भाजपाकडून विधानसभा निवडणूकीसाठी २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहिर नाराज आमदारांना स्थान देत काही नवे चेहरे

राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडी या सर्वांपेक्षा मात्र वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारी यादीनंतर भाजपाने विधानसभा निवडणूकीची पहिली ९९ उमेदवारांची यादी जाहिर केली. त्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस राहिल्यानंतर भाजपाने आज दुसरी यादी जाहिर केली. या उमेदवारांच्या यादीत पहिल्या यादीत स्थान न मिळालेल्या उमेदवारांना दुसऱ्या यादीत स्थान देण्यात आले आहे. तर विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांना मात्र पहिल्यांदाच विधानसभेसाठी भाजपाने उमेदवारी जाहिर केली. काही दिवसांपूर्वी जतमधील काही नगरसेवकांना सोबत घेऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि नाराजी व्यक्त केल्याचे बोलले जात होते. त्यानंतरही गोपीचंद पडळकर यांना भाजपाने उमेदवारी जाहिर केली.

याशिवाय नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांनीही पहिल्या यादीत स्थान न मिळाल्याने नाशिकमधील काही नगरसेवकांना घेऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. याशिवाय पहिल्या यादीत स्थान न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता दुसऱ्या उमेदवारांच्या यादीत स्थान देण्यात आले आहे.

तर पुण्याच्या कसबा पेठेतून काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांच्या विरोधात हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच खडकवासला मतदारसंघातून भिमराव तापकीर यांनाही उमेदवारी जाहिर करण्यात येणार आहे. तसेच पुणे छावणीतून सुनिल कांबळे यांना उमेदवारी दिली आहे. त्याचबरोबर सोलापूर शहरातून मध्यमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार महेश कोठे यांचे पुतणे देवेंद्र राजेश कोठे यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. तर पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून मागील पोटनिवडणूकीतून विजयी झालेले समाधान आवताडे यांना पुन्हा एकदा उमेदवारी भाजपाने दिली आहे.

तर मागील काही वर्षापासून धनगर समाजासाठी नेतृत्व बनण्याच्या प्रयत्नात असलेले आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांचे स्पर्धक असलेले गोपीचंद पडळकर यांना पहिल्यांदाच उमेदवारी जाहिर करण्यात आलेली आहे. तर शिराळा येथून सत्यजीत देशमुख यांना उमेदवारी भाजपाने जाहिर केली आहे.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचे मत, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीबा फुलेंच्या विचारांची आजच्या काळातही नितांत गरज क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या २०० व्या जयंती वर्षानिमित्त काँग्रेस पक्ष वर्षभर विविध उपक्रम राबविणार; बारामतीतून उमेदवारी अर्ज माघारी घेतला पण पाठिंबा दिलेला नाही;

महात्मा ज्योतीबा फुले यांचे महाराष्ट्रासाठी व देशासाठी मोठे योगदान आहे. सत्यशोधक चळवळ, पुरोगामी चळवळीचा वारसा, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *