कल्याणमध्ये १३ वर्षीय मुलीवर बलात्कार आणि हत्या करणाऱ्या आरोपीला अटक बदलापूरमधील घटनेनंतर कल्याणमधील घटनाः विशाल गवळीला बुलढाणा शेगाव येथून अटक

कल्याण येथे एका १३ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करून त्या मुलीचा खुन करणाऱ्या आणि तिचा मृतदेह बापगाव येथे फेकून देणाऱ्या नराधम आरोपी विशाल गवळी यास अखेर पोलिसांनी अटक केली. घटनेनंतर आरोपी विशाल गवळी हा बुलढाणा शेगाव येथील सासूरवाडीतील नातेवाईकांच्या घरी गेला होता. पोलिसांनी त्यास तेथून अटक केली.

याबाबतची मिळालेल्या माहितीनुसार २३ डिसेंबर रोजी १३ वर्षीय मुलगी तिच्या आईकडून २० रूपये घेऊन खाऊ आणायला गेली होती. बराच वेळ झाल्यानंतरही ती परत आली नाही म्हणून मुलीच्या आई वडीलांनी शोधाशोध सुरु केली. मात्र तिचा सोध लागू न शकल्याने मुलीच्या आई वडीलांनी अखेर पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी शोधाशोध सुरु केल्यानंतर २४ तारखेला कल्याणपासून जवळच असलेल्या बापगांव येथे एका १३ वर्षिय मुलीचा मृतदेह आढळला असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सदर मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे जे रूग्णालया पाठविण्यात आला. त्यावेळी सदर मुलीवर लैगिंक अत्याचार करून तिची हत्या करून मृतदेह फेकून दिल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर विशाल गवळी याचा शोध पोलिसांनी सुरु केला त्यात तो त्याच्या बायकोच्या नातलगांच्या घरी बुलढाणा शेगाव येथे असल्याचे कळाले. त्यानंतर पोलिसांनी विशाल गवळीसह कल्याणमधून त्याची पत्नीला अटक केली तर तर इतर नातेवाईकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करून मृतदेह फेकून दिल्याची घटना कळताच स्थानिक भागातील नागिरकांनी मूक मोर्चा काढला. तसेच विशाल गवळीवर कडक कारवाई करण्याची मागणीही यावेळी मोर्चा दरम्यान नागरिकांनी केली.

सदरची घटना कोळशेवाडी हद्दीत येथे घडलेली असून तेथून कालच एका आरोपीला अटक केली. तर आज मुख्य आरोपी असलेल्या विशाल गवळीला अटक करण्यात आली आहे. तसेच या भागातील सीसीटीव्ही फुटेज आम्ही तपासत आहोत. मुलीच्या अपहरणासाठी रिक्षा वापरण्यात आली. त्या रिक्षाचाही शोध घेण्यात आली असून सदरची रिक्षा जप्त करण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगितले.

माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. या प्रकरणातील आरोपीवर कड कायदेशीर कालवाई करा आणि अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच ज्या पद्धतीने बदलापूर घटनेतील आरोपीचा एनकांऊटर करण्यात आला. तसाच एनकांऊटकर या ही प्रकरणातील आरोपीचा करावा अशी मागणी मोर्चातील नागरिक गायकवाड यांनी केली.

About Editor

Check Also

मुंबई महापालिकेच्या आय़ुक्त पदाची जबाबदारी आता अश्विनी भिडे यांच्याकडे आयएएस अधिकारी भूषण गगराणी सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या जागे अश्विनी भिडे यांची नियुक्ती

संपूर्ण देशभरात पुरुषांच्या बरोबरीने महिलांची संख्या वाढत आहे. तसेच प्रत्येक कार्पोरेट, सेवा क्षेत्र, यासह सर्व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *