मुंबई

परभणी लाँगमार्च ची मुंबईत जोरदार तयारी मुंबईत ठिकठिकाणी बैठका, आज वरळीत बैठक

सोमनाथ सूर्यवंशी, विजय वाकोडे तसेच सरपंच संतोष देशमुख यांच्या मृत्यू प्रकरणाचे आता राज्यभर पडसाद उमटत आहेत . परभणीतून यासंदर्भांत निघालेला लॉन्ग मार्च लवकरच मुंबईत धडकणार असून सदर मोर्चाची मुंबईत देखील ठिकठिकाणी जोरदार तयारी सुरु आहे मुंबईतील आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला असलेल्या वरळीमध्ये उद्या मंगळवारी २२ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता सर्वपक्षीय …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा आरोप, भाजपा सरकारची सर्व मदत ‘लाडक्या अदानीसाठी’ मदर डेअरतील आगीची घटनाही संशयास्पद

कुर्ल्यातील मदर डेअरीच्या जमिनीची मोजणी पोलीस फौजसाठ्यासह सक्तीने सुरू मोदानी आणि कंपनीला मुंबई लुटू देणार नाही; मुंबईचा स्वाभिमान व अस्मितेसाठी काँग्रेस सर्वशक्तीने लढा देईल असा इशारा देत मुंबईतील जमीन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लाडका उद्योगपती अदानीच्या घशात घालण्यासाठी फडणवीस शिंदे पवार सरकार तत्परतेने कामाला लागले आहे. मुंबईचे लचके तोडणा-या अदानीच्या फायद्यासाठी …

Read More »

क्रेडाई ने एसटीची जमीन विकसित करण्यासाठी योगदान द्यावे..! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन

राज्यभरात पसरलेल्या एसटीच्या १३६० हेक्टर जमिनीचा विकास करण्यासाठी क्रीडाई (CRDAI) या संस्थेने आपला योगदान द्यावे. असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. ते महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीज ने भरवलेल्या प्रदर्शनाला भेट देते प्रसंगी बोलत होते. प्रताप सरनाईक पुढे म्हणाले की, एसटी महामंडळाचे राज्यभरात ८४२ ठिकाणी १३६० हेक्टर …

Read More »

बीड अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना एसटी तर्फे १० लाखाची मदत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

बीड – परभणी मार्गावर धावणाऱ्या एसटी बसला घोडका राजुरी येथील स्वराज हॉटेल जवळ झालेल्या भीषण अपघातामध्ये ३ तरुण मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना अत्यंत वेदनादायक असून मृत्यूमुखी पडलेल्या तरुणांच्या कुटुंबीयांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत! दुर्दैवाने अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची आयुष्य आपण परत आणू शकत नाही, परंतु त्यांच्या कुटुंबीयांवर कोसळलेला …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, शहरी वाहतुकीसाठी एकात्मिक तिकीट प्रणाली केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थित योजनेवर चर्चा

सार्वजनिक वाहतूक प्रणाली एका सिंगल मोबिलिटी प्लॅटफॉर्मवर आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असून, त्यादृष्टीने मुंबईतील पायाभूत सुविधा विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या उपक्रमामुळे प्रवाशांना केवळ ३०० ते ५०० मीटर चालून सार्वजनिक वाहतूक सुविधेचा लाभ घेता येईल. एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जलद आणि सुलभ वाहतूक सेवा देण्याचा हा महत्त्वाकांक्षी …

Read More »

केईएम रुग्णालयाला १०० वर्षे पूर्णः वर्ष समाज उपयोगी ठरावे सेठ गोवर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय व राजे एडवर्ड स्मारक रुग्णालय शताब्दी वर्ष शुभारंभ कार्यक्रम

केईएम ही मुंबईच्या सामाजिक जीवनातील महत्त्वाची सामाजिक संस्था आहे. एखाद्या आरोग्य क्षेत्रातील संस्थेने सुवर्ण किंवा शताब्दी महोत्सव साजरा करणे ही त्या संस्थेसाठी अभिमानास्पद बाब असते. मुंबईच्या आरोग्य क्षेत्रात केईएमचे नाव अग्रगण्य आहे. या संस्थेने आपल्या शताब्दी वर्षांमध्ये पदार्पण केले असून संस्थेचे हे वर्ष समाज उपयोगी ठरावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »

‘आर्टी’ मध्ये ही पुस्तके मिळणार ८५ टक्के सवलतीच्या दरात सामाजिक न्यायविभागाच्या आर्टीकडून विक्रीसाठी पुस्तके उपलब्ध

महागडी पुस्तके जर आपणाला शंभर- दीडशे रुपयात मिळाली तर आश्चर्य वाटेल, पण हे खरे आहे. नव्याने स्थापन झालेल्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत असणाऱ्या अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) या संस्थेने महापुरुषांचे विचार सर्वदूर पोहोचवण्याचा उपक्रम हाती घेतला असून, ८५ टक्के सवलतीत ही पुस्तके आर्टीच्या कार्यालयात …

Read More »

शिवछत्रपती राज्य क्रिडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन २०२३-२४ च्या पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे क्रिडा विभागाकडून आवाहन

राज्य शासनाच्या क्रिडा विभागाद्वारे राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रिडापटुंना व क्रिडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींना क्रिडा विभागाचा प्रतिष्ठेचा “शिवछत्रपती राज्य क्रिडा पुरस्कार” प्रदान करण्यात येतो. या पुरस्कारासाठी सन २०२३-२०२४ करिता अर्ज करण्याचे आवाहन क्रिडा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. अर्ज सादर करण्या-या इच्छुक क्रिडा मार्गदर्शक, खेळाडू, साहसी उपक्रम व दिव्यांग खेळाडू …

Read More »

नौदलाच्या ताफ्यात तीन युद्धनौकांचा समावेश; पंतप्रधानांच्या उपस्थित राष्ट्रार्पण भारताची मोठ्या सागरी शक्तीच्या दिशेने वाटचाल

निलगिरी युद्धनौका, सूरत विनाशिका आणि वाघशीर पाणबुडीचे लोकार्पण ही नौदलाच्या गौरवशाली परंपरेला भविष्यातील आकांक्षेशी जोडणारी ऐतिहासिक घटना आहे. यामुळे भारताची वाटचाल मोठ्या सागरी शक्तीच्या दिशेने सुरू असून भारताच्या सुरक्षा आणि प्रगतीला मोठे सामर्थ्य प्राप्त झाले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. भारतात निर्मित सूरत आणि निलगिरी (युद्धनौका) तसेच वाघशीर (पाणबुडी) …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा सवाल,… मुंबईकरांच्या आरोग्यासाठी निधी नाही? मुंबईकरांच्या जीवाशी चाललेला खेळ थांबवून बीएमसी रुग्णालयातील औषध पुरवठा तातडीने पुर्ववत करा

बृहन्मुंबई महानगरपालिका रुग्णालयांना औषध पुरवठा करणाऱ्या पुरवठादारांची १२० कोटी रुपयांची बिले सरकारने थकवल्याने औषध पुरवठा थांबवण्यात आल्याची घटना अत्यंत गंभीर आहे. बीएमसीकडे अथवा राज्य सरकारकडे पैसे नाहीत हे पटणारे नाही. जाहिरातबाजीवर उधळपट्टी करण्यासाठी सरकारकडे पैसा आहे मात्र मुंबईकरांच्या आरोग्यासाठी पैसा नाही का? असा संतप्त सवाल करत मुंबईकरांच्या जीवाशी चाललेला खेळ …

Read More »