राज्यपालांनी अर्णवपेक्षा न्यायासाठी भटकणाऱ्या नाईक कुटुंबाला सहानुभूती दाखवली असती तर बरं झालं असतं मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा टोला

मुंबई : प्रतिनिधी
एका गंभीर गुन्ह्याखाली अटक झालेल्या आरोपीला सहानुभूती दाखवण्याऐवजी राज्यपालांनी नाईक कुटुंबाला सहानुभूती दाखवली असती तर बरं झालं असतं असे सांगतानाच एका आरोपीची बाजु घेणे योग्य नसल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केले.
राज्यपाल यांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात आरोपी असलेल्या अर्नव गोस्वामीला सहानुभूती दाखवण्याचा प्रयत्न केला असून यावर नवाब मलिक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
ज्या राज्यात प्रत्येक जेलमध्ये असणाऱ्या कैद्याच्या जीवाची किंवा आरोग्याची जबाबदारी सरकारची असते. जेलमधील कैद्याला नातेवाईकांना भेटण्यासही परवानगी दिली जात असते. परंतु ज्यापध्दतीने राज्यपाल एक विशेष कैदी असलेल्या अर्नव गोस्वामीला सहानुभूती दाखवतात. नाईक कुटुंब बरेच महिने न्यायासाठी भटकत होते त्यांची बाजू न घेता एका आरोपीची घेणे हे योग्य नसल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, अशोक खरात प्रकरणाने महायुती सरकार पोखरले… इंधन टंचाईचे खापर राहुल गांधींवर फोडून भाजपाचा जबाबदारीपासून पळ काढण्याचा प्रयत्न, फडणवीसांचे विधान दिशाभूल करणारे.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या धोरणानुसार जिल्हा काँग्रेस कमिट्या सक्षम करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांची निवड करण्यासाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *