घरांच्या किंमतींसाठी रेडी रेकनर दराबाबत लवकरच निर्णय महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे आश्वासन

मुंबई: प्रतिनिधी
बांधकाम व्यवसायावर मंदीचे सावट आणि राज्यातील घरांच्या किंमती आटोक्यात राखण्याच्या अनुषंगाने रेडीरेकनरच्या दराबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री बाळासोबत थोरात यांनी दिली.
राज्यातील बांधकाम व्यावसायिक आणि नागरीकांकडून मागणी केल्यास रेडीरेकनरच्या दरात वाढ किंवा घट करता येवू शकते. मात्र गेल्या दोन वर्षापासून रेडिरेकनरच्या दरात वाढ करण्यात आली नाही. रेडि रेकनरच्या अनुषंगाने सरकारकडे अनेक निवेदने आलेली आहेत. या सर्वांचा अभ्यास करून त्यावर निर्णय घेण्यात येईल असे ते म्हणाले.

About Editor

Check Also

आयआयटी बॉम्बे मधील विद्यार्थी साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसचे तीव्र आंदोलन IIT Bombay मधील जाति-आधारित छळाच्या आरोपांची सखोल चौकशी करा, प्रा. सुर्यनारायण डुल्लांना बरखास्त करा: झीनत शबरीन

आयआयटी बॉम्बेचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्ये प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत आयआयटी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *