मुंबई

बदलापूर आणि अंबरनाथच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री शिंदेंनी दिले ‘हे’ आदेश कुळगांव- बदलापूरमधील पूर रेषेच्या फेर सर्वेक्षण आणि शाळा हस्तांरणासाठी निधी देणार

कुळगांव- बदलापूर शहरातून जाणाऱ्या पूर नियंत्रण रेषेचे नगरपरिषद आणि जलसंपदा विभागाने समन्वयाने फेर सर्वेक्षण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. त्यासोबतच कोविड काळातील केलेल्या खर्चाचे व नगरपरिषदेला मुद्रांक शुल्काचे अनुदानही लवकरात लवकर दिले जावे यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या. कुळगांव – बदलापूर नगरपरिषदेशी निगडीत विविध विषयांबाबत सह्याद्री …

Read More »

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास होणार केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मंजुरी

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (सीएसएमटी) पुनर्विकास कार्याला आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. सीएसएमटी रेल्वे स्थानकासह एकूण तीन रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासकार्यासाठी १० हजार कोटींच्या निधीस मंजुरी देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससहित नवी दिल्ली आणि अहमदाबाद रेल्वे …

Read More »

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, अश्मयुगापासून ते आधुनिक काळापर्यंतचे वस्तु संग्रहालय उभारणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे राज्य वस्तुसंग्रहालय महाराष्ट्रात साकारणार

महाराष्ट्र राज्याचे संपूर्ण सांस्कृतिक वैभव प्रदर्शित होण्याबरोबरच अवघ्या जगाला थक्क व्हायला लागेल, असे राज्य वस्तुसंग्रहालय महाराष्ट्रात साकारण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. मंत्रालयात राज्य वस्तुसंग्रहालय साकारण्यासंदर्भातील बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, उपसचिव विलास थोरात, विद्या वाघमारे, पुरातत्व विभागाचे …

Read More »

विदर्भातील खेळाडूंना आयपीएलमध्ये सुवर्णसंधी पापलीकर ग्रुपचा पुढाकार, नागपूरमध्ये होणार सहा मॅचेस

चंद्रशेखर बर्वे मराठी माणूस जगाच्या पाठीवर कुठंही गेला तरी; मातृभूमि त्याच्या हृदयात केवळ जीवंत राहत नाही तर आपल्याला या समाजाचं ऋण फेडायचं आहे, हा विचार त्याच्या मनात सतत घोंगावत असतो. आणि मातृभूमीच्या चरणी सेवा अर्पन करण्याची एकही संधी सोडत नाही. याचं जीवंत उदाहरण द्यायचं झालं तर डॉ. अभय पापलीकर यांचं …

Read More »

संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर दसऱ्यानंतर सुनावणी यंदाचा दसरा तुरुंगातच

पत्रा चाळ पुर्नवसन प्रकल्पातील गैरव्यवहार प्रकरणी सध्या ईडीच्या न्यायालयीन कोठडीत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांचा आर्थर रोड कारागृहातील मुक्काम वाढला आहे. संजय राऊत यांनी जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र त्यावर आज सुनावणी होऊन जामीन अर्जावर पुढील सुनावणी १० ऑक्टोबरला घेण्यात येणार असल्याचे न्यायालयाने सांगितले. त्यामुळे संजय राऊत यांचा दसरा …

Read More »

बोरिवलीमध्ये उद्यापासून रंगणार गरबा क्विन प्रिती-पिंकीचा रंग रास गरबा

विधापरिषदेचे भाजपचे गट नेते, आमदार प्रविण दरेकर यांच्या रायगड प्रतिष्ठानच्यावतीने उद्या २६ सप्टेंबर २०२२ पासून नऊ दिवस रंग रास गरबाचे आयोजन करण्यात आले आहे. गरबा क्विन पिंकी आणि प्रिती यांची गाणी असलेला भव्य गरबा मुंबईकरांसाठी मोफत असणार आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते उद्या सायंकाळी ६.३० वाजता …

Read More »

रिक्षा-टॅक्सी भाडेवाढ? राज्य सरकारकडून अधिकृत माहिती नाही पण प्रवास महागणार रिक्षा, टॅक्सी युनियनच्या प्रतिनिधींसोबत उद्योगमंत्र्याची सकारात्मक चर्चा

रिक्षा आणि टॅक्सी युनियनच्या प्रश्नांसाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मंत्रालयात बैठक घेतली. रिक्षा स्टॅन्ड, पार्कींगची समस्या, चालकांचा विमा, कल्याणकारी मंडळ, महिला रिक्षा चालकांच्या समस्या, कोविड कालावधीतील दंड, वाहन कर्ज यासारख्या अनेक विषयांवर यावेळी सकारात्मक चर्चा झाली. यावेळी परिवहन विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल, परिवहन आयुक्त शेखर चन्ने, अतिरिक्त पोलीस महासंचालक कुलवंतकुमार सरंगल, वाहतूक पोलीस सहआयुक्त राजवर्धन तसेच विविध रिक्षा, टॅक्सी …

Read More »

दसरा मेळावा: मुंबई महापालिकेचा निर्णय तथ्यहीन, उच्च न्यायालयाची ठाकरे गटाला परवानगी उध्दव ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच

बंडखोरीनंतर शिवसेनेचा परंपरागत दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यासाठी एकनाथ शिंदे गट आणि उध्दव ठाकरे गटाने मुंबई महापालिकेकडे परवानगी मागितली. मात्र या दोन्ही गटापैकी एकाला जरी परवानगी दिली तर मुंबईत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून मुंबई महापालिकेने दोन्ही गटांना परवानगी देण्यास नकार दिला. त्या विरोधात उध्दव ठाकरे गट आणि …

Read More »

धारावी पुनर्विकासासाठी पुन्हा नव्याने निविदा काढणार

धारावी पुनर्विकासासाठी पुन्हा नव्याने निविदा मागवून तसेच प्रकल्पाला अतिरिक्त सवलती देऊन प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा विशेष हेतू कंपनी मॉडेलच्या माध्यमातून (एसपीव्ही) एकत्रित पुनर्विकास करण्यासाठी पुन्हा नव्याने निविदा मागवून तसेच प्रकल्पाला अतिरिक्त सवलती देण्याचा निर्णय घेण्यात …

Read More »

बीडीडी चाळीतील १५४ पोलिसांच्या सदनिका निश्चित ना. म. जोशी मार्ग परळ बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई मंडळातर्फे ना. म. जोशी मार्ग परळ बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यांतर्गत उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित पुनर्वसन इमारतींमध्ये पात्र पोलीस कर्मचारी गाळेधारकांना वितरित करावयाच्या १५४ पुनर्वसन सदनिकांची संगणकीय प्रणालीद्वारे निश्चिती आज करण्यात आली. या पात्र गाळेधारकांना पुनर्विकास प्रकल्पांतर्गत बांधण्यात येणाऱ्या व मालकी तत्वावर दिल्या …

Read More »