मुंबई

तळीरामासाठी खुशखबरः नववर्षाचे स्वागत आता २४ तारखेपासूनच पहाटे पाच वाजेपर्यंत करा विदेशी, किरकोळ मद्य विक्रीच्या दुकानांसाठी बंद करावयाच्या वेळेत शिथिलता

तळीरामांसाठी राज्य सरकाने मोठा निर्णय घेतला असून नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर रात्रीपासून ते पहाटेपर्यंत आता दारूची दुकाने-बिअरबार खुली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई दारुबंदी कायदा, १९४९ अंतर्गत मुंबई विदेशी मद्य नियमावली १९५३ व महाराष्ट्र देशी मद्य नियमावली १९७३ अंतर्गत विविध तरतुदीनुसार मुंबई शहर जिल्ह्यातील किरकोळ, विदेशी मद्य विक्रीच्या दुकानांना बंद करावयाच्या …

Read More »

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला त्याच्याच एका क्रिकेट फॅनने केले रूग्णालयात दाखल ठाण्यातील आकृती हॉस्पीटलमध्ये विनोद कांबळीला केले अॅडमिट

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याची दिवसेंदिवस तब्येत खालावत चालली होती. विनोद कांबळी याने त्याच्या व्याह्यात गोष्टी सोडून द्याव्यात असा सल्ला त्याचा मित्र सचिन तेंडूलकर आणि ज्येष्ठ क्रिकेटपटू कपिल देव यांनी विनोद कांबळी यास जाहिरपणे दिला होता. या आवाहनाला प्रतिसाद देत विनोद कांबळी याने पुर्नवसन केंद्रात दाखल होण्याची तयारीही दाखविली. त्यास …

Read More »

राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे आवाहन नवलेखकांनो अर्ज पाठवा ३१ जानेवारी, २०२५ पर्यंत साहित्य पाठविण्याचा कालावधी

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून सन २०२५ या वर्षासाठी आतापर्यंत एकही पुस्तक प्रकाशित झालेले नाही, अशा नवलेखकांच्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनाला अनुदान देण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. नवलेखकांनी १ ते ३१ जानेवारी, २०२५ या कालावधीत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्यमंदिर इमारत मुंबई येथे आपले साहित्य पाठवावेत, असे …

Read More »

ख्रिसमस आणि हिवाळी सुट्टीसाठी रेल्वेकडून या खास गाड्या मध्य रेल्वेकडून सुट्टीकालीन गाड्या धावणार आजपासून

ख्रिसमस आणि हिवाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेने मुंबई ते करमाळी दरम्यान १८ अतिरिक्त हिवाळी विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. या गाड्यांचा उद्देश अतिरिक्त क्षमता प्रदान करणे आणि सुट्टीसाठी जाणाऱ्यांसाठी सोयीस्कर प्रवास सुनिश्चित करणे हे आहे. एलटीटी मुंबई – करमाळी स्पेशल (ट्रेन क्रमांक ०११४९) निर्गमन: लोकमान्य टिळक …

Read More »

अमित शाह व भाजपा विरुद्ध मुंबईत बहुजन समाजाचा निषेध मोर्चा गृहमंत्र्यांनी जाहीर माफी मागून त्वरित राजीनामा द्यावा .. नसीम खान

उत्तर मध्य मुंबई जिल्ह्यातील चांदिवली मतदार संघात माजी मंत्री व प्रदेश कॉँग्रेस कार्याध्यक्ष आरिफ नसीम खान यांच्या नेतृत्वात सकल बहुजन समाजाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल लोकसभेत अपमान करणारे वक्तव करणारे भारताचे गृहमंत्री अमित शाह यांच्या विरुद्ध भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. मुंबईतील साकीनाका येथील पेनुनसुला हॉटेल पासून …

Read More »

निवडणूकीच्या निमित्याने नाही पण, या कारणासाठी उद्धव-राज आले एकत्र राज ठाकरे यांच्या भाचाच्या लग्नानिमित्त दोन नेते आणि भाऊ एकत्र आले

मागील काही वर्षात मुंबईतील राजकिय आणि मराठी बाणा टिकवून ठेवण्यासाठी शिवसेनेपासून वेगळे झालेले राज ठाकरे यांनी पुन्हा शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे यासाठी मनसे समर्थक आणि शिवसेना समर्थकांनी अनेक वेळा मोर्चे काढले. पण राजकिय दृष्ट्या एकत्र येऊ न शकलेले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे अखेर मोर्चाच्या …

Read More »

मध्य रेल्वेकडून २२ आणि २३ डिसेंबरला मेगा ब्लॉक ५ व्या आणि ६ व्या मार्गिकेचे आणि इतर कामासाठी ब्लॉक घेतला

मध्य रेल्वेने (CR) अधिकृत निवेदनात २१/२२ डिसेंबर आणि २२/२३ डिसेंबरसाठी सीएसएमटी CSMT-कल्याण आणि कल्याण-कर्जत विभागांवर एकात्मिक वाहतूक आणि पॉवर ब्लॉक्सचे वेळापत्रक जाहीर केले आहे. दोन्ही तारखांना पहाटे १:०० ते पहाटे ४ः३० दरम्यान होणारे हे ब्लॉक, पायाभूत सुविधांच्या महत्त्वपूर्ण विकासासाठी गर्डर्स सुरू करण्यासाठी आवश्यक आहेत. प्रवासी सेवा सुधारण्याच्या हितासाठी पायाभूत सुविधा …

Read More »

मुंबई काँग्रेसची मंत्रालयावर तीव्र निदर्शने अमित शाह आणि भाजपाच्या गुंडगिरीचा धिक्कार

भाजपा कार्यकर्त्यांनी मुंबई काँग्रेस कार्यालयावर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ मंत्रालयासमोर तीव्र निदर्शनं करण्यात आली. भाजपाच्या गुंडगिरीचा निषेध करत, अमीत शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करत, जयभीमच्या नाऱ्यांनी मंत्रालय परिसर दणाणून गेला होता. काल १९ डिसेंबरला भाजपाच्या सुमारे ४० गुंड कार्यकर्त्यांनी मुंबई कॉंग्रेस कार्यालयावर भीषण हल्ला केला. काठ्या, पेव्हर ब्लॉकने हल्ला करत …

Read More »

कल्याणमधील योगधाम सोसायटीत अमराठी शुक्लाची मराठी माणसाला मारहाण मराठी माणूस रक्तबंबाळ झाला, अमराठी शुक्लाने बाहेरची माणसे बोलावून केली मारहाण

राज्यात भाजपाच्या फोडा फोडीच्या राजकारणामुळे धमक्यांची नवी संस्कृती रूजवली असतानाच काल रात्री एका अमराठी नावाच्या शुक्लाने एकाच सोसायटीत राहणाऱ्या मराठी माणसाला मारण्यासाठी बाहेरची मुलं-माणसे बोलावून आणत मारहाण केल्याची घटना घडल्याचे उघडकीस आली. तसेच अमराठी शुक्ला हा मराठी द्वेष्टा असल्याचेही सांगण्यात येत आहे. काल संध्याकाळी सोसायटीतील मराठी कुटंबिंय कळमुद्रे पाटील यांच्या …

Read More »

मुंबई विद्यापीठाच्या ५००० हजार विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रश्नी छात्रभारतीचे आंदोलन छात्रभारतीने अडवली कुलगुरुंची गाडी

मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॕम्पस मध्ये छत्रपती शिवाजी भवन समोर कुलगुरुंची गाडी अडवून इंजिनिअरिंग ५००० विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षात कॕरी आॕन अंतर्गत विशेष संधी देण्यासाठी मागच्या ४ महिन्यांपासून टाळाटाळ करणाऱ्याच्या मुद्यावरुन आज कुलगुरु व प्र- कुलगुरुंना घेराव घालत जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मुंबई विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विद्याशाखेतील प्रथम वर्षामध्ये अनुत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना …

Read More »