मृणालची रोमँटिक-कॅामेडी : ती अॅण्ड ती तर पुष्कर जोग निर्माता आणि अभिनेत्याच्या भूमिकेत

मुंबई : प्रतिनिधी

जवळजवळ पाच वर्षांपूर्वी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी अभिनयासोबतच दिग्दर्शनाकडेही वळण्याचा निर्णय घेत ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’ हा दैनंदिन जीवनातीलच पण आजवर कधीही न हाताळला गेलेला विषय मांडला. त्यामागोमाग ‘रमा माधव’च्या निमित्ताने त्यांनी पेशवाईतील काळ रुपेरी पडद्यावर सादर केला. आता जवळजवळ तीन वर्षांच्या ब्रेकनंतर मृणाल पुन्हा आपली नवी कलाकृती घेऊन परतल्या आहेत.

मध्यंतरीच्या काळात मराठीसोबतच हिंदी सिनेमांत अभिनय करणाऱ्या मृणाल यांनी ‘ती अॅण्ड ती’ हा रोमँटिक-कॅामेडी पठडीत मोडणारा सिनेमा बनवला आहे. या सिनेमाचं पहिलं टीझर पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. मृणाल यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या सिनेमाची निर्मिती पुष्कर जोग आणि मोहन नाद्दार यांनी केली आहे. मोहित छाब्रा या सिनेमाचे सहनिर्माते आहेत. निर्मितीसोबतच पुष्करने या सिनेमात नायकाची भूमिकाही साकारली आहे.

पुष्करसोबत या सिनेमात सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहरे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप घोषित करण्यात आलेली नाही. पाठमोऱ्या सेनाली व प्रार्थना आणि त्यांच्यासमोर काहीशा कन्फ्युज चेहऱ्याने बसलेला पुष्कर पाहिल्यावर ‘ती अॅण्ड ती’मध्ये दोन नायिका आणि एक नायकाची धमाल गोष्ट पाहायला मिळेल याचा अंदाज येतो. असं असलं तरी ही गोष्ट मृणाल कुलकर्णीच्या नजरेतून पाहायला मिळणार असल्याने कथेतील निरागसता आणि गांभीर्य कायम ठेवत मुख्य मुद्दा अधिक प्रभावीपणे मांडला जाईल याची खात्री वाटते.

About Editor

Check Also

अखेर सुनिता आहुजा यांनी घटस्फोटाची याचिका घेतली मागे, अभिनेता गोविंदास घटस्फोट दिलाच नाही वांद्रे येथील फॅमिली कोर्टातून याचिका घेतली मागे

त्यांच्या लग्नाबद्दल अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या अटकळांनंतर, गोविंदाचे व्यवस्थापक, शशी सिन्हा यांनी इंडिया टुडेला दुजोरा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *