शासनाच्या सेवेतील बंधपत्रित- कंत्राटी डॉक्टर्सच्या पगारात मोठी वाढ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

मुंबई: प्रतिनिधी
राज्यातील कोरोनाचा सामना करण्यासाठी डॉक्टर आणि नर्सेसची संख्या कमी पडत आहे. यापार्श्वभूमीवर कोरोना विरोधी लढ्यात शासकिय सेवेतील बंधपत्रित ( बॉण्डेड) आणि कंत्राटी डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी निर्णय घेतला असून यामुळे कोरोनाविरोधी लढ्याला निश्चित बळ मिळेल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
वाढीव मानधनानुसार आता आदिवासी भागातील बंधपत्रित डॉक्टर्सना ६० हजारांच्या ऐवजी ७५ हजार रूपये देण्यात येणार असून आदिवासी भागातील बंधपत्रित विशेषज्ञ डॉक्टर्सना ७० हजार ऐवजी ८५ हजार रूपये देण्यात येणार आहे. तर इतर भागातील एमबीबीएस डॉक्टर्सना ५५ हजारांऐवजी ७० हजार रूपये आणि इतर भागातील विशेषज्ञ डॉक्टर्सना ६५ हजारांऐवजी ८० हजार रुपये मानधन देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कंत्राटी आणि बंधपत्रित डॉक्टरांच्या मानधनात सरासरी १५ हजार रूपये वाढ करण्यात आली आहे.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश, आरोग्य सेवांमध्ये गुणवत्ता व गतीला प्राधान्य द्या मुख्यमंत्री वॉर रुम अंतर्गत आरोग्य विषयक योजनांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

राज्यातील नागरिकांना दर्जेदार व सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *