राज्यात भाजपाच्या फोडा फोडीच्या राजकारणामुळे धमक्यांची नवी संस्कृती रूजवली असतानाच काल रात्री एका अमराठी नावाच्या शुक्लाने एकाच सोसायटीत राहणाऱ्या मराठी माणसाला मारण्यासाठी बाहेरची मुलं-माणसे बोलावून आणत मारहाण केल्याची घटना घडल्याचे उघडकीस आली. तसेच अमराठी शुक्ला हा मराठी द्वेष्टा असल्याचेही सांगण्यात येत आहे. काल संध्याकाळी सोसायटीतील मराठी कुटंबिंय कळमुद्रे पाटील यांच्या …
Read More »मुंबई विद्यापीठाच्या ५००० हजार विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रश्नी छात्रभारतीचे आंदोलन छात्रभारतीने अडवली कुलगुरुंची गाडी
मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॕम्पस मध्ये छत्रपती शिवाजी भवन समोर कुलगुरुंची गाडी अडवून इंजिनिअरिंग ५००० विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षात कॕरी आॕन अंतर्गत विशेष संधी देण्यासाठी मागच्या ४ महिन्यांपासून टाळाटाळ करणाऱ्याच्या मुद्यावरुन आज कुलगुरु व प्र- कुलगुरुंना घेराव घालत जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मुंबई विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विद्याशाखेतील प्रथम वर्षामध्ये अनुत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना …
Read More »नौदलाच्या बोटीने धडक दिल्याने नीलकमल बोटीची दुर्घटना अजित पवार यांची माहिती जखमींमध्ये ४ वर्षाची मुलगी आणि ८ महिन्याच्या गरोदर महिलेचा समावेश
मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ अरबी समुद्रातील बुचर आयलँडनजिक नीलकमल कंपनीच्या प्रवाशी बोटीला नौदलाच्या बोटीने धडक दिल्याची दुर्घटना घडली. या बोटीतील एकूण ११० प्रवाशांपैकी ९६ प्रवाशांना सुरक्षित वाचविण्यात आले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, नौदलाचे व्हाईस ॲडमिरल संजय जगजित सिंग …
Read More »वर्षा गायकवाड यांची मागणी, भाजपाच्या गुंडांचा भ्याड हल्ला, सरकारने हल्लेखोरांना अटक करावी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अपमानावर भाजपाची भूमिका म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’.
भाजपा नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला, त्यावर माफी मागण्याऐवजी भाजपा गुंडगिरी करत आहे. संसदेत भाजपाच्या खासदारांनी दादागिरी केली, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी यांना संसदेत जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. मुंबई काँग्रेसच्या कार्यालयावर भाजपाच्या …
Read More »दिल्लीतील राड्यानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांचा काँग्रेस कार्यालयावर हल्ला तोडफोड सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या पोस्टरवर शाईफेक
दिल्लीत संसदेच्या आवारात भाजपा आणि काँग्रेसच्या खासदारांमध्ये धक्काबुक्की झाल्यानंतर राज्यातही तेथील घटनांचे पडसाद उमटत आहेत. भाजपाच्या खासदारांनी काँग्रेसच्या खासदारांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावरून संसदेच्या आवारात काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. मात्र त्यानंतर भाजपाच्या भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील काँग्रेस कार्यालयावर हल्लाबोल करत काँग्रेसच्या कार्यालयाची तोडफोड, सामानाची नासधुस करण्याचा प्रयत्न करत नेत्या …
Read More »मुंबईतील बोट दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यूः पाच लाखाची मदत जाहिर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहितीः बोटीतील १०१ प्रवाशांना वाचविण्यात यश
मुंबईत एलिफंटा परिसरात प्रवासी बोट बुडाल्याची घटना घडली असून या दुर्घटनेत बोटीतील १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आली असून १०१ जणांना वाचविण्यात यश आलं आहे. तसेच या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियाना ५ लाख रूपयांची मदत जाहिर करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. या बोट …
Read More »एलिफंटाजवळ प्रवाशी बोट बुडालीः पण २१ जणांना वाचविण्यात यश एकाचा मृत्यू
बुधवारी संध्याकाळी ३० ते ३५ प्रवाशांना घेऊन एक बोट निघाली होती. मात्र ती एलिफंटा गुफेजवळ येताच ती बुडायला लागली. या बोटीवरील एकूण प्रवाशांपैकी २१ प्रवाशांना वाचविण्यात यश आले असून एकाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच नौदल आणि मुंबई पोलिसांकडून प्रवाशांना वाचविण्यासाठी विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. एलिफंटा गुफा …
Read More »एसटीला नोव्हेंबर मध्ये ९४१ कोटी रुपये इतके विक्रमी उत्पन्न…. तिकीट दरवाढीला मान्यता द्या- सरकारकडे एसटीचा प्रस्ताव
दिवाळी सणाच्या निमित्ताने प्रवाशांचा चढ-उतार वाढल्यामुळे तब्बल ९४१ कोटी रुपये इतके यंदाच्या वर्षातील सर्वाधिक उत्पन्न नोव्हेंबर महिन्यात एसटी महामंडळाला मिळाले आहे. या महिन्यात एसटीने दररोज सरासरी ६० लाख प्रवाशांची वाहतूक करून सुमारे ३१.३६ कोटी रुपये उत्पन्न प्रतिदीन प्राप्त केले आहे. मागील वर्षाच्या याच काळातील उत्पन्नापेक्षा हे उत्पन्न सुमारे २६ कोटी …
Read More »भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत संधी नाशिकमध्ये देण्यात येणार मोफत प्रशिक्षण
भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (Service Selection Board) (SSB) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येते. छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, येथे महाराष्ट्र शासनातर्फे युवक व युवतीसाठी ३० डिसेंबर २०२४ ते ८ जानेवारी २०२५ या कालावधीत एस.एस.बी.(SSB) कोर्स क्र. …
Read More »आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव पदी नियुक्ती आयपीएस अधिकारी ब्रिजेश सिंग यांची बदली
राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव श्रीकर परदेशी यांची नियुक्ती मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव पदी नियुक्ती केली होती. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंग यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र आयपीएस अधिकारी ब्रिजेश सिंग यांच्या जागेवर मुंबई महापालिकेच्या …
Read More »
Marathi e-Batmya