंगीत, तमाशा, सारंगी, पखवाज, कथक नृत्य कलाकारांना आणि संगीत वाद्य निर्मात्यांना प्रतिष्ठित संगीत नाटक अकादमीचा ‘उस्ताद बिसमिल्ला ख़ाँ युवा पुरस्कार’ देवून सन्मानित करण्यात आले. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. राज्यातील एकूण ११ कलाकारांना याप्रसंगी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. येथील मेघदूत सभागृहात …
Read More »सुप्रिया सुळे म्हणाल्या, काही लोक शाहरूख खानवर जळतात.. पठाण चित्रपटावरून सध्या सुरु असलेल्या वादावर सुप्रिया सुळेंचे वक्तव्य
तब्बल चार वर्षानंतर शाहरुख खान व दीपिका पदुकोणचा ‘पठाण’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. तत्पूर्वी या चित्रपटातील दीपिका पदुकोणच्या भगव्या बिकनीवरून वाद निर्माण करत बॉयकॉट पठाण चळवळ काही जणांकडून सुरु करण्याचा प्रयत्न केला. तरीही पठाण प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या ती दिवसात या चित्रपटाने प्रदर्शनाच्या तिसऱ्याच दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई केली. जगभरात आतापर्यंत ‘पठाण’ने …
Read More »दिग्गज अभिनेते निळू फुलेंचा जीवनपट चित्रपटाच्या माध्यमातून उलघडणार स्वतः अभिनेते प्रसाद ओक यांनीच व्हिडिओ शेअर करत दिली माहिती
मागील काही वर्षात विविध महापुरूषांबरोबरच चित्रपट आणि नाट्य क्षेत्रातील उत्तुंग अभिनेत्यांच्या जीवनावरील चरित्र पटांचा ट्रेंड वाढला आहे. आता यात मराठी चित्रपटातील आपल्या खलनायकीच्या अदानी आणि ग्रामीण भागातील बेरक्या राजकारणी व्यक्तीरेखेबरोबरच, विनोदी भूमिका साकार करत आपल्या अभिनयाची वेगळी छाप उमटविणारे दिग्गज अभिनेते निळूभाऊ फुले यांच्या जीवनावरील चरित्रपट लवकरच येणार आहे. निळू …
Read More »
Marathi e-Batmya