मुंबई

मुंबईतील ६५ किमीचे रेल्वे ट्रॅक बदलले १२६ किमीचे ट्रॅक बदलणार कल्याण ते लोणावळा आणि इगतपुरी पनवेल दरम्यानच्या ट्रॅकचा समावेश

मध्य रेल्वेने मुंबईत सुरू असलेल्या ट्रॅक बदलण्याच्या कामात उल्लेखनीय प्रगती साधली असून, या वर्षी एप्रिलपासून ६५ किमीचे नवीन ट्रॅक बसवले आहेत. वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्याचे ट्रॅक त्यांच्या कार्यान्वित कालावधीच्या शेवटी पोहोचले असल्याने बदलणे आवश्यक आहे. एका वृत्तानुसार, एप्रिल २०२५ पर्यंत एकूण १२६ किमी ट्रॅक बदलण्याचे या प्रकल्पाचे उद्दिष्ट …

Read More »

दहशतवादी गटाला मदत केल्याबद्दल तीन बांग्लादेशींना ५ वर्षांची शिक्षा एनआयए न्यायालयाचा निर्णय

दहशवादी संघटना अल-कायदाची आघाडीची संघटना असलेल्या अन्सारुल्ला बांगला टीम (एबीटी) च्या सदस्यांना प्रोत्साहन आणि मदत केल्याच्या आरोपाखाली विशेष एनआयए न्यायालयाने गुरुवारी तीन बांग्लादेशी नागरिकांना पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. मोहम्मद हबीबुर रहमान हबीब, हन्नान अन्वर हुसैन खान आणि मोहम्मद अझरअली सुभानल्ला यांना भारतीय दंड संहिता आणि परदेशी कायद्याच्या संबंधित कलमांखाली …

Read More »

एन.डी.स्टुडीओ आता गोरेगाव फिल्मसिटीच्या ताब्यात सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी केली एन.डी.स्टुडीओची पाहणी

दिवंगत कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी उभारलेला कर्जत येथील एन.डी.स्टुडीओ महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने परिचालनासाठी (operations) ताब्यात घेतला असून सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी गुरुवारी एन.डी. स्टुडीओला भेट देऊन येथील कामकाजाची पाहणी केली. त्यामुळे आता एन.डी.स्टुडीओचे परिचालन व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली …

Read More »

प्रदीर्घ काळ तुरुंगवास भोगणाऱ्याला उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर अंदाजे एक हजार कोटी रुपयांच्या १९१.५० किलो हेरॉईन बाळगण्याचा आऱोप

अपुरा पुरावा आणि खटल्याच्या प्रगतीविना प्रदीर्घ काळ तुरुंगवास भोगावा लागल्याचे निरीक्षण नोंदवून क्लियरिंग एजंट व मेसर्स एम. बी. शिपिंग आणि लॉजिस्टिक सर्व्हिसेसमध्ये भागीदार असलेल्या कोंडीबा गुंजाळ यांना उच्च न्यायालयाने अंदाजे एक हजार कोटी रुपयांच्या १९१.५० किलो हेरॉईन जप्तीच्या प्रकरणात जामीन मंजूर केला. गुंजाळ यांचा या अंमली पदार्थांच्या तस्करीत सहभाग असलेला …

Read More »

अँट्रोसिटी प्रकरणी नवाब मलिक यांना दिलासा नाहीच, उच्च न्यायालयाने दिले हे आदेश तपासाचा तपशील, केस डायरी सादर करा, सर्व प्रतिवादींना नोटीस बजावून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश

माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या विरोधात केंद्रीय महसूल अधिकारी (डीजीटीएस) समीर वानखेडे यांनी दाखल केलेल्या याचिकेची उच्च न्यायालयाने दखल घेतली. सर्व प्रतिवादींना नोटीस बजावून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. तसेच तपासाचा तपशील तपास डायरीसह पुढील सुनावणीला हजर राहण्याचे आदेश उच्च न्यायालयाने आज तपास अधिकाऱ्याला दिले. नवाब …

Read More »

हिंदू जोडीदारासाठी मुस्लिम तरूणाची उच्च न्यायालयात धाव निवारागृहातून जोडीदाराची तत्काळ सुटका करण्याचे आदेश द्या

