भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा सुप्रिया सुळे यांच्यावर हल्लाबोल

आज जागतिक महिला दिन आहे. हा मंगलयोग साधून नारीशक्तीला वंदन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज १०० रुपयांची कपात केली आहे. तुमच्या सरकारचे पेट्रोलियममंत्री वीरप्पा मोईली यांनी कोणत्या निवडणुकीच्या तोंडावर नऊवरून १२ सिलिंडर वाढवले होते..’ जरूर वाचा, म्हणजे काँग्रेसी “जुमला “कळेल असा सवाल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी उपस्थित केला.

पुढे भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे बोलताना म्हणाले की, ज्यांच्या शेतीच्या १० एकरातून ११३ कोटी रुपयांचे उत्पादन निघते त्यांना १०० रुपयांची माता भगिनींना दिली जाणारी भेट निवडणूक जुमला वाटेल असा उपरोधिक टोलाही लगावला.

भाजपाच्या एक्स या सोशल मायक्रोब्लॉगिंग साईटवर टीका करताना म्हणाले की, डोक्यात सतत राजकारण असल्याने सुप्रियाताईंना काळ वेळेचे भान राहत नाही. “जुमला “शब्द मोठ्याने म्हणायचा आणि पिताश्री मंत्री असलेल्या काँग्रेस सरकारची गरीबांची, महिलांची पिळवणूक करणारी कृत्ये नजरेआड करायची. अहो, सुप्रियाताई कशाला सिलिंडरचे दर निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कमी केल्याच्या बोंबा मारता? तुमचे राजकीय शिक्षक तुम्हाला सोयीचे शिकवतात असा टोलाही लगावला.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी डोळ्यासमोर निवडणुका ठेवत नाहीत. तो धंदा तुम्हाला पोटापाण्याला लावणाऱ्या मनमोहन सिंग नेतृत्वातील यूपीए सरकारचा होता. मोदी सरकारचे धोरण मातृवंदन आहे. तुम्हाला आठवत नाही म्हणून सांगतो, गेल्यावर्षीच्या रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला मोदीजींनी एक अभूतपूर्व निर्णय घेतला. भारतातील ७५ लाख महिलांना मोफत गॅस सिलिंडर दिले होते… इतकेच नाही, तर सर्वसामान्य गॅस ग्राहकांच्या सिलेंडरवर २०० रुपयांची कपात केली होती… आणि उज्ज्वला गॅस योजनेतील (PMUY) माता भगिनींना सिलेंडरवर ४०० रुपयांची सवलत दिली होती. आठवा जरा असा उपरोधिक टोलाही लगावला.

पुढे बोलताना भाजपा म्हणते की, आज जागतिक महिला दिन आहे. हा मंगलयोग साधून नारीशक्तीला वंदन करण्यासाठी मोदीजींनी आज १०० रुपयांची कपात केली आहे. अर्थात, तुम्हाला हाही दिवस राजकीय वाटतो म्हणा!! आणि हो सुप्रिया ताई, एक रिपोर्ट जरूर वाचा. जेव्हा तुमच्या सरकारचे पेट्रोलियममंत्री वीरप्पा मोईली यांनी कोणत्या निवडणुकीच्या तोंडावर ” नऊवरून १२सिलिंडर वाढवले होते..’ जरूर वाचा, म्हणजे काँग्रेसी “जुमला “कळेल असे सांगत सुप्रिया ताई, महिला दिनाच्या शुभेच्छा!! शेवटी दिल्या.

About Editor

Check Also

प्रकाश आंबेडकर यांची टीका, दिल्लीतील आरक्षणविरोधी आंदोलन उच्च जातींचे वर्चस्व टिकवण्याचा प्रयत्न काँग्रेस नेतृत्वाचे मौन तितकेच निंदनीय आणि यामध्ये सामील असल्याचा संकेत

दिल्लीतील ‘आरक्षणविरोधी’ आंदोलने तथाकथित उच्च जातींकडून आपले वर्चस्व टिकवण्याचा एक उघड प्रयत्न दर्शवत असल्याचे वंचित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *