मुंबईतील रस्त्यांचे वेगाने काँक्रिटीकरण करणे हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महत्त्वाकांक्षी संकल्प आहे. यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामांचा आढावा घेण्यासाठी पुढील आठवड्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. या बैठकीत मुंबईतील सर्व आमदारांच्या मागण्या जाणून घेतल्या जातील आणि त्या लवकरच …
Read More »नितेश राणे यांची सूचना, मुंबईत पर्यावरणपूरक वॉटर टॅक्सीचा पायलट प्रोजेक्ट सुरू करा देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणारः स्विडनची कँडेला कंपनी पायलट प्रोजेक्ट राबविणार
मुंबईकरांची ई-वॉटर टॅक्सीबाबतची उत्सुकता संपणार असून देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार आहे. स्वीडनची कँडेला कंपनी पर्यावरणपूरक वॉटर टॅक्सीचा पायलट प्रोजेक्ट राबवून ही सेवा त्वरित सुरू करण्याच्या सूचना मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी स्वीडनचे महावाणिज्य दूत स्वेन ओस्टबर्ग यांना बैठकीदरम्यान केल्या. मंत्रालयात आज मत्स्य व्यवसाय व बंदरे …
Read More »प्रताप सरनाईक यांची घोषणा, रिक्षा/ टॅक्सी चालकांच्या विरोधात तक्रारीसाठी लवकरच व्हाट्सअप क्रमांक नियमबाह्य भाडे आकारणी प्रश्नी वरूण सरदेसाई यांच्या उपस्थितीत बैठक
प्रवाशांना नियमबाह्य भाडे आकारणे, भाडे नाकारणे तसेच गैरवर्तन करणाऱ्या रिक्षा – टॅक्सी तसेच ओला -उबर चालकांच्या तक्रारीसाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरण क्षेत्रामध्ये एकच व्हाट्सअप क्रमांक प्रदर्शित करण्यात येणार आहे. प्रवाशांनी आपल्या गैरसोय बाबत या क्रमांकावर प्रवाशांनी तक्रार नोंदवावी, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. ते वांद्रे पूर्व मतदारसंघातील …
Read More »प्रताप सरनाईक यांचे आदेश, ‘ट्रेड सर्टिफिकेट’ न केलेल्या वाहनांची विशेष तपासणी मोहीम वाहन वितरक व उत्पादन व्यवसाय प्रमाणपत्र घेणे आवश्यक
केंद्रिय मोटार वाहन कायदा व व नियमानुसार वाहनांची नोंदणी करण्यासाठी वाहन वितरक व उत्पादक यांनी व्यवसाय प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. केद्रीय मोटार वाहन नियम १९८९ नुसार वाहनांच्या विक्री, व्यापार किवा प्रदर्शनामध्ये गुंतलेले प्रत्येक विशीष्ठ प्रतिष्ठान, शोरूम किंवा डिलरशीप संबंधित नोंदणी प्राधिकरणाकडून स्वतंत्र व्यापार प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक आहे. ट्रेड सर्टिफिकेट …
Read More »समुद्राच्या गोड्या पाण्यात रूपांतर करण्यासाठी आंतरराष्ट्रीय निविदा प्रक्रिया उद्योग मंत्री उदय सामंत यांची विधान परिषदेत माहिती
समुद्राच्या पाण्याचे विलोपन (Desalination) हा प्रकल्प मुंबईसाठी हाती घेतला असून या प्रकल्पासाठी आंतरराष्ट्रीय निविदा प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत सांगितले. सदस्य राजहंस सिंह यांनी उपस्थित केलेल्या मुंबई शहर व उपनगरातील पाणीपुरवठाविषयी लक्षवेधीला सूचनेला उत्तर देताना उदय सामंत बोलत होते. उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले,मुंबईतील वाढत्या पाणीटंचाईला …
Read More »शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात प्रीपेड ऑटो रिक्षासेवा १ जूनपासून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील टी-1 व टी -2 टर्मिनल येथे प्रीपेड ऑटो रिक्षासेवा १ जून २०२५ पासून सुरू करण्याचे निर्देश, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन विभाग व अदानी समूहाच्या प्रतिनिधींना दिले. विधानभवनात छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे प्रीपेड रिक्षासेवा सुरू करण्याबाबत तसेच नाशिक, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बसस्थानकांच्या कामकाजाचा आढावा …
Read More »भिवडींत शिवाजी महाराज यांच्या पहिल्या मंदिराचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर सर्वांसाठी अभिमानास्पद अन् प्रेरणादायी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
देव, देश अन् धर्मापायी ज्या राजाने आपले संपूर्ण आयुष्य खर्ची पाडले, अशा सर्वांसाठी दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांचे मंदिर होणे, ही अतिशय अभिमानाची बाब असून सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. येथे महाराजांच्या दर्शनाला येणाऱ्या प्रत्येकाला निश्चितच प्रेरणा मिळणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भिवंडी तालुक्यातील शिवक्षेत्र मराडे पाडा, ता.भिवंडी …
Read More »पहिल्या वॉकेथॉनमध्ये ५००० हून अधिक मुंबईकरांचा सहभाग फास्ट अँड अप मुंबई वॉकेथॉनद्वारे नागरिकांनी लुटला वॉकिंग कार्निव्हलचा आनंद
फास्ट अँड अप मुंबई वॉकेथॉनच्या पहिल्या आवृत्तीला मुंबईकरांचा मोठा प्रतिसाद मिळाला. फिटनेस आणि सामुदायिक बंधनासाठी चालण्याचा आनंद स्वीकारत ५,००० हून अधिक सहभागी मॅक्सिमम सिटीच्या रस्त्यावर उतरले. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे (बीएमसी) आयुक्त आणि आयएएस अधिकारी आणि डॉ. भूषण गगराणी; महाराष्ट्र नौदल क्षेत्राचे ध्वज अधिकारी कमांडिंग रिअर अॅडमिरल अनिल जग्गी; महाराष्ट्राचे माजी पोलिस …
Read More »नातवाच्या आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे यांनी धुळवडीचा लुटला आनंद सर्वसामान्यांच्या जीवनात विकासरूपी सप्तरंगांची उधळण
राज्यातील महायुती सरकार विकासकामातून आणि जनकल्याण योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या जीवनात आनंदाच्या सप्तरंगाची उधळण करीत असून राज्यातील जनतेच्या आयुष्यात सुखाचे आणि समृद्धीचे दिवस येवोत, अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मॅारिशस सरकारच्यावतीने सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन …
Read More »शिवनेरी बसच्या धडकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पीआर टीममधील एकाचा मृत्यू फुलं आणण्यासाठी गेलेल्या प्रणय बोडके याच्यासह तिघांचा मृत्यू
होळी सणाच्या पुजेसाठी फुलं आणण्यासाठी दुचाकीवर गेलेल्या तीघांचा चुकीच्या मार्गावरून जाणाऱ्या शिवनेरी बसने धडक दिल्याने झालेल्या या अपघातात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पीआर टीम मधील एका तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यात आणखी दोघेजण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त पुढे आले आहे. ही घटना रात्री उशीरा प्रभादेवी येथे घडली. बुधवारी …
Read More »
Marathi e-Batmya