बेकायदा निवारागृहात ठेवलेल्या आपल्या हिंदू जोडीदाराची तत्काळ सुटका करण्याचे आदेश द्या, अशी मागणी एका मुस्लिम तरूणाने उच्च न्यायालयात याचिकेतून केली आहे. आपल्याला धमक्या येत असून आमच्या दोघाच्या सुरक्षेसाठी पुरेसे पोलीस संरक्षण देण्याची मागणीही या तरूणाने याचिकेमार्फत केली आहे. मुलीच्या पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आपल्या जोडीदाराला चेंबूर येथील शासकीय महिला वसतिगृहात बेकायदेशीररीत्या …

Read More »

कोठडीतील मृत्यू प्रकरणी पोलिस उपनिरिक्षकाची ३१ वर्षानंतर निर्दोष मुक्तता मुंबई फच्च न्यायालयाचा निर्णय

एका चोरीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या आरोपीची कथित कोठडीतील मृत्यूप्रकरणी ३१ वर्षानंतर या प्रकरणातील तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) सिद्धप्पा सावली यांना उच्च न्यायालयाने दोषमुक्त केले. अर्जदार सावली यांच्याविरोधात करण्यात आलेल्या विभागीय चौकशीत, प्रत्यक्षदर्शींच्या साक्षीच्या आधारावर त्यांना दोषमुक्त केले होते. त्याचाच आधारावर घेऊन न्या. मिलिंद जाधव यांच्या एकलपीठाने अर्जदार सावली यांची …

Read More »

मानवी तस्करीतून सुटका झालेल्या मुलीचा ताबा आई की वडिलांकडे ? निर्णय घेण्याचे उच्च न्यायालयाचे बालकल्याण समितीला आदेश

मानवी तस्करीतून सुटका झालेल्या १५ वर्षांच्या मुलीचा ताबा कोणाकडे द्यायचा आई की वडीलांकडे?, याबाबतचा निर्णय बालकल्याण समितीनेच घ्यायला हवा, असे स्पष्ट करून उच्च न्यायालयाने प्रकरण निर्णयासाठी मुंबई उपनगराच्या बाल कल्याण समितीकडे वर्ग केले. मुलीचा ताबा मिळावा असा आईचा अर्ज समितीकडे आधीच प्रलंबित असल्यामुळे, मुलीच्या वडिलांनी देखील तिचा ताबा मिळण्यासाठी आठवड्याच्या …

Read More »

अहमदाबादला गोमांस वाहतूक केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाकडून जामीन नाहीच व्यावसायिकाला अटकपूर्व जामीन नाहीच

महाराष्ट्रासह गुजरातमध्ये बंदी असलेल्या गोमांसाची वाहतूक केल्याचा आरोप असलेल्या मुंबईतील एका ६४ वर्षीय व्यावसायिकाला अटकपूर्व जामीन देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. अर्जदाराकडून सुमारे १,०६५ किलो गोमांस हस्तगत करण्यात आले आहे. खटल्यातील तथ्ये जाणून घेतल्यानंतर अर्जदाराविरुद्ध पुरेसे पुरावे आहेत आणि वस्तुस्थितीतील सर्व पैलूंचा विचार करता अतिरित माहिती समोर येण्यासाठी अर्जदाराची कोठडीत चौकशी …

Read More »

पसंतीच्या वाहन नोंदणी क्रमांक आरक्षणासाठी ऑनलाईन सुविधा लिलावाची ऑफलाईन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उर्वरित अनारक्षीत

नवीन नोंदणी क्रमांकाची मालिका सुरू केल्यानंतर क्रमांक आरक्षित करण्यासाठी लिलावाची प्रक्रिया परिवहन कार्यालयामार्फत राबविण्यात येते. लिलावाची ऑफलाईन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उर्वरित अनारक्षीत नोंदणी क्रमांक ऑनलाईन पद्धतीने आरक्षित करता येणार आहेत. त्यासाठी वाहन धारकांना पसंतीचा वाहन नोंदणी क्रमांक आरक्षीत करण्यासाठी परिवहन कार्यालयांमध्ये येण्याची गरज नाही. पसंतीचे वाहन नोंदणी क्रमांक आरक्षीत करण्यासाठी …

Read More »