वांद्रे रिक्लेमेशन आणि वरळी येथील आदर्श नगर या दोन म्हाडा अंतर्गत असलेल्या इमारतींचा एकत्रित पुनर्विकास करण्यासाठी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. वांद्रे रिक्लेमेशन आणि आदर्श नगर वरळी येथील म्हाडा अंतर्गत असलेल्या काही सहकारी गृहनिर्माण संस्थांना पुनर्विकास करण्यासाठी परवानगी दिली आहे. असे परवानगी देण्यात …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास, पुढील पाच वर्षांत राज्याचा संतुलित विकास दिसेल मुख्यमंत्र्यांनी इंडिया ग्लोबल फोरममध्ये मांडला विकासाचा रोडमॅप
महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी विना अडथळा सुविधा पुरविली जात आहे. राज्यातील सर्वच भागात गुंतवणूक व्हावी यासाठी इको सिस्टीम तयार केली जात आहे. त्यामुळे येत्या पाच वर्षांत राज्यातील सर्वच भागाचा संतुलित विकास झाल्याचे दिसेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. बांद्रा कुर्ला संकुलातील जिओ वर्ड सेंटर येथे आयोजित ‘इंडिया ग्लोबल फोरम नेक्स्ट …
Read More »शिवसेना उबाठाच्या शिष्टमंडळाची मागणी, भगवती रुग्णालयाचे खासगीकरण करू नका शिष्टमंडळाने घेतली पालिका आयुक्तांची भेट, पालिका आयुक्तांनी दाखवला सकारात्मक प्रतिसाद
बोरिवली येथील भगवती रुग्णालयाचे खासगीकरण करू नये तसेच पालिकेतर्फेच अद्यावत आणि सुसज्ज असे ९ मजल्यांचे ४९०खाटांचे रुग्णालय तातडीने सुरू करावे, या मागणीसाठी आज विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. पालिका आयुक्तांसोबत झालेल्या …
Read More »डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बार्टीकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे महासंचालक सुनील वारे यांचे आवाहन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त चैत्यभूमीवर १४ आणि १५ एप्रिल रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अभिवादन समारंभ, भीमगीते, पुस्तक स्टॉल आणि स्काऊट गाईड्स हॉल येथे विशेष कार्यक्रमांद्वारे महामानवाची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केला जाणार आहे. महामानवाला अभिवादन करुन नागरीकांनी विविध कार्यक्रमाला उपस्थीत राहण्याचे आवाहन आर्टीचे …
Read More »माहिती आयोगातील रिक्त पदावर या चार जणांची माहिती आयुक्त म्हणून नियुक्ती राज्यपालांच्या आदेशान्वये मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडून चार जणांची नियुक्ती केली
राज्य माहिती आयोगातील चार माहिती आयुक्तांचे पद रिक्त होते. या पदांवर चार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये राज्याच्या मुख्य आयुक्त पद रिक्त होते. त्यावर राज्यपालांच्या आदेशानुसार राज्य मुख्य आयुक्त पदी आणि तीन जणांची राज्य माहिती आयुक्त पदी नियुक्ती करण्यात येत असल्याचे आदेश राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी काल …
Read More »मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०२५-२६ जाहीर तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याची संधी, साठ फेलोंची निवड करण्यात येणार
राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळावा व त्या सोबतच त्यांच्या ज्ञानाच्या, अनुभवाच्या कक्षा रुंदावण्यास मदत व्हावी. तरुणांमधील कल्पकता व वेगळा विचार मांडण्याची क्षमता, उत्साह, तंत्रज्ञानाची आवड यांचा उपयोग प्रशासनास व्हावा आणि या माध्यमातून प्रशासकीय प्रक्रियांमध्ये गतिमानता यावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील “मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम” २०२५-२६ जाहीर करण्यात …
Read More »मिशन लक्ष्यवेध अंतर्गत खासगी अकादमीच्या सक्षमीकरणासाठी प्रस्ताव सादर करा मुंबई उपनगरच्या जिल्हा क्रीडा अधिकारी रश्मी आंबेडकर यांचे आवाहन
अद्ययावत क्रीडा प्रशिक्षण यंत्रणा, पायाभूत सुविधा, क्रीडा वैद्यकशास्र, क्रीडा स्पर्धांचे आयोजन, खेळाडूंना पुरस्कार व प्रोत्साहन, खेळाडूंकरीता करीअर मार्गदर्शन व खेळाडूंच्या क्षमतांचा विकास करण्याच्या उद्देशाने “मिशन लक्ष्यवेध” या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मिशन लक्ष्यवेध अंतर्गत खाजगी अकादमींना आर्थिक सहाय्य करण्यात येणार असून, इच्छुक क्रीडा अकादमींनी २१ एप्रिल पर्यंत अर्ज करावेत अशी माहिती मुंबई उपनगरच्या जिल्हा …
Read More »आशिष शेलार यांची ग्वाही, ‘वांद्रे स्मार्ट सिटी प्रोजेक्ट’ अंतर्गत घरांचे स्वप्न पूर्ण होणार वांद्रे येथील पुनर्वसित रहिवाश्यांना करारपत्रे वितरित
विकासकामे करताना मानवी चेहरा जपणे गरजेचे असते. त्यामुळे वांद्रे पूर्व येथे ‘वांद्रे स्मार्ट सिटी प्रोजेक्ट’ अंतर्गत गौतम नगर येथील अनेक कुटुंबांचे घरांचे स्वप्न पूर्ण होत आहे, असे प्रतिपादन मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी केले. वांद्रे पूर्व येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण अंतर्गत पुनर्वसित होत असलेल्या रहिवाशांना त्यांच्या नवीन घरांचे करारपत्रे वितरणाचा कार्यक्रम …
Read More »लहान मासे पकडून खरेदी विक्री केल्यास दंडात्मक कारवाई मत्स्य व्यवसाय विभागाकडून कडक कारवाईचा इशारा
राज्याच्या सागरी जलक्षेत्रात लहान आकाराचे मासे पकडणे आणि त्याच्या खरेदी विक्रीवर बंदी आहे. या बंदीचे उल्लंघन केल्यास मत्स्यव्यवसाय विभागाकडून कडक कारवाई करण्यात येते. तसेच या प्रकरणी दंडात्मक कारवाईची तरतुदही करण्यात आली आहे. पारंपरिक माच्छिमारांच्या हिताचे संरक्षण आणि शाश्वत मासेमारीसाठी केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन संस्थेने ५८ प्रजातींच्या किमान कायदेशीर आकारमानाबाबत शिफारस केली आहे. त्याप्रमाणे लहान आकाराचे मासे …
Read More »रेल्वेच्या जमिनीवर ३०६ पैकी १०३ होर्डिंग्ज कोणी बसविल्या? पालिकेकडे माहिती नाहीः मध्य आणि पश्चिम रेल्वेत होर्डिंग्ज माफिया
मुंबईत मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मालकीच्या जमिनींवर एकूण ३०६ होर्डिंग्ज उभारण्यात आले आहेत. यामध्ये मध्य रेल्वेच्या जमिनीवर १७९ तर पश्चिम रेल्वेच्या जमिनीवर १२७ होर्डिंग्ज आहेत. विशेष म्हणजे, यापैकी मध्य रेल्वेच्या १७९ होर्डिंग्जपैकी ६८ आणि पश्चिम रेल्वेच्या १२७ होर्डिंग्जपैकी ३५ होर्डिंग्ज कोणी बसवले आहेत याची माहिती उपलब्ध नाही. ही धक्कादायक माहिती …
Read More »
Marathi e-Batmya