मुंबई

जी-२० च्या प्रतिनिधींची पुण्यातील वारसास्थळांना भेट शनिवार वाडा, आगाखान पॅलेस आदीसह अन्य ठिकाणांना भेटी दिल्या

जी – २० बैठकीसाठी आलेल्या प्रतिनिधींनी आज पुण्यातील वारसास्थळांना भेट दिली. शनिवार वाड्याची भव्यता पाहून पाहुण्यांनी आश्चर्य व्यक्त केले. लाल महल भेटीप्रसंगी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास उत्सुकतेने जाणून घेतला. सकाळी शनिवार वाड्यापासून या भेटीला सुरूवात झाली. शनिवार वाड्याची भव्यता, प्रवेशद्वार, विस्तारलेला परिसर प्रतिनिधींनी आपल्या मोबाईलमध्ये टिपला. येथील इतिहासाविषयी उत्सुकतेने …

Read More »

मुंबई उपनगरसाठी ५१५ कोटी रूपयांचा प्रारुप आराखडा पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती

मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरिता ५१५.८६ कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे, असे मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. चेतना कॉलेज, बांद्रा पूर्व येथे नियोजन समिती बैठक पार पडली या बैठकीत मुंबई उपनगरचे पालकमंत्री लोढा बोलत होते. मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी …

Read More »

साडेचार तासाच्या चौकशीनंतर आयुक्त इक्बालसिंग चहल म्हणाले, शुन्य खर्च आला.. जंबो कोविड सेंटर उभारणी महापालिकेला शक्य नव्हती

कोरोना काळात मुंबई महापालिकेने कोविड सेंटरच्या वाटपात आर्थिक घोटाळा करण्यात आल्याचा आरोप भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी करत याप्रकरणी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनायलाकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत सक्तवसुली संचालनालयाने अर्थात ईडीने महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल नोटीस बजावत आज चौकशीसाठी पाचारण केले. याप्रकरणी इक्बाल सिंग चहल यांची …

Read More »

डिजिटल बालवाडीच्या माध्यमातून बालकांना मिळणार दर्जेदार शिक्षण महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची ग्वाही

डिजिटल बालवाडीच्या माध्यमातून अंगणवाडीतील बालकांना कलाभिमुख आणि दर्जेदार शिक्षण मिळण्यास मदतच होणार आहे. भव्यता फाऊंडेशनने अंगणवाडी दत्तक धोरणांतर्गत अंगणवाड्या दत्तक घेतल्या आहेत. या माध्यमातून अंगणवाड्यामध्येही दर्जेदार सुविधा मिळतील, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. मुंबई येथील कवडे मठ महापालिका शाळा, बाणगंगा, वाळकेश्वर येथे आज डिजिटल बालवाडीच्या …

Read More »

आंतरविद्यापीठ संशोधन स्पर्धेत मुंबई विद्यापीठ सलग चवथ्या वर्षी प्रथम आविष्कार संशोधन स्पर्धेत मिळविला पहिला क्रमांक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे १२ ते १५ जानेवारी २०२३ दरम्यान पार पडलेल्या १५ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ आविष्कार संशोधन स्पर्धेमध्ये मुंबई विद्यापीठाने ७९ गुणांसह अंतिम विजेतेपद पटकावून प्रथम क्रमांक मिळवला आहे. यामध्ये विद्यापीठाने नेत्रदिपक कामगिरी करून १२ सुवर्ण, ५ रौप्य आणि २ कांस्य पदकांची कमाई करत आविष्कार संशोधन स्पर्धेवर …

Read More »

टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये घेतला ५५ हजारहून अधिक स्पर्धकांनी सहभाग राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्र्यांनी टाटा मुंबई मॅरेथॉनला दाखविला झेंडा

‘टाटा मुंबई मॅरेथॉन 2023’ शर्यतींमधील विविध स्पर्धा प्रकारांना आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. टाटा कन्सल्टन्सीच्यावतीने मुंबईत ‘टाटा मुंबई मॅरेथॉन 2023’ चे आयोजन करण्यात आले. यावर्षी ‘हर दिल मुंबई’ …

Read More »

महेंद्र गायकवाड विरूध्द शिवराज राक्षे लढतीत शिवराज ठरला महाराष्ट्र केसरी मानाची गदा आणि थार गाडीचा मानकरी

पुण्यात आज शनिवार ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा थरार रंगला. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची मानाची गदा पटकवण्यासाठी महेंद्र गायकवाड विरुद्ध शिवराज राक्षे यांच्यात लढत झाली. या लढतीत शिवराज राक्षे हा महेंद्र गायकवाडला चितपट करून विजयी झाला. नांदेडचा शिवराज राक्षे आणि सोलापूरचा महेंद्र गायकवाड यांच्यात झालेल्या लढतीमध्ये शिवराजने …

Read More »

या अधिकाऱ्यांना सर्वोत्कृष्ट पोलिस घटक पारितोषिक राज्यात ड्रग्जविरोधात अभियान राबविणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

युवा पिढीला व्यसनाच्या विळख्यातून सोडविण्यासाठी राज्यात ड्रग्जविरोधात व्यापक अभियान राबविण्यात येईल आणि त्यासाठीची रणनीती आखण्यात येत असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्यातील गुन्हे आणि कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची एक बैठक आज पुणे येथे झाली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी राज्याचे गृह विभागाचे …

Read More »

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दाऊदच्या नावाने धमकी, १०० कोटी द्या, अन्यथा.. नागपूर पोलिस आणि सायबर सेलकडून वेगाने तपास सुरु

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात शनिवारी सकाळी तीन वेळा कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाने फोन करत १०० कोटी रूपये द्या अन्यथा घरी आणि जनसंपर्क कार्यालयात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी फोनवरून देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. यामुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली. नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात …

Read More »

चित्रा वाघ यांच्या विरोधात तक्रार दाखल करत ऊर्फी जावेदने घेतली चाकणकरांची भेट पोलिस ठाण्यातही केली तक्रार दाखल

मागील काही दिवसांपासून अभिनेत्री मॉडेल ऊर्फी जावेद हीच्या फॅशनवरून भाजपाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी आघाडी उघडली होती. तसेच ऊर्फी जावेदच्या विरोधात मुंबई पोलिस आयुक्त आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याकडे तक्रार दाखल केली. परंतु या दोन्ही यंत्रणांकडून कोणतीच कारवाई न केल्याने चित्रा वाघ यांनी ऊर्फी जावेद …

Read More »