या मंत्र्यांचीही टेस्ट आली पॉझिटीव्ह राज्यमंत्री विश्वजीत कदम यांची ट्विटरवरून माहिती

मुंबई-सांगली : प्रतिनिधी

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत आहे. या विषाणूची लागण कधी आणि कोणापासून होईल याची कोणतीही श्वाश्वती नाही. या विषाणूमुळे सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणावर बाधित होत असताना कोरोनाने राज्यातील राजकारण्यांनाही विळखा घालायला सुरुवात केली असून आता राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनीच ट्विटरच्या माध्यमातून आज दिली.

मागील काही दिवसांपासून थोडा ताप, अंगदुखी सारखी सौम्य लक्षण दिसू लागल्याने त्यांनी कोरोना तपासणी केली. त्यावेळी त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आल्याचे त्यांनी सांगितले. कदम यांनी ट्विट करताच त्यांना काळजी घ्या म्हणून अनेक काँग्रेस नेत्यांनी ट्विटरवरून सूचना केल्या.

About Editor

Check Also

प्रकाश आबिटकर यांची माहिती, सेवा संकल्प अभियानात राज्यातील सर्व जनतेची आरोग्य तपासणी करा ॲनिमिया निर्मूलन, बाल आरोग्य आणि ज्येष्ठ नागरिकांच्या तपासणीसाठी राज्यव्यापी अभियान राबवावे

सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून राज्यातील नागरिकांच्या सर्वसमावेशक आरोग्य तपासणीसह अॅनिमिया निर्मूलन, बाल आरोग्य, ज्येष्ठ नागरिकांची आरोग्यसेवा, शालेय विद्यार्थ्यांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *