शाहरूख खानच्या नंबर वन मुळे अमिताभ बच्चनची ट्वीटरला धमकी स्कोर ट्रेंड्स इंडिया फेसबुक चार्ट्सवर नंबर वन बनलेल्या बिग बींचा ट्विटरला टोला!

मुंबई : प्रतिनिधी

महानायक अमिताभ बच्चन फेसबुकवर ३० दशलक्ष फोलोअर्ससह भारतीय फिल्म इंडस्ट्रीतले ‘मोस्ट एंगेंजिंग सेलिब्रिटी ऑन फेसबुक’ बनले आहेत. बिग बींनी स्कोअर ट्रेड्स इंडियाद्वारे दिलेल्या या माहितीचं समर्थन ट्विटवर केलं आहे. बिग बींच्या एका चाहतीने स्कोर ट्रेन्ड्स इंडियाच्या चार्टची आकडेवारी ट्विट केली होती. अमिताभ बच्चन यांनी ती रिट्विट करत ट्विटरला शाल जोडीतला आहेर देत म्हटले आहे, ‘होय, ट्विटर आता तुम्ही याला स्वीकृती द्याल का?’

रिपोर्ट्सच्या अनुसार, ट्विटरने अचानक बिग बीच्या फॉलोवर्सची संख्या ६०,००० पर्यंत कमी केली होती. त्यामुळे ते दुसऱ्या क्रमांकावर आले होते. त्यामुळे शाहरुख खान ३,२९,४१,८३७ फॉलोअर्ससह नंबर एक वर पोहोचला होता. त्यामुळे अमिताभ बच्चन नाराज झाले होते आणि त्यांनी ट्विटर सोडण्याची धमकी दिली होती. स्कोर ट्रेंड्सच्या आकडेवारीनुसार, ही गोष्ट स्पष्ट झाली आहे, की अमिताभ बच्चन १०० अंकासह नंबर वन वर आहेत. तर शाहरूख खान ६८ अंकांसह तिसऱ्या स्थानावर आहे. सुपरस्टार सलमान खान ९५ स्कोरसह दुसऱ्या स्थानी आहे. तरुणाईच्या गळ्यातला ताईत रणवीर सिंह ५२ अंकांसह चौथ्या स्थानावर आणि सर्वाधिक बँकेबल अॅक्टर समजला जाणारा अक्षय कुमार ४९ स्कोरसह पाचव्या स्थानी आहे.

About Editor

Check Also

अभिनेता धर्मेंद्र मुंबईतील ब्रीच कँडीत दाखलः वैद्यकीय पथकाच्या निरिक्षणाखाली अभिनेत्री हेमा मालिनी यांची सोशल मिडीयातून माहिती

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या पत्नी, अभिनेते-राजकारणी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *