बॉलिवूड मध्ये अनेक नवे चेहरे येतात आणि आपली छाप उमटवत आहेत, त्यात आत्ता नव्या चेहऱ्याची जोरदार चर्चा सुरू झालीय ती सुपारदे सिंग या अभिनेत्रीची. दीपक पांडे दिग्दर्शित I love us या वेब सिरीज द्वारे तिचं पदार्पण झालंय. एका वेगळ्या प्रेमकहाणी वर आधारित ही वेब सिरीज EOR TV आणि ओ टी टी प्लॅटफॉर्म वर प्रदर्शित होणार आहे. सुप्यारदे सिंग या अभिनेत्री ने यापूर्वी तेलगू आणि तामिळ चित्रपटमध्ये काम केलंय, तिच्या सौंदर्याने आणि नैसर्गिक अभिनयानं साऊथ फिल्म इंडस्ट्रीत तिचा चाहता वर्ग तयार झालाय. सुप्यारदे सिंग चा फिल्मी करियरचा प्रवास तमिळ चित्रपट कातरु वेळीयिदै (kaatru veliyidai) या मणिरत्न म निर्मित अन दिग्दर्शित चित्रपटानं झाली. सुप्यारदे सिंग चा तेलगू मधील क्राइम थ्रिलर cheppina Evaru Nammaru गेल्या वर्षी जानेवारीत रिलीज झालाय.तो अमेझॉन प्राईम वर प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलाय.त्याशिवाय तेलगु मध्ये Lingoccha हा सिनेमा आलाय.
दाक्षिणात्य चित्रपटातील यशस्वी झाल्यावर सुप्यारदे सिंग बॉलिवूड मध्ये आपलं नशीब आजमावत आहेत, निरागस चेहरा अन आकर्षक शरीर यष्टीची देणगी मिळलेली ही अभिनेत्री आत्ता बॉलिवूड प्रेक्षकांचीही मने जिंकणार यात शंका नाही.
Marathi e-Batmya