मराठी ई-बातम्या टीम
भारतीय आयुर्विमा महामंडळाचा (LIC) आयपीओ लवकरच येणार आहे. या आयपीओमध्ये १० % शेअर्स पॉलिसीधारकांसाठी राखीव आहेत. तुम्ही एलआयसीची पॉलिसी घेतली असेल आणि तुम्हाला एलआयसीच्या आयपीओमध्ये सहभागी व्हायचे असेल, तर तुम्ही तुमचा पॅन एलआयसीमध्ये अपडेट केलेला असणे आवश्यक आहे. एलआयसीच्या कोणत्याही आयपीओमध्ये सहभागी होण्यासाठी पॉलिसीधारकाने रेकॉर्डमध्ये दिलेली पॅन माहिती बरोबर आहे की नाही हे तपासावे. जर ते बरोबर नसेल तर पॅन माहिती अपडेट करा, असे एलआयसीने सांगितले आहे.
डीमॅट खाते आवश्यक
एखाद्या पॉलिसीधारकाकडे सध्या वैध डीमॅट खाते नसेल, तर त्याने ते उघडणे आवश्यक आहे. पॉलिसीधारक डीमॅट खाते उघडण्याचा आणि पॅन अपडेट करण्याचा खर्च उचलेल. महामंडळ कोणताही खर्च उचलणार नाही, असे एलआयसीने सांगितले आहे.
पॅन अपडेट झाला आहे की नाही हे कसे तपासायचे
https://linkpan.licindia.in/UIDSeedingWebApp/getPolicyPANStatus वर जा. त्यानंतर पॉलिसी क्रमांक, जन्मतारीख आणि पॅन माहिती तसेच कॅप्चा प्रविष्ट करा. त्यानंतर सबमिट बटण दाबा.
याप्रमाणे अपडेट करू शकता
– ऑनलाइन पॅन नोंदणीचा पर्याय निवडा.
– ऑनलाइन पॅन नोंदणी पृष्ठावरील PROCEED बटणावर क्लिक करा.
– तुमचा ईमेल पत्ता, पॅन, मोबाइल नंबर, जन्मतारीख आणि एलआयसी पॉलिसी क्रमांक प्रविष्ट करा.
– तुमचा ईमेल पत्ता, पॅन, मोबाइल नंबर आणि एलआयसी पॉलिसी क्रमांक प्रविष्ट करा.
– बॉक्समध्ये कॅप्चा कोड प्रविष्ट करा.
– तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून ओटीपीसाठी विनंती करा.
– ओटीपी मिळाल्यावर तो भरा आणि सबमिट करा.
– फॉर्म सबमिट केल्यानंतर, तुम्हाला यशस्वी नोंदणीचा संदेश मिळेल.
एक लाख कोटी उभारण्याची तयारी
एलआयसी आयपीओमधून ८० हजार ते एक लाख कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत आहे. आयपीओ जानेवारी ते मार्च दरम्यान येऊ शकतो. आयपीओमधील शेअर्स कोणत्या किंमतीला बाजारात आणले जातील हे अद्याप ठरलेलं नाही. मात्र, प्राईस बँड ४०० ते ६०० रुपये प्रति शेअर असू शकते, असा शेअर बाजार तज्ज्ञांचा अंदाज आहे. IPO आणण्यासाठी LIC Act 1956 मध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. किती शेअर्स विकले जातील आणि ते कोणत्या प्राइस बँडमध्ये असतील, हे अद्याप ठरलेले नाही. आयपीओमध्ये १० टक्के शेअर्स पॉलिसीधारकांसाठी राखून ठेवण्यात येणार आहेत. एलआयसीचा हा आयपीओ विमा उद्योगातील सर्वात मोठा आणि जगातील दुसरा सर्वात मोठा आयपीओ असेल, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
Marathi e-Batmya