वंचितच्या मुंबई अध्यक्षावर आंबेडकर भवन परिसरात प्राणघातक हल्ला जखमी परमेश्वर रणशुर यास केईएम रूग्णालयात केले दाखल

२७ मे रोजी आंबेडकर भवन दादर येथे वंचित बहुजन आघाडी मुंबई प्रदेश च्या कार्यकर्त्यांची बैठक होती. मुंबईत सध्या वंचित बहुजन आघाडीच्या जोरदार सभा होत आहेत. पुढील सभा ही ३ जून रोजी होणार आहे त्याची तयारी करण्यासाठी कार्यकर्ते जमले होते. सायंकाळी ठिक ६.३० ते ७ च्या दरम्यान वंचित चे मुंबई युवा प्रदेश अध्यक्ष परमेश्वर रणशुर आणि वॉर्ड अध्यक्ष गौतम हराळ यांच्यावर आंबेडकर भवन परिसरात चार अज्ञातखोर इसमांनी लोखंडी रॉड, आणि तलवार, चोपर घेवून जीवघेणा हल्ला केला. दरम्यान जखमी परमेश्वर रणशुर आणि गौतम हराळ यांना केईएम रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हा हल्ला परमेश्वर रणशूर वर नसून हा आंबेडकर भवन वरील हल्ला आहे. मागे बाळासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अपशब्द बोलून आंबेडकर घराण्यासंबंधी अपशब्द बोलणाऱ्या जगदीश गायकवाड कडे संशयाची सुई आहे. या हल्ल्याचा आम्ही वंचित बहुजन आघाडी तर्फे आणि तमाम आंबेडकरी जनते तर्फे निषेध व्यक्त करतो.

आंबेडकर भवन वरील हल्ला खपवून घेणार नाही. जनतेत संतप्त प्रतिक्रिया असल्याचे वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

About Editor

Check Also

भिवंडी येथील दुर्घटनाग्रस्त इमारतीची आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून पाहणी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाखाची मदत

भिवंडी येथे घडलेल्या दुर्दैवी इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